Agripedia

शेतकरी बंधूंनो उन्हाळी भुईमूग पिकात पीकवाढीच्या सुरवातीच्या अवस्थेमध्ये साधारणतः सहा ते सात आठवड्यापर्यंत आंतर मशागत करून शेत भुसभुशीत व तण विरहित ठेवावे.

Updated on 14 January, 2022 7:13 PM IST

शेतकरी बंधूंनो उन्हाळी भुईमूग पिकात पीकवाढीच्या सुरवातीच्या अवस्थेमध्ये साधारणतः सहा ते सात आठवड्यापर्यंत आंतर मशागत करून शेत भुसभुशीत व तण विरहित ठेवावे. याकरिता सर्वप्रथम पेरणीनंतर नांग्या आढळून आल्यास बी टोकून ताबडतोब नाग्या भरून घ्याव्यात. शेत तणविरहित ठेवण्याकरिता साधारणतः दोन ते तीन वेळा डवरणी आणि आवश्‍यकतेनुसार दोन ते तीन वेळा निंदन करावे. वाना परत्वे साधारणत उन्हाळी भुईमुगाचे पीक पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचे झाले म्हणजे शेवटच्या डवरणी च्या वेळेस पिकास मातीची भर द्यावी याकरिता डवऱ्याच्या दात्याला दोरी बांधून हे भर देण्याचे काम करता येते ही भर दिल्यामुळे भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत घुसून शेंगा चांगल्या पोसण्यास मदत होते

 व उत्पादनात वाढ होते. पिकाचे वय साधारण आठ ते नऊ आठवड्यांचे झाल्यानंतर वाणानुसार तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पिकावर ड्रम फिरवावा. एकदा भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत घुसण्याचा सुरुवात झाल्यानंतर उन्हाळी भुईमूग पिकात आंतरमशागत करू नये कारण त्यामुळे आर्या तुटण्याचा संभव असतो परंतु मोठे तन आढळल्यास हाताने तन उपटत राहावे.

शेतकरी बंधुंनो उन्हाळी भुईमूग पिकात तणनाशकाचा वापर करावयाचा झाल्यास एकात्मिक तण व्यवस्थापन पद्धतीचा भाग म्हणून इतर तन व्यवस्थापनाच्या पद्धती बरोबर आवश्यकतेनुसार योग्य शिफारशीत वेळी शिफारशीप्रमाणे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लेबल क्‍लेम शिफारशीप्रमाणेच तणनाशकाचा वापर करावा. सर्वसाधारणपणे उगवनपूर्व तणनाशकाचा सलग भुईमूग पिकाकरिता वापर करावयाचा झाल्यास 

पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत Pendamethalin 38.7 CS 1750 मिली अधिक 500 ते 700 लिटर पाणी प्रति हेक्टर या प्रमाणात जमीनीवर उगवन पूर्व वापर करावा. यावरून पूर्ण तणनाशकाचा वापर. या उगवणपूर्व तणनाशकाचा वापर उशिरा किंवा उभ्या पिकात टाळावा. उगवन पश्चात उभ्या उन्हाळी भुईमूग पिकात गरजेनुसार तणनाशकाचा वापर करावयाचा असेल तर उन्हाळी भुईमुगाचे पीक साधारणतः 20 दिवसाचे झाले असताना Quizalofop ethyl 5% EC 15 ते 20 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन किंवा Imazethapyr 10 % SL 20 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात कोणत्याही एका तणनाशकाची उन्हाळी भुईमूग पिकात प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊनच वश्‍यकतेनुसार गरज असेल तरच फवारणी करावी. तणनाशकाची फवारणी करताना स्वतंत्र पंप तसेच सुरक्षित तन नाशक फवारणी तंत्राचा अंगीकार करावा तसेच लेबल क्‍लेम शिफारशीची 

 शहानिशा करून घ्यावी.

टीप : (१) तणनाशकाचा वापर करण्यापूर्वी प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन गरज असेल तरच लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे स्वतंत्र पंप वापरून सलग उन्हाळी भुईमूग पिकात तणनाशकाचा वापर करावा

(२) नाशके वापरताना निर्देशीत प्रमाणात निर्देशित वेळी सुरक्षित तणनाशक वापर तंत्राचा वापर करून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापरावी.

 

राजेश डवरे कीटक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र वाशिम

English Summary: In crop intercultural Operation and weed management
Published on: 14 January 2022, 07:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)