Agripedia

भेंडी भाजीपाला पिकाचा विचार केला तर त्याचे उगमस्थान आफ्रिकेमध्ये आहे. भारतात भेंडीच्या वेगवेगळ्या अनेक प्रजाती उपलब्ध आहेत. भारत हा जगातील सर्वाधिक उत्पादन घ्यायला देशांमध्ये अग्रेसर आहे.भारतात उत्तरप्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल हे भेंडी उत्पादनांमध्ये अग्रेसर आहेत

Updated on 19 November, 2021 6:42 PM IST

भेंडी भाजीपाला पिकाचा विचार केला तर त्याचे उगमस्थान आफ्रिकेमध्ये आहे. भारतात भेंडीच्या वेगवेगळ्या अनेक प्रजाती उपलब्ध आहेत. भारत हा जगातील सर्वाधिक उत्पादन घ्यायला देशांमध्ये अग्रेसर आहे.भारतात उत्तरप्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल हे भेंडी उत्पादनांमध्ये अग्रेसर आहेतभेंडी भाजीपाला पिकाचा विचार केला तर त्याचे उगमस्थान आफ्रिकेमध्ये आहे. भारतात भेंडीच्या वेगवेगळ्या अनेक प्रजाती उपलब्ध आहेत. भारत हा जगातील सर्वाधिक उत्पादन घ्यायला देशांमध्ये अग्रेसर आहे.भारतात उत्तरप्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल हे भेंडी उत्पादनांमध्ये अग्रेसर आहेत

भेंडी आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्त्वपूर्ण आहे.भेंडीमध्ये विविध प्रकारची खनिजे, लोह आणि जीवनसत्त्वांचे प्रमाण मुबलक आहे. भेंडीचे तसे वेगवेगळ्या प्रकारचे उपयोग आहेत.या लेखात आपण भेंडीच्या सुधारित लागवड तंत्रज्ञान विषयी माहितीघेऊ.

 भेंडी लागवडीविषयी माहिती(information of okra cultivation)

अ)हवामान(climate)-

1-भेंडी पिकाला उष्ण,उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. 22 ते 35 अंश सेल्सिअस तापमानात भेंडीची वाढ चांगली होते.

2-भेंडीला  जास्त थंडी सहन होत नसून 20 अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानात उगवण क्षमता कमी होते.

3- जास्त तापमान आणि कमी आद्रता काळात पिकाची वाढ थांबते.

4- 42 अंश यापेक्षा अधिक तापमानात फुलांची गळ होते व उत्पादन कमी होते.

5- थंडी कमी असल्यास वर्षभर कधीही भेंडीची लागवड करता येते.

 दमट हवामानात भेंडी पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.

आ) जमीन(land)-

भेंडीचे पीक घेण्यासाठी हलक्या, मध्यम तसेच भारी जमिनीत चांगले येते. परंतु जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी.

इ) हंगाम(season)-

1-भेंडीची लागवड वर्षभर केली जाऊ शकते. जर भेंडीच्या अधिक उत्पादन घ्यायचे असेल तर खरीप व उन्हाळी हंगामात भेंडीची लागवड करणे फायद्याचे ठरते.

2- उन्हाळी हंगाम जानेवारीच्या दुसऱ्या ते तिसरा आठवडा ते मार्च

3- खरीप हंगामात जून ते ऑगस्ट या महिन्यात

4-भेंडीचा  सतत पुरवठा करायचा असेल तर भेंडी 15 ते 20 दिवसांचे अंतर ठेवून टप्प्या टप्प्यात  लागवड करावी.

ई) भेंडीची लागवड(okra cultivation)-

1- भेंडी लागवड करण्याअगोदर मशागत करताना चांगली नांगरणी करावी. नंतर दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.

 सरी आणि वरंबा किंवा सपाट जमिनीवर लागवड करावी.चांगल्या वाढीसाठी वअधिक उत्पादनाकरिता निंबोळी पेंड किंवा कोंबडी खताचा वापर करावा.

3- खरीप हंगामात दोन ओळीतील अंतर 75 ते 60 सेंटिमीटर ठेवावे आणि उन्हाळ्यात लागवड करायची असेल तर 45 सेंटिमीटर ठेवावे. दोन झाडांमधील अंतर 30 ते 45 सेंटिमीटर राहील अशा हिशोबाने बी टोकावे. जमिनीचा पोत बघूनआंतर  कमी-जास्त करावे.

4- भेंडी लागवड करताना प्लास्टिक आच्छादनाचा वापर केला तर उत्पादनामध्ये वाढ होते ओलावा टिकून राहतो.

5-आच्छादन केल्यामुळे अधिक प्रमाणात फुलांची संख्या,उत्कृष्ट प्रकारे फळधारणा, जास्तीचे फुटवे आणि फळांचे वजन वाढून उत्पादनामध्ये वाढ होते.

उ) बियाण्याचे प्रमाण(Quantity of seeds)- उन्हाळ्यात हेक्‍टरी 10 किलो, खरीप हंगामात  आठ किलो बियाणे पुरेसे होते. यामध्ये लागवडीचे अंतर, अंगावर आणि बियाण्याची उगवण क्षमता यावरून बीयाण्याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते.

ऊ) खत व्यवस्थापन(fertilizer management)-

1- 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत

2- नत्र,स्फुरद, पालाश 100:50:50 किलो प्रति हेक्‍टरी द्यावा.

3- नत्राचा पुरवठा आवडीच्या वस्तू नुसार विभागून द्यावा.

4- फवारणी व ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खतांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास उत्पादनामध्ये वाढ होते.

ए) पाणी व्यवस्थापन(water management)- भेंडी पिकाला उन्हाळी हंगामात पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणे गरजेचे असते.ठिबक सिंचनाचा वापर फायदेशीर ठरतो.सुरवातीच्या वाढीच्या अवस्थेत अडीच लिटर पाणी प्रति चार चार याप्रमाणे प्रत्येक दिवस गरजेचे असते. त्यानंतर 7.6 लिटर पाणी प्रति चार झाड याप्रमाणे गरज असते. एक दिवस आड ठिबकद्वारे पाणी द्यावे.

ऐ)रोग व कीड(Disease and insect)-

1-रोग-भुरी, केवडा, पानांवरील ठिपके,यलो व्हेन मोझॅक, मररोग इत्यादी

2-कीड- फळ पोखरणारी आळी, खोडकीड, मावा,तुडतुडे, लाल कोळी इत्यादी

 एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन(management of disease and insect)-

  • जमिनीची खोल नांगरणी करावी.
  • पांढरी माशी, फुलकिडे, तुडतुडे व्यवस्थापनाकरिता निळ्या  तसेच पिवळ्या रंगाचे दहा सापळे प्रति हेक्‍टरी या प्रमाणात शताब्दी लावावे.
  • रोग कीडग्रस्त झाडे शेतातून उपटून नष्ट करावे.
  • किडींच्या व्यवस्थापन करीता पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
  • प्रत्येक 10 ओळींनंतर एक ओळ झेंडू फुलांची लावावे.किडिनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली तरच रासायनिक कीटकनाशकांचा वापर शिफारशीत मात्रेत करावा.

भेंडीचे काढणी (okra harvesting)-

  • लागवडीपासून फूल लागायला 35 ते 40 दिवसांनी सुरुवात होते. त्यानंतर 55 ते 65 दिवसांनी तोडणी सुरू होते. साधारण दोन ते तीन इंच लांब भेंडीचे तोडणी करा. एक दिवस आड काळजीपूर्वक तोडणी करावी. तोडणीनंतर भेंडी सावलीत ठेवावी.
  • फळांच्या आकारानुसार वर्गवारी करून, त्यामधील रोगट व वेडीवाकडी फळे काढून टाकावी.
  • भेंडीचे हेक्‍टरी उत्पादन 12 ते 15 टन मिळते.
English Summary: improvise technique of okra cultivation and management
Published on: 19 November 2021, 06:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)