Agripedia

शासनाने यावर्षी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्व हंगामी कापूस लागवडीवर बंदी आणली आहे.

Updated on 30 April, 2022 10:27 AM IST

शासनाने यावर्षी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्व हंगामी कापूस लागवडीवर बंदी आणली आहे. जून महिन्यात सर्व शेतकर्‍यांनी एकाच कालावधीत बीटी बियाण्यांची लागवड करण्याचे धोरण आखले आहे. जून महिन्यात लागवड केलेल्या कापसाचे जानेवारीपर्यंत उत्पन्न घेवून नंतर शेतकर्‍यांनी फरदड न घेता एकाच कालावधीत पीक नष्ट करायचे कृषी विभागाने नियोजन केले आहे. गेल्या दोन वर्षापासून गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे कापूस पिकाचा कालावधी कमी करण्यासाठी कृषी विभागाने यंदा शेतकर्‍यांवर नजरा फिरविल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.

व्यापार्‍यांसह शेतकर्‍यांच्या बीटीवर नजरा

जून महिन्यात कापसाची लागवड आणि फरदड न घेता लवकर पीक नष्ट केल्यामुळे जानेवारी ते जून महिन्यादरम्यान गुलाबी बोंडअळीचे संक्रमण होवू शकत नाही.

फरदड पिकामुळे बोंडअळीचे जीवनचक्र मे महिन्यापर्यंत सुरू राहते. एप्रिल-मे महिन्यात पूर्व हंगामी कापूस लागवड होत असल्याने फरदड पिकावरील बोंडअळी सहज नव्या पिकावर येते. तेथून पुन्हा दुसर्‍या टप्प्यात जून महिन्यात लागवड केल्या. कापसाच्या झाडावर अळीचा प्रादुर्भाव होत असल्याने कृषी विभागाने यावर्षी शेतकर्‍यांना 1 मे पूर्वी बीटी कापसाचे बियाणे खरेदी करण्यास बंदी घातली आहे. शासनाने कंपन्यांना 1 मे नंतर बाजारात बियाणे आणण्याची सूचना केली आहे. त्यामुळे बाजारपेठेत व्यापार्‍यांसह शेतकर्‍यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची गरज

शेतकर्‍यांना कापसाचे अधिक उत्पादन मिळावे, याकरीता त्यांनी देशी वाणाची व बीटी बियाण्यांची लागवड करताना दोन काड्यांमधील अंतर, कोरडवाहू जमीव व ओलसर जमीन याचा विचार करुन लागवड करावी. 

कपाशीवर बोंडअळीचा प्रादूर्भाव होण्यास सुरुवात होत आहे, हे शेतकर्‍यांना तात्काळ ओळखता आले पाहिजे. त्याचबरोबर कोणत्यावेळी प्रादुर्भाव झाला तर किती व कशाप्रकारे नुकसान होईल त्याचाही अंदाज येणे आवश्यक आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना करणे सोईस्कर ठरण्यास मदत होईल.

प्रमाणित केलेली बियाणे खरेदी करा

मागील वर्षी जिल्ह्यात कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला होता. कापूस उत्पादक शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले होते. येत्या खरीप हंगामात कापसाचे उत्पादन घेतांना शेतकर्‍यांनी काळजी घेण्याविषयी सूचना दिल्या आहेत. कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव हा शक्यतो ऑक्टोबर महिन्यानंतर होतो. त्यामुळे बोंडअळीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शेतकर्‍यांनी फरदड घेवू नये.

तसेच वेचणीचा हंगाम संपताच पर्‍हाट्या आणि पालापाचोळा यांचा शेताबाहेर कंम्पोस्ट खत तयार करण्यासाठी वापर करण्याची खरी गरज आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे होणारे नुकसान होणार टळण्यास मदत होईल. त्यासाठी शेतकर्‍यांनी बियाणे खरेदी करतांना प्रमाणित केलेल्या कंपनीचेच घ्यावे. बियाणांवरील बॅच नंबर, विक्री किंमत आदी बाबी तपासून घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे.

कृषी विभागाकडून सतर्कता राहावीत

एकंदरीत येत्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकर्‍यांना कापूस पिकाचे उत्पादन घेताना त्यांना अधिक उत्पादन मिळावे, शेतकर्‍यांचे नुकसान होवू नये. त्यांना आवश्यक असलेले बि-बियाणे, खते, किटकनाशके आदी बाबींचा कशाप्रकारे वापर करावा. कापूस पिकासाठी उपलब्ध जमीन, पिकासाठी लागणारे पाणी, पिकाची लागवड, पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास घ्यावयाची काळजी, करावयाच्या उपाययोजना आदींबाबत शेतकर्‍यांना अधिकाधिक माहिती उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने सतर्कता ठेवली आहे, हे यंदाचे वैशिष्ट्य ठरले.

English Summary: In one time BT seeds plantation doing work
Published on: 30 April 2022, 10:25 IST