आपल्या देशात तुर हे प्रमुख कडधान्य पीक आहे. भारतामध्ये जवळ-जवळ 32.65 लाख हेक्टर क्षेत्रावर तूर पिकाची लागवड केली जाते. जर राज्यांचा विचार केला तर तूर लागवडीचे क्षेत्र महाराष्ट्रात जास्त आहे. देशातील एकूण तूर लागवडीखालील क्षेत्रापैकी 25 टक्के 17 एकट्या महाराष्ट्र राज्यात आहे.
खरीप हंगामातील तुर हे महत्त्वाचे पीक असून या कडधान्यांमध्ये 15 ते 20 टक्के प्रथिने असतात. तूर हा मानवी आहारातील एक सकस व पोषक घटक आहे. या लेखात आपण तूर पिकाच्या सुधारित लागवड तंत्राविषयी माहिती घेणार आहोत.
तूर लागवड तंत्रज्ञान
- जमीन- तूर पिकासाठी मध्यम ते भारी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन फायद्याची असते. तुर पिकासाठी क्षारयुक्त व आम्लयुक्त जमीन चालत नाही कारण तूर पिकाच्या मुळावरील रायझोबियम जिवाणूंच्या गाठींची अशा जमिनीत योग्य वाढ होत नसल्याने तर रोपे पिवळी पडतात. तसेच चोपण आणि पाणथळ जमिनीत देखील तूर चांगली येत नाही.
- हवामान- तूर उगवण्याच्या वेळेस हवामान दमट व आद्रता असलेले असले करते पिकासाठी पोषक असते. 21 ते 25 अंश सेंटिग्रेड तापमानात आणि उष्ण हवामानात तुरीचे काही वाण चांगले उत्पन्न देतात. वार्षिक सरासरी 700 ते हजार मीटर पर्जन्यमान असणाऱ्या तूर पीक चांगले येते. तुरीच्या लागवडीनंतर पहिल्या एक ते दिड महिन्याच्या कालावधीत नियमितपणे चांगला पाऊस असणे फार महत्त्वाचे आहे. जेव्हा तुरीच्या शेंगा पक्व होतात किंवा पीक फुलोऱ्यात असते तेव्हा प्रकार सूर्यप्रकाश महत्त्वाचा असतो.
- लागवडीच्या आधी पूर्वमशागत- हे पीक मध्यम ते भारी जमिनीत येत असल्यामुळे लागवड यादी जमिनीची चांगली नांगरट करावी आणि कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.खोल नांगरट केली तरतुर पिकावरील मर रोगास कारणीभूत ठरणाऱ्या बुरशी,जिवाणू आणि कीटकांचा काही अंशी नाश होण्यास मदत होते.
- लागवडीआधी बीजप्रक्रिया महत्त्वाची- पेरणीपूर्वी तुरीच्या बियाण्यास क्लोरोथिलोनील 75 डब्ल्यू पी या बुरशीनाशकाची चार ग्रॅम किंवा दोन ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा 25 ग्रॅम रायझोबियम व स्फुरद विरघळणारे जिवाणूगुळाच्या थंड द्रावणात मिसळून लावावे.नंतर बियाणे सावलीत वाळवून लगेच पेरणी करावी. याचा फायदा असा होतो की मुळांवरील गाठी चे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेतल्यामुळे पीक उत्पादन 15 ते 20 टक्क्यांनी वाढून जमिनीचा पोत सुधारतो.
- खत व्यवस्थापन- पेरणी अगोदर जेव्हाशेवटची कुळवणी करतात त्यावेळी हेक्टरी दहा ते पंधरा गाड्या चांगले कुजलेले शेणखत द्यावे.तसेच सलग तुरीच्या पिकास 25 किलो नत्रव 50 किलो स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे. आंतरपीक असल्यास ज्या पिकाच्या ओळी जास्त त्या पिकाची शिफारस केलेली खतमात्रा द्यावी.
- आंतर मशागत- लावल्यानंतर 30 ते 45 दिवसांपर्यंत पीक तणविरहित ठेवावे.जेव्हा पीक 20 ते 25 दिवसांचे असेल तेव्हा पहिली आणि 30 ते 35 दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी.
- पाणी व्यवस्थापन -तूर पीक फुलोऱ्यात असताना व शेंगांमध्ये दाणे भरतानापाण्याच्या तीन पाळ्या दिल्यास उत्पादनात वाढ होते. तुरीच्या पिकात पाणी साचू देऊ नये कारण यामुळे रोपे मरण्याची शक्यता असते. ठिबक पद्धतीने लागवड केली असेल तर उत्पादन दुपटीने वाढते.
- संजीवके-
- तूरीचे पीक कळी अवस्थेत येण्याच्या वेळी त्यावर पोटॅशियम नायट्रेट 100 लिटर पाण्यात पाचशेग्रॅम अधिक लिवोसिन20 मिली मिसळून फवारावे..
- तुरीचे पीक बारीक शेंगा अवस्थेत असताना त्यावर जिब्रेलिक एसिड एक ग्रॅम 100 लिटर पाण्यात अधिक बेंझीनएडेनाइड (6 बीए)एक ग्रॅम 100 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.
9- कीड नियंत्रणासाठी जैविक पद्धत- काही प्रयोगांवरून आलीकडे सिद्ध झाले आहे की वनस्पतीजन्य औषधांचाकिंवा जैविक पद्धतीचा अवलंब करून सुद्धा तितक्याच प्रभावीपणे किडींचे नियंत्रण करता येते. या औषधांमुळे उपकार किडींचा नाश होत नाही.यामध्ये निंबोळी अर्क 65 टक्के किंवा न्यूक्लियर पॉली हैड्रॉसिस( एन पी व्ही) 250 मिली रोगग्रस्त अळ्यांचे द्रावण500 लिटर पाण्यातून एक हेक्टर क्षेत्रावर फवारावे.रासायनिक औषधे व जैविक पद्धत यांचा अल्टुं पालटून फवारणी मध्ये उपयोग केला तरतुरीवरील घाटे आळीचे चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येणे शक्य होते.. तुरीवरील मरआणिवांझ वांझरोगापासून संरक्षण करण्यासाठी प्रामुख्याने या रोगांना प्रतिकारक्षम असणाऱ्या जातींची लागवड करावी.
Published on: 06 December 2021, 01:16 IST