Agripedia

आपल्या शरीरामध्ये ज्याप्रमाणे पोषक घटक आपल्याला कोणतेही कार्य करण्यासाठी शक्ती प्रदान करत असतात

Updated on 03 February, 2022 9:39 PM IST

आपल्या शरीरामध्ये ज्याप्रमाणे पोषक घटक आपल्याला कोणतेही कार्य करण्यासाठी शक्ती प्रदान करत असतात त्याचप्रमाणे वनस्पती आणि पिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्म पोषक द्रव्य आणि घटक हे कार्यरत असतात त्यामुळे पीक चांगले जोमदार येत असते. या लेखामध्ये आपण आज जाणून घेणार आहोत पिकांमध्ये कोणकोणत्या प्रकारची पोषक घटक असतात व ते कशा प्रकारे कार्य करत असतात.

बोरॉन(boron - B): बोरॉन हे पिकांमध्ये कोशिका विभाजनाचे (cell division) कार्य करतात. या पृथ्वीवरील कोणत्याही सजीवाची वाढ होत असताना त्याच्या कोशिकाचे विभाजन होत असते. कोशिका विभाजनामध्ये व्यतेय आला तर पिकांची योग्यप्रकारे वाढ होत नाही. बोरॉनच्या कमतरता हि कोंबांच्या वाढीमध्ये फूल आणि फळामध्ये दिसून येते.

क्लोरीन (chlorine - Cl): क्लोरीन मुळे प्रकाशसंस्लेषणक्रिया सुधारते. क्लोरीनचा योग्य वापर केल्यास धान्य पिकांच्या उत्पादनात चांगली वाढ होते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पालाश Potassium (K) आणि क्लोरीन एकत्रित प्रकाशसंस्लेशन क्रिया योग्यरीत्या कार्यरत ठेवतात.तसेच पिकांच्या अंतर्गत पाणी व्यवस्थापनामध्ये पालाश आणि क्लोरीन महत्वाची भूमिका पार पडतात.

तांबे(copper - Cu): तांबे प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक भूमिका पार पाडत असते. पिकांच्या श्वसन प्रक्रियेसाठी आवश्यक असते. पिकांच्या फळाची चव, रंग आणि फुलाचा रंग हा योग्य प्रमाणात copper असल्यास उत्तम होतो. तांबे स्थिर आहे. म्हणजेच त्याच्या कमतरतेची लक्षणे नवीन पानांमधे उद्भवतात.नवीन येणारी पाने लहान येतात आणि पानांना तेज नसतो.

लोह(iron - Fe): लोह हा घटक अत्यंत महत्वाचा घटक आहे. क्लोरोफिल(हरित द्रव्य) मुळे पानांना हिरवा रंग प्राप्त होतो.वनस्पती लोह शिवाय क्लोरोफिल तयार करू शकत नाहीत. शिवाय, त्या ऑक्सिजन पण घेऊ शकत नाहीत. म्हणून लोह हा घटक पानांचा हिरवा रंग कायम ठेवण्यास मदत करतो.

मॅगनीज (manganese - Mn): प्रकाशसंश्लेषण, श्वासोच्छ्वास, आणि नायट्रोजन योग्य पद्धतीने ग्रहण करणे यासारख्या विविध कार्यासाठी वनस्पतींमध्ये मँगनिजचा वापर केला जातो. मँगेनजमुळे पराग उगवण, परागनलिकामध्ये वाढ होते आणि रोगजनकांच्या प्रतिकारशक्तीशी मध्ये वाढ होते.मॅगनीजच्या कमतरतेमुळे पिकांची वाढ खुंटते आणि पिके आहे त्याच स्थितिमध्ये राहतात.  

मोलिबडेनम(molybdenum - Mo): पिकामध्ये असलेले नायट्रेट किंवा मातीतून घेतलेले नत्र प्रोटीन मध्ये रुपांतरीत करण्यासाठी मोलिबडेनम चा उपयोग होतो. मोलिबडेनम योग्य प्रमाणात ना मिळाल्यास नत्राची कमतरता असलेली लक्षणे दिसून येतात. आणि त्यामुळेच नायट्रेट न वापरता संचय झाल्याने पानांची कडा कारपल्यासारख्या दिसतात.

जस्त(Zn): हे आठ आवश्यक पोषक घटकांमधील एक आहे. वनस्पतींसाठी कमी प्रमाणामध्ये हे आवश्यक असले तरी रोपांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. जस्त हे झाडांमधील अनेक एंझाइम्स आणि प्रथिने यामधील एक मुख्य घटक आहे. जस्त हे विशिष्ट प्रथिनांच्या संश्लेषणासाठी जबाबदार असलेल्या एन्झाइम ला सक्रिय करतात. हे क्लोरोफिल आणि काही कार्बोहायड्रेट निर्मिती, स्टार्च चे साखरेत रूपांतर करणे, वनस्पतींच्या ऊतीमध्ये थंड तापमान रोखण्यात मदत करते.

 

मिलिंद जि गोदे

Mission agriculture soil information

स्त्रोत...के व्ही के घातखेड ( अमरावती ) माध्यमातून

English Summary: In soil micro nutrients content and functions
Published on: 03 February 2022, 09:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)