Agripedia

विस्तार शिक्षण संचालनालय,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे वतीने

Updated on 20 February, 2022 11:21 PM IST

विस्तार शिक्षण संचालनालय,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे वतीने जिल्हा नियोजन व विकास समितीचे सहयोगातून अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यांमधून 2700 युवक-युवतींना कृषी आधारित रोजगार तथा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत कृषी-आधारित उद्योजकता संदर्भात दोनदिवसीय कृतीयुक्त प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. या प्रशिक्षणाचे मालिकेत आता अगदी मोजकेच प्रशिक्षणे शिल्लक राहिली असून सोमवार - मंगळवार दिनांक 21-22 आणि गुरुवार - शुक्रवार दिनांक 24- 25 फेब्रुवारी दरम्यान फक्त युवकांसाठी 

" सेंद्रिय शेती निविष्ठा उत्पादन तंत्रज्ञान " या विषयावरील 75 युवकांची एक बॅच आणि " व्यावसायिक कोंबडी पालन तंत्रज्ञान " विषयावरील 75 युवकांची एक बॅच साठी नोंदणी सुरु आहें.

सेंद्रिय शेती निविष्ठा उत्पादन तंत्रज्ञान विषयावरील प्रशिक्षण शेतकरी सदन येथील कृषी जागर सभागृहात तर व्यावसायिक कोंबडी पालन तंत्रज्ञान विषयावरील प्रशिक्षण पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे सेमिनार हॉलमध्ये आयोजित केले आहे.

कृपया गरजवंत युवकांनी श्री निखील दाबेकर (मोबाईल क्रमांक 9405471844)यांचे कडे नावे नोंदवावीत. पूर्वनोंदणी करूनच या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेता येणार आहें. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या सहयोगातून अकोला जिल्ह्यातील युवा वर्गाला उद्यमशील बनविण्यासाठीच्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा व उद्योजकतेकडे एक पाऊल पुढे टाकावे असे कळकळीचे आवाहन संचालक विस्तार शिक्षण डॉ. राजेंद्र गाडे यांनी केले आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे वतीने जिल्हा नियोजन व विकास समितीचे सहयोगातून अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यांमधून 2700 युवक-युवतींना कृषी आधारित रोजगार तथा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत कृषी-आधारित उद्योजकता संदर्भात दोनदिवसीय कृतीयुक्त प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. या प्रशिक्षणाचे मालिकेत आता अगदी मोजकेच प्रशिक्षणे शिल्लक राहिली आहे.

English Summary: In akola dist youth agriculture business training program
Published on: 20 February 2022, 11:21 IST