Agripedia

भारतीय आहाराचा एक अविभाज्य भागच आहे बटाटा. चवीचा बेताज बादशाह म्हणुन बटाट्याची ओळख आहे. बटाटे हे आरोग्यासाठी देखील खुपच फायद्याचे असतात त्यामुळे बटाट्याला अजूनच महत्व प्राप्त होते. बटाट्याच्या उत्पादनात उत्तरप्रदेश शीर्षस्थानी विराजमान आहेत, असं असलं तरी आपला महाराष्ट्र काही कमी नाही. महाराष्ट्रात देखील बटाट्याची लागवड ही मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्राच्या रांगड्या शेतकऱ्यांनी बटाटा लागवडीत आपले एक वेगळे स्थान कमावले आहे.

Updated on 28 September, 2021 8:19 PM IST

भारतीय आहाराचा एक अविभाज्य भागच आहे बटाटा. चवीचा बेताज बादशाह म्हणुन बटाट्याची ओळख आहे. बटाटे हे आरोग्यासाठी देखील खुपच फायद्याचे असतात त्यामुळे बटाट्याला अजूनच महत्व प्राप्त होते. बटाट्याच्या उत्पादनात उत्तरप्रदेश शीर्षस्थानी विराजमान आहेत, असं असलं तरी आपला महाराष्ट्र काही कमी नाही. महाराष्ट्रात देखील बटाट्याची लागवड ही मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्राच्या रांगड्या शेतकऱ्यांनी बटाटा लागवडीत आपले एक वेगळे स्थान कमावले आहे.

 पश्चिम महाराष्ट्रात पुणे, नाशिक, अहमदनगर इत्यादी जिल्ह्यात बटाट्याची लागवड केली जाते तसेच, मराठवाड्यात व विदर्भात औरगाबाद, नागपूर, बीड इत्यादी जिल्ह्यात बटाट्याची लागवड केली जाते. बटाट्यात पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, लोह आणि सोडियम सारखे घटक असतात. बटाट्याचा वापर अन्नाव्यतिरिक्त इतर अनेक उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो.

 बटाटा लागवडिविषयी अल्पशी माहिती

बटाटा पिकाची आगात लागवड ही साधारणपणे 15 सप्टेंबरपासून सुरू होते आणि 16-26 ऑक्टोबर पर्यंत लागवड केली जाते. बटाटा आगात लावताना काही आगात येणाऱ्या बटाट्याच्या जातींची लागवड केली जाते. बटाटा हे थंड हवामानातील पीक आहे. या पिकाला सरासरी तापमान 16 ते 21 अंश से. पर्यंत मानवते.

 गहू, भात आणि मका नंतर  बटाटा हे सर्वात जास्त पिकवले जाणारे पीक आहे. कृषी शास्त्रज्ञांच्या मते, बटाटा मूळतः पेरू या देशाहून आला होता आणि त्याच्या गुणधर्मांमुळे तो जगभर पसरला. चला तर मग जाणून घेऊया बटाटा लागवडीबद्दल.

 बटाटा लागवडीसाठी जमीन कशी असावी

बटाटा हे पिक मध्यम ते हलक्या प्रमाणात गाळ असलेल्या जमिनीत चांगले येते. जमीन ही पाण्याचा चांगला निचरा होणारी पाहिजे.   वावर नांगरताना काही गोष्टींची काळजी घ्या जसे की, नांगरणी ही 20 ते 25 सेंमी खोल पर्यंत असावी. जमिनीत प्रति हेक्टर 50 बैलगाडा चांगल्या कुजलेल्या शेणखताचा वापर करावा.

बटाटा लागवड कशी करायची

कृषी विभागाच्या तज्ञांच्या मते, बटाटे लागवड करताना, बटाट्यामधील अंतर नेहमी लक्षात ठेवा, आणि बटाट्याच्या झाडांना सूर्यप्रकाश, पाणी आणि पोषक द्रव्ये सहज मिळतील याची खात्री करा. तज्ञांच्या मते, बटाट्याच्या गादे/गोट मधील अंतर कमीतकमी 50 सेमी आणि दोन झाडांमधील अंतर 20-25 सेमी असावे.

बटाट्याची झाडे जमिनीच्या वरच्या थरात उगवत असल्याने लागवडीनंतर या पिकाला पहिले पाणी देताना काळजी घ्यावी.  साधारणपणे 6 ते 8 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पिकाची वाढ पूर्ण झाल्यानंतर पिकाला पाणी देणे कमी करावे.

 

बटाटा लागवडीतून उत्पादन किती

आगात येणाऱ्या बटाट्याच्या वाणांचे उत्पादन हेक्टरी 200 क्विंटल आणि पसात येणाऱ्या वाणांचे 250 ते 300 क्विंटल/हेक्टर पर्यंत उत्पन्न बटाटा लागवडीतून मिळते. जर बटाट्याला चांगला भाव मिळाला तर बटाटा लागवड एक फायद्याचा सौदा ठरू शकतो.

 Source Tv9 Bharatvarsh Hindi

English Summary: in potato cultivation maharshtra in toppers
Published on: 28 September 2021, 08:19 IST