Agripedia

जैविक उत्पादनांची सध्याची बाजारपेठ हि फार वेगात मोठी होत आहे. द्राक्ष, डाळिंब, मिरची, आंबा आणि आता केळी ह्या पिकांच्या निर्यातक्षम उत्पादनासाठी रासायनिक मुक्त उत्पादनाची गरज हि आज जैविक उत्पादनाच्या वापसासाठी अनेकांना प्रवृत्त करत आहे. जैविक उत्पादने म्हणजे काय हे आधी जाणून घेणे गरजेचे आहे.

Updated on 18 December, 2021 6:02 PM IST

जैविक उत्पादने म्हणजे काय हे आधी जाणून घेणे गरजेचे आहे. ज्या उत्पादनात असे जीव आहेत, जे जिवंत आहेत किंवा सुप्तावस्थेत आहेत, आणि अशा उत्पादनांच्या वापरानंतर त्यातील जीव जमिनीत, तसेच पानांवर राहुन त्यांची संख्या वाढवितात तेच केवळ जैविक उत्पादन होय.

ह्युमिक अँसिड, सी विड, अॅमिनो अॅसिड, ज्या उत्पादनांच्या वापरातुन हानीकारक रेसिड्यु शिल्लक राहत नाहीत अशी सजिवविरहित:उत्पादने हि जैविक उत्पादने नाहीत.

बाजारात आज अनेक प्रकारची जैविक उत्पादने उपलब्ध आहेत. त्यांच्या बाबत एक मुद्दा ह्या ठिकाणी आवर्जून सांगावासा वाटतो तो हा की, शेतीसाठी उपयुक्त ठरतील अशा जीवाणूंचा आणि बूंरशींचा अभ्यास करुन त्यांची संख्या वाढविण्याचा जो शोध लागला तो, शेती क्षेत्रातील एक मोठी क्रांती आहे. आज आपणास ह्या बाबतीत फारसे कौतुक किंवा ह्या शोधाचे महत्व जाणवणार नाही. आज आपण रासायनिक पध्दती ज्या आपल्याला अस वाटते की, फार वेगाने उत्तम परिणाम दाखवतात, त्यांच्या वापराबाबत फार उत्सूक असल्या कारणाने ह्या महत्वाच्या घटनेकडे थोडे फार शंका वजा अविश्वासामुळे दुर्लक्ष करत असु, पण शेतीचा वाढता खर्च, रासायनिक उत्पादनांचे विपरित परिणाम आणि शेतीचा शाश्वतता टिकवुन ठेवण्यासाठी सुक्ष्मजीवांचे महत्व येणाऱ्या काळात आपण स्वतःहून मान्य नाही केले तरी निसर्ग ते महत्व मान्य करण्यास भाग पाडेल हे नकी.

बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांच्या बाबतीत त्यांची शुद्धता महत्वाचा भाग आहे. आपण पैसे खर्च करुन ही उत्पादने विकत घेत असल्या कारणाने, त्यांच्यात नेमका तोच सुक्ष्मजीव असावयास हवा ज्याच्यासाठी आपण पैसे मोजले आहेत. त्यात असलेली भेसळ हि नुकसानकारक ठरणार आहे. शिवाय ईच्छित परिणाम न मिळाल्याने आपला जो थोडाफार विश्वास अशा उत्पादनांकवर ठेवलेला असतो तो देखिल मोडला जावून, एक शेतकरी म्हणुन आपण देखिल निसर्गासोबत विकास करण्याच्या संधीस मुकणार आहोत.

आपण मागिल भागांत जितक्या सुक्ष्मजीवांची चर्चा केली त्यांच्या बाबातीत एक निष्कर्ष पक्का निघतो तो हा की, जितकी सक्ष्मजीवांची संख्या जास्त, तितका त्यांच्या पासुन मिळणारा लाभ जास्त. तेव्हा बाजारात मिळणारी उत्पादने हि शुद्ध स्वरुपात तसेच जास्त संख्येत सुक्ष्मजीवांचे बीजाणू असलेली असावयास हवीत. बाजारात मिळणाऱ्या सुक्ष्मजीव युक्त उत्पादनांच्या बाबतीत, त्यांच्या पाकिटावर लिहिलेल्या माहीतीबाबत ह्या ठिकाणी आपण जाणुन घेणार आहोत.

 

स्पोअर्स किंवा बीजाणू म्हणजे काय -

ज्या मध्ये जीव असतो, आणि जो अणुच्या आकाराचा असतो त्यांस जीवाणू म्हणतात, तर ज्या मध्ये सुप्तावस्थेत जीवाणू असतो, बीजाणू म्हणजेच स्पोअर्स म्हणतात. सुप्तावस्था म्हणजे जीवाणू त्याच्या सर्व प्रकारच्या दैनंदिन आणि जिवनावश्यक क्रिया बंद करुन स्वत:ला एका 4 ते 5 थर असलेल्सा वेष्टणात बंद करुन ठेवतो. ह्या अशा प्रकारच्या वेष्ठणास स्पोअर्स म्हणतात. स्पोअर्स है अनेक वर्षापर्यंत सूप्तावस्थेत राहु शकतात. ज्या वेळेस तापमान, आद्रता आणि जीवाणूसाठी अन्नाचा पुरवठा हा तिन्ही बाबींची सांगड़ घातली जाते त्यावेळेस जीवाणू सुप्तावस्था सोडुन पुन्हा जिवंत होतात.

बुरशी देखिल अशा प्रकारचे स्पोअर्स तयार करतात, जीवाणूंच्या द्वारा तयार केले जाणारे स्पोअर्स किंवा बीजाणू हे हानीकारक परिस्थितीला दिली जाणारी प्रतिक्रिया असते. बुरशीमध्ये मात्र अशी प्रतिक्रिया दिली जात नाही. बुरशीद्वारे तयार केले जाणारे बीजाणु किंवा स्पोअर्स हे बुरशीच्या जीवनकाळात घडणारी एक प्रक्रिया असते. बूरशीद्वारे तयार केल्या जाणाऱ्या स्पोअर्स (बीजाणू) ह्यांना कोनिडिया, झु-स्पोअर्स, अस्कोस्पोअर्स वै. नावांनी ओळखले जाते. बूरशीद्वारे तयार केले जाणारे स्पोअर्स हे एक प्रकारचे बीज असते, जे लैंगिक किंवा अलैंगिक पध्दतीने बूरशीच्या जीवनाच्या एका ठराविक अवस्थेत तयार केले जातात.

जीवाणूच्या द्वारा त्यांच्या प्रकारानुसार एन्डोस्पोअर्स आणि सिस्टअसे दोन प्रकारचे स्पोअर्स तयार केले जातात. सुडोमोनास, अॅझोटोबॅक्टर, अॅसिटोबॅक्टर, रायझोबियम व ईतर काही जीवाणू हे सिस्ट तयार करतात. सिस्ट जास्त तापमानास सहनशील नसतात. सिस्टची सुप्तावस्था हि बरेच काळ टिकते.

बाजारात मिळणारी जीवाणू असलेली उत्पादने तयार करतांना हवी तितकी संख्या प्राप्त झाल्यानंतर त्यांस हानीकारक परिस्थितीचा सामना करावा म्हणुन तशी परिस्थिती कृत्रिम रित्या निर्माण केली जाते. ह्या अशा परिस्थितीस प्रतिसाद म्हणुन जीवाणू सुप्तावस्थेत जातात. मात्र ह्या प्रक्रियेत थोडी जरी गडबड झाली तर जीवाणू पुन्हा जिवंतः होवु शकत नाही अशा नॉन व्हायबल (Non-Viable) म्हणजेच मेलेल्या स्पोअर्स मध्ये देखिल रुपांतरीत होतात

त्यामुळे हि परिस्थिती निर्माण करुन जीवाणू सुप्तावस्थेत नेणे हे कौशल्याचे आणि अनुभवाचे कार्य आहे.

बॅसिलस स्पे. मधिल जीवाणु हे एन्डोरस्पोअर्स तयार करणारे असतात. एन्डो स्पोरअर्स हे अतिशय टणक आणि अत्यंत हानीकारक परिस्थितीत देखिल सुप्तावस्थेत राहु शकतात. सुडोमोनास, अॅझोटोबॅक्टर, रायझोबियम, अॅसिटोबॅक्टर, अॅझोस्पिरिलम हे जीवाणू स्पोरअर्स तयार करत नाहीत. ह्या जीवाणूंची सुप्तावस्था ही सिस्ट च्या माध्यमातुन पुर्ण होत असते.

 

विजय भूतेकर चिखली.

English Summary: In market products and organisams
Published on: 18 December 2021, 06:02 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)