Agripedia

गेल्या आठवड्यापासून हवामानामध्ये होत असलेल्या बदलांचा परिणाम कांद्याच्या पिकावर होत आहे. तीन-चार दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे हवामानात बदल झाला असून ढगाळ वातावरण कायम आहे.

Updated on 08 February, 2022 4:27 PM IST

गेल्या आठवड्यापासून हवामानामध्ये होत असलेल्या बदलांचा परिणाम कांद्याच्या पिकावर होत आहे. तीन-चार दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे हवामानात बदल झाला असून ढगाळ वातावरण कायम आहे. पाऊस व थंडीमुळे धुक्याचे प्रमाण वाढले असून कांदा वाचविण्यासाठी दुष्काळात शेतकरी निकराचा लढा देत आहे

गेल्या आठवड्यापासून हवामानामध्ये होत असलेल्या बदलांचा परिणाम कांद्याच्या पिकावर होत आहे. तीन-चार दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे हवामानात बदल झाला असून ढगाळ वातावरण कायम आहे. पाऊस व थंडीमुळे धुक्याचे प्रमाण वाढले असून कांदा वाचविण्यासाठी दुष्काळात शेतकरी निकराचा लढा देत आहे.

अवकाळी पावसाने जिल्हाभरात चांगलीच हजेरी लावली असून आतापर्यत सरासरी २४ मिलिमीटर नोंद झाली आहे. थंडीही वाढल्याने धुक्याचे प्रमाण वाढत आहे. आठवड्यापासून ढगाळ वातावरण कायम आहे. या खराब हवामानमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कांदा पीक संवेदनशील असल्याने रोगराईस लवकर बळी पडते. कांदा पोसण्यास व उत्तम दर्जाचा कांदा तयार होण्यास अनुकुल हवामानाची गरज असते. 

सद्यपरिस्थितीत कांदा उत्पादक क्षेत्रामध्ये धुके, ढगाळ हवामानामुळे रोगांचा प्रादुर्भाव व प्रसार वाढत आहे. काढणीस आलेल्या कांद्यावर धुक्याचा परिणाम होणार नसला तरी उशीरा लागवड केलेल्या कांद्यास या हवामानाचा फटका बसणार आहे. हवेतील आर्द्रता वाढल्याने व तापमान घटल्यामुळे करपा रोगाचा प्रसार झपाटयाने होत आहे. ढगाळ हवामानामुळे लसूण पिकांवर करपा रोग व फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. खराब हवामानामुळे उद्भवलेल्या रोगराईशी सध्या शेतकरी हवामानाशी लढा देत आहे. घरगुती उपायाबरोबरच फवारणी करण्यास प्राधान्य देत आहे. कांद्यावर मावा कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसताच कीटकनाशक व बुरशीनाशक एकत्रितरीत्या फवारवा किंवा रोगाच्या अवस्थेनुसार वेगवेगळ्या औषधाची फवारणी करण्याचा सल्ला कृषीतज्ज्ञ देत आहेत.

आठवड्यापासून ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर पाऊसही पडत आहे. काही पिकांना पावसाचा चांगला फायदा झाला असला तरी कांद्याला थंडी व धुक्याचा फटका बसत आहे. धुके हटविण्यासाठी विविध उपाय करत महागड्या औषधाची फवारणीही करावी लागत आहे.

- खराब वातावरणा कांदा पिकाच्या वाढीवर विपरित परिणाम होतो. धुक्यापासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी बुरशीनाशक व कीटकनाशक औषधांची फवारणी करावी.

कसे करावेत उपाय:-

- तुषार सिंचनाचा वापर करून सकाळच्या वेळेस पाच ते दहा मिनिटे त्याचा वापर करावा, जेणेकरून पातीवर जमा असलेले दव पाण्याने धुवून जाईल.

- तुषार सिंचन नसल्यास स्प्रे पंपाने पाण्याची फवारणी करावी.

- वाफ्यात अथवा ठिबकवरील कांद्यास सकाळी थोडे पाणी द्यावे.

- रात्री, तसेच पहाटेच्या वेळी शेतात ओले गवत जाळून रात्री धूर करावा.

- सकाळी कडुनिबांच्या पाल्याने, दोरीने किंवा कापडाच्या साह्याने पातीवरील जमलेले दव हटवावे. 

 

जैविक शेतकरी

शरद केशवराव बोंडे

९४०४०७५६२८

English Summary: In drought frost angaist
Published on: 08 February 2022, 04:27 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)