रब्बी हंगामात प्रामुख्याने गहू आणि हरभरा ही दोन पिके घेतली जातात. या वर्षी हरभरा लागवड मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. हरभरा लागवडी मध्ये प्रामुख्याने हरभऱ्याचे देशी वाण व काबुलीवाण असे दोन प्रकार आहेत. परंतु जर अधिक उत्पादनक्षम सुधारित वाणांची निवड केली तर उत्पादनात वाढ होते. या लेखात आपण हरभरा लागवडीविषयी माहिती घेऊ.
हरभऱ्याचा पेरणीचा कालावधी
- जिरायतीक्षेत्र- हरभरा लागवड जिरायती क्षेत्रात करायचे असेल तर 15 ऑक्टोबरपर्यंत करावी.
- बागायती क्षेत्र- हरभरा लागवड बागायत क्षेत्रात करायचे असेल तर ते 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान करावी.
हरभरा पेरणी आंतर
- जिरायतक्षेत्र- हरभरा पेरणी जिरायत शेतात करायची असेल तर ती 30×10 सेंटी मीटर अंतरावर करावी.
- बागायती क्षेत्र- हरभरा पेरणी बागायती क्षेत्रात करायची असेल तर ती 45×10 सेंटीमीटर अंतरावर करावी.
प्रति हेक्टरी बियाण्याचे प्रमाण
हरभरा पेरणी करताना बियाणे ही आकारमानानुसार वापरावी लागते. लहान आकाराच्या देशी वानासाठी 60 किलो बियाणे पुरेसे होते मध्यम आकाराचे बियाण्यासाठी 70 किलो प्रति हेक्टरी बियाणे लागते. काबुली वाणासाठी 100 किलो प्रति हेक्टरी बियाणे लागते.
हरभरा पिकाच्या सुधारित जाती ( देशी )- बीडीएनजी-797, बीडीएनजी-9-3, दिग्विजय, जाकी-9218, साकी-9516, विजय ( फुलेजी81-1-1), फुले विक्रम एकेजी 46, भारती( आय सी सी व्ही-10) इत्यादी.
हरभऱ्याचे काबुली वाण
बीडीएनके-798, पीकेव्ही काबुली 2, पीकेव्ही काबुली 4, श्वेता( आयसीसीव्ही-2), विराट, कृपा ( फुले कृपा )
खत व्यवस्थापन
चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत पाच टन प्रति हेक्टर आवश्यक असते.
कोरडवाहू क्षेत्रासाठी खत व्यवस्थापन
20 किलो नत्र, 40 किलो स्फुरद
बागायती क्षेत्रासाठी खत व्यवस्थापन
50 किलो युरिया आणि तीनशे किलो एम एस पी, 50 किलो एमओपी किंवा 125 किलो डीएपी ती 50 किलो एमओपी
(संदर्भ- ॲग्रोवन)
Published on: 13 December 2021, 07:27 IST