Agripedia

राज्याच्या विविध भागात तापमानात घट झाली असून त्याचा पिकांवर परिणाम होत आहे, याबाबत तज्ज्ञांनी पीक परिस्थितीबाबत दिलेला सल्ला.

Updated on 19 January, 2022 6:52 PM IST

राज्याच्या विविध भागात तापमानात घट झाली असून त्याचा पिकांवर परिणाम होत आहे, याबाबत तज्ज्ञांनी पीक परिस्थितीबाबत दिलेला सल्ला.

गहू 

सध्या थंडी आणि ढगाळ हवामान एकत्र असल्याने जेथे वेळेवर पेरणी झालेली आहे, त्या पिकावर तांबेरा रोग, मावा किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. कडाक्याची थंडी ५ दिवसांपेक्षा जास्त राहिली तर, फुलोरा अवस्थेतील पिकाची वाढ मंदावते. जेथे उशिरा पेरणी झाली आहे ते पीक फुटव्याच्या अवस्थेत आहे, त्यामुळे या टप्यातील पिकाला थंडी फायदेशीर ठरेल.

ज्वारी 

जेव्हा तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा खाली जाते तेव्हा ज्वारीच्या वाढीवर परिणाम दिसतो. ७ ते ८ दिवस कडाक्याची थंडी राहिली तर पोटरीतील कणसे तशीच राहतात. त्याचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.

रभरा 

थंडी आणि ढगाळ हवामान कायम राहिले तर फुलगळीची समस्या दिसून येईल, तसेच घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढुन ज्याठिकाणी केवळ थंडीचे वातावरण आहे तेथे पीक वाढीस फायदा होणार आहे.

द्राक्ष 

वाढत्या थंडीमुळे मण्यामध्ये क्रकिंगची समस्या वाढेल. ती आटोक्यात ठेवण्यासाठी पाणी उतरण्यापूर्वीच्या अवस्थेतील बागेमध्ये तज्ज्ञांच्या शिफारशीनुसारच कॅल्शिअम अधिक मॅग्नेशिअमची फवारणी करावी. बागेतील जमीन वाफसा स्थितीमध्ये राहील, याची काळजी घेऊन, पिंक बेरीची समस्या वाढू नये यासाठी तापमान कमी होताच ठिकठिकाणी शेकोट्या पेटवाव्यात, पाणी द्यावे. घड पेपरने झाकावेत. थंडी वाढल्यास मण्यांचा आकार वाढण्यात अडचणी येतील. त्यासाठी बोदावर आच्छादन महत्त्वाचे असुन त्यासोबत मुळे कार्यरत राहील, यासाठी उपाययोजना कराव्यात.

डाळिंब

सध्या थंडीमध्ये वाढ झालेली असून तापमान २५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे अशा ठिकाणी नवीन बहार पकडलेला असल्यास फुले येण्यामध्ये समस्या होऊ शकतात. डाळिंबामध्ये फुले चांगल्या प्रकारे येण्यासाठी तापमान २८ -३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असले पाहिजे. बऱ्याच ठिकाणी दिवसाचे तापमान अधिक आणि रात्रीचे तापमान एकदम कमी राहत आहे. दिवस आणि रात्रीच्या तापमानातील वाढत्या फरकामुळे फळे तडकण्याचे (क्रॅकिंग) प्रमाण वाढू शकते. क्रॅकिंग टाळण्यासाठी बागेत पाणी देण्याचे योग्य नियोजन करावे. एकाच वेळी जास्त पाणी देण्यापेक्षा रोज थोडे थोडे आणि संध्याकाळी चारनंतर पाणी द्यावे. यामुळे बागेत आर्द्रतेचे प्रमाण योग्य राहून थंडी कमी राहण्यास मदत होते.

हापूस आंबा 

ज्या बागेत अजून मोहोर फुटलेला नाही तेथे थंडीमुळे मोहोर फुटण्यास चालना मिळेल. ज्या बागेत मोहोर फुटलेला आहे तेथे तापमान ६ अंश पेक्षा खाली गेले तर बागेत उपयुक्त कीटकांची हालचाल कमी झाल्याने परागीकरण कमी होईल. अशा काळात शक्यतो अनावश्यक फवारणी टाळावी. कोकणातील सध्याची परिस्थिती पाहता कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता नाही, असा हवामान अंदाज आहे.

केसर आंबा 

सध्याची थंडी कायम राहिली तर चांगला मोहोर फुटण्यास अनुकूल वातावरण आहे.

केळी 

थंडीच्या कालावधीत वाढ होत असल्याने बागेमध्ये रात्रीच्या वेळी पाणी देऊन तसेच बागेच्या चारीही बाजूने शेकोटी करावी, त्यामुळे काही प्रमाणात तापमान वाढेल. नवीन लागवडीमध्ये नांग्या भरून घ्याव्यात.

मोसंबी 

सध्या आंबे बहराचा फुलोरा आहे.त्यामुळे ही थंडी अनुकूल ठरेल. अशा बागांमध्ये आंबवणीचे पाणी तसेच खतमात्रा देऊन ताण तोडावा.

संत्रा 

जानेवारी महिन्यात दुसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसाने व काही भागात झालेल्या गारपिटीने बागेतील पाण्याचा ताण तुटला आहे. जवळपास सर्व बागांमध्ये डिसेंबर महिन्यात साधारण ३० ते ४० दिवस पूर्ण झाले आहेत. जानेवारीत झालेल्या पावसानंतर आता बागेमध्ये पाणी सुरू करण्यास हरकत नाही. रात्रीचे तापमान थंड जरी झाले तरी एक-दोन दिवसांत दिवसभर ऊन पडेल. दुपारचे तापमान फुले येण्याच्या प्रक्रियेस अनुकूल राहून जानेवारी अखेरीस पूर्ण बागेमध्ये फुले येतील. ही लवकर आलेली फुले व फळधारणा योग्य राहील, अशी अपेक्षा आहे. सध्या बागेमध्ये शिफारशीप्रमाणे खतांच्या मात्रा द्याव्यात

English Summary: In crop effect of cold
Published on: 19 January 2022, 06:52 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)