Agripedia

चवळीचे पीक महाराष्ट्रात जवळ जवळ वर्षभर घेता येते. परंतु ठराविक जातच लावावी कारण चवळी पिकाच्या जाती दिवसातील प्रकाशाच्या कालावधीनुसार वाढतात. चवळीच्या काही जाती उदाहरणार्थ पुसादो फसली आणि पुसा ऋतुराज या पावसाळी व उन्हाळी हंगामात लावता येतात.

Updated on 21 November, 2021 7:16 PM IST

चवळीचे पीक महाराष्ट्रात जवळ जवळ वर्षभर घेता येते. परंतु ठराविक जातच लावावी कारण चवळी पिकाच्या जाती दिवसातील प्रकाशाच्या कालावधीनुसार वाढतात. चवळीच्या काही जाती उदाहरणार्थ पुसादो फसली आणि पुसा ऋतुराज या पावसाळी व उन्हाळी हंगामात लावता येतात.

चवळीच्या उन्हाळी पिकासाठी शिफारस केलेल्या जाती खरीप हंगामात लावल्यास फक्त पानांची वाढ होते आणि शेंगा धरत नाहीत. चवळीची पुसा बरसाती ही जात खरीप हंगामातच लावायला हवी.या लेखात आपण चवळीचे काही सुधारित वाण व त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेऊ.

चवळी चे वाण व त्यांची वैशिष्ट्ये

  • पुसाफाल्गुनी- पुसा फाल्गुनी ही चवळी ची जात उन्हाळी हंगामासाठी ( फेब्रुवारी व मार्च पेरणी)वानाचा विकास करण्यात आला आहे.प्रत्येक झाडाला 12 ते 15 फांद्या येतात आणि सर्वसाधारण एका झाडाला 133 शेंगा लागतात.
  • पुसा बरसाती-पुसा बरसाती हे लवकर येणारी जात असून खरीप हंगामासाठी या जातीची शिफारस केली आहे. या जातीच्या शेंगा पिवळ्या हिरव्या रंगाच्या आणि 25 ते 27 सेंटिमीटर लांब असतात.
  • पुसादो- फसली-हावाणपुसा फाल्गुनी आणि फिलिपिन्समधील लांब शेंगांच्यावानाच्या संकरातून विकसित केला आहे. हा वाण उन्हाळी आणि खरीप हंगामातील लागवडीसाठी योग्य आहे.या जातीची झाडे बुटकी असून शेंगा 18 सेंटिमीटर लांब, सरळ आणि हिरव्या रंगाच्या असतात.
  • बी लावल्यानंतर 35 ते 40 दिवसात या जातीला फुले येतात. या जातीचे जवळजवळ दहा तोळे मिळतात आणि त्यापासून प्रति हेक्‍टरी दहा टन उत्पादन मिळते.
  • पूसा कोमल- हा जिवाणूंमुळे होणारा करपा रोगाला प्रतिबंधक वान असून पुसादोफसली ज्या मानाने लवकर तयार होणारा लांबशेंगांचा, अधिक उत्पादन देणारा आहे खरीप आणि उन्हाळी हंगामात देण्यास योग्य, 45 दिवसात फुले यायला सुरुवात होते.
English Summary: improvise veriety of cowpea crop that give more production
Published on: 21 November 2021, 07:16 IST