रब्बी हंगामात पिकल्या जाणाऱ्या कडधान्य पैकी हरभरा हे फार महत्वाचे पिक आहे. दक्षिण पुर्व तुर्की मध्ये हरभराच्या शेती करण्यास सुरूवात झाली होते. आज भारत, पाकिस्तान आणि तुर्की मध्ये सर्वात जास्त लागवड केली जाते. हरभरा पिकासाठी कमी पाणी आणि कमीत कमी खर्चात जास्त उत्पादन केले जाते. हरभरा हे द्विदल वर्योय पिक असुन नायट्रोजनचे स्थिरीकरण करून जमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत करते. शेतकऱ्यांना आर्थिकदृट्या सधन करणारे हरभरा हे महत्वाचे कडधान्य पिक आहे.हरभरा भरघोस उत्पादन वाढीसाठी सुधारीत वानांचा निवड करणे योग्य वेळेवर पेरणी करणे, रासायनिक खताचा वापर, पाणी व्यवस्थापन आणि कीड व्यवस्थापन याकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे. प्रगतिशिल शेतकरी सुधारीत वनाचा उपयोग करून सरासरी हेक्टरी उत्पादन ३० ते ३५ क्विटलपर्यत करतो. हरभरा पिकाचे उत्पादन कमी होण्यामाचे महत्वाचे कारण घाटे अळी आणि बुरशी जन्य रोग हे आहे. त्याचबरोबर काही प्रमाणात चुकीच्या वाणाची निवड आणि चुकीचे कीड नियंत्रण हे पण उत्पादन कमी करते.
उत्पादन वाढीसाठी खालील योजना कराव्या
- पेरणीसाठी योग्य शेतीची निवड करावी आणि पर्वमशागत करून घ्यावी
- वेळेवर पेरणी करावी आणि दोन झाडांमध्ये योग्य उंतर ठेवावे
- बिजप्रक्रिया करावी
- जीवाणू संवर्धंनाचा वापर करावा
- योग्य वानाची निवड करावी
- रोग आणि किडीचे योग्य नियंत्रण करावे
- खत आणि पाण्याचे योग्य नियोजन करावे
देशी हरभरा
हा प्रामुख्याने डाळीकरता व बेसनाकरिता वापरतात. देशी हरभरा दाण्याचा रंग पिक्कट काळ्या ते पिवळसर असतो. दान्याचा आकार मध्यम असतो
वाण |
उत्पादन (क्विंटल /हेक्टरी) |
पिकाचा कालावधी (दिवस) |
बियण्याची उपलब्धता |
वैशीष्टे
|
पीकेव्ही-हरिता |
15 |
106-110 |
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला |
मररोगास प्रतिकारक्षम, कोरडी मुळ कुज, आधिक तपमान व दुष्काळ सहनशील, लवकर परिपक्व होणार, निमपसरा वाण, मोठे हिरवा रंग असणारे दाणे |
बी डी एन जी-797 |
15-16 |
102 |
कृषी संशोधन केंद्र बदनापूर, महाराष्ट्र |
मर रोगास व घाटेअळीस सहनशील, निमपसरट,जिरायत भागासाठी योग्य मध्यम आकाराचे दाणे |
दिग्विजय |
17 |
110 |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी |
मर रोगास प्रतिकारक, करपा, उष्णता, अस्कोकाईटा ब्ळाईट व कमी पाणी सहनशील |
राज विजय हरभरा 202(जे एस सी 55) |
20 |
102 |
आर ए के कृषी विद्यालय आर व्हि एस के व्हि व्हि,सिहोर ,मध्यप्रदेश |
बागायत व उशिरा पेरणीस योग्य मर व कोरडी मुळ कूज रोगास सहनशील |
जेजी-16 (साकी-9516) |
19-20 |
120 |
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला |
मर रोगास प्रतिकारक्षम, मानकुजव्या बोट्रीटिस करडी बुरशी स्टंट (बुटका) रोगास मध्यम प्रतिकारक्षम, आकर्षक फिक्कट तपकिरी रंग व त्रिकोणी दाणे, कोरडवाहु आणि बागायती क्षेत्रासाठी योग्य, निमपसरी, भरपुर शाखा असणारा वाण |
जाकी 9218
|
18-20 |
120 |
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला |
जिरायत व बागायत साठी योग्य |
राज विजय हरभरा 203(जे एस सी 56) |
19 |
100 |
आर ए के कृषी विद्यालय आर व्हि एस के व्हि व्हि,सिहोर ,मध्यप्रदेश |
बागायत व उशिरा पेरणीस योग्य मर व कोरडी मुळ कूज रोगास सहनशील |
विजय (फुले जी ८१-१-१) |
जिरायत 14-19, बागायत 35-40, उशिरा पेरणी 16-18 |
105-110 |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी |
पाण्याचा तान सहन करण्याची क्षमता, मर रोगास प्रतिकारक्षम, हा वान बुटका तसेच पसरट असून पाने, घाटे व दाणे आकाराने मध्यम आहे |
विशाल |
जिरायत 14-19, बागायत 30-39, |
110-115 |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी |
मर रोगास प्रतिकारक्षम, पिवळ्या रंगाचे टपोरे दाणे, अधिक उत्पादनक्षम, निमपसरट व पाने , घाटे आकाराने मोठे तसेच गर्द हिरवे असतात |
फुले विक्रम |
जिरायत 16-18, बागायत 40-42, उशिरा पेरणी 22-24 |
105-115 |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी |
मर रोगास प्रतिकारक्षम, झाडाची ऊंची 1 ते 2 फुट असून घाटे हे जमिनीपासून १ फुटावर लागल्यामुळे हार्वेस्टर्णे काढणी करण्यास योग्य |
फुले जी - 12 |
जिरायत 12-13, बागायत 20-30 |
110-115 |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी |
आकर्षक पिवळसर तांबूस दाणे |
राजस |
जिरायत 14-19, बागायत 35-40, उशिरा पेरणी 16-20 |
100-105 |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी |
मर रोगास प्रतिकारक्षम, पिवळसर तांबूस आणि टपोरे दाणे, उशिरा पेरणीसाठी योग्य |
फुले विक्रांत |
बागायत 35-40 |
105-110 |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी |
मर रोगास प्रतिकारक्षम, पिवळसर तांबूस मध्यम दाणे |
फुले विकास |
जिरायत 10-11, बागायत 22-24 |
105-110 |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी |
मध्यम दाणे, दाने साठून ठेवण्याच्या वेळेत कडधान्य भुंगेरे मुळे होणारे नुकसान कमी होते |
फुले विश्वास |
जिरायत 10-11, बागायत 28-30 |
115-120 |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी |
टपोरे दाणे |
साकी 9516 |
जिरायत 14-19, बागायत 30-32 |
105-110 |
|
मर रोगास प्रतिकारक्षम, दाणे आकाराने मध्यम |
भारती (आय सी सी सी 10) |
जिरायत 14-19, बागायत 30-32 |
110-115 |
आय सी आर आय एस ए टी, हैदराबाद |
मर रोगास प्रतिकारक्षम, पाण्याचा तान सहन करण्याची क्षमता |
आय सी सी सी 37 |
16-20 |
90-100 |
आय सी आर आय एस ए टी, हैदराबाद |
मर रोगास प्रतिकारक्षम, लवकर येणारा वान, घाटे अळीस सहनशील |
- काबुली हरभरा
हा हरभरा छोले भटोरे आणि भाजी बनवण्यासाठी जास्त वापरात हा आकाराने देशी हरभरा पेक्षा मोठा असतो.काबुली हरभराचा रंग पाढरा असतो.
वाण |
उत्पादन (क्विंटल /हेक्टरी) |
पिकाचा कालावधी (दिवस) |
बियण्याची उपलब्धता |
वैशीष्टे
|
पीकेव्ही काबुली 4 |
15-18 |
100-120 |
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला |
कोरडे रूट सडणे बोट्रीटीस राखाडी बुरशीजन्य रोग आणि वाळवण्यास सहनशील, सिंचनासाठी अनुकूल परिस्थिती, विस्तृत पाने असलेले अर्ध पसरणारे, जास्त मोठे पांढरे बियाणे |
बीडीएनजीके 798 |
16-18 |
120-135 |
ए आर एस, जालना |
विल्ट आणि स्टंटसाठी मध्यम प्रतिरोधक, सिंचनाची परिस्थिती पेरणीसाठी योग्य, पांढरा मध्यम धान्ये |
आयपीसीके 2004-29 |
20 |
105-110 |
भारतीय डाळी संशोधन संस्था, कानपूर, उत्तर प्रदेश |
सिंचनासाठी अनुकूल परिस्थिती, हलके हिरव्या झाडाची पाने असलेले पांढरे बियाणे |
आयपीसीके 2002-29 |
20-22 |
107 |
भारतीय डाळी संशोधन संस्था, कानपूर, उत्तर प्रदेश |
सिंचनासाठी उपयुक्त; फिकट हिरव्या झाडाची पाने असलेले, मोठे पांढरे बियाणे |
फुले जी 0517 |
18 |
110 |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी |
सिंचनासाठी अनुकूल परिस्थिती, विस्तृत पाने असलेले अर्ध पसरणारा वनस्पती प्रकार, हस्तिदंत पांढरा अतिरिक्त मोठा बिया |
पूसा शुभ्रा (बीडीजी 128) |
18 |
120 |
भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली |
सिंचनासाठी उपयुक्त, हलके हिरव्या झाडाची पाने असलेले अर्ध ताठ रोपे, मोठे दाणे |
विराट |
जिरायत 10-12, बागायत 30-32 |
110-115 |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी |
मर रोगास प्रतिकारक्षम, अधिक टपोर्या दाण्याचा असल्या मुळे अधिक बाजारभाव |
विहार |
जिरायत 10-12, बागायत 30-32 |
110-115 |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी |
मर रोगास प्रतिकारक्षम, अधिक टपोर्या दाण्याचा असल्या मुळे अधिक बाजारभाव |
कृपा |
16-18 |
110-115 |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी |
मर रोगास प्रतिकारक्षम, दाणे अधिक टपोरे आणि रंग सफेद पांढरा असल्यामुळे याला आकर्षक बाजार भाव मिळतो |
पिकेव्हि काबुली – 2 (काक 2) |
26-28 |
110-119 |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी |
मर रोगास प्रतिकारक्षम, अधिक टपोर्या दाण्याचा असल्या मुळे अधिक बाजारभाव |
श्वेता (आय सी सी सी 2) |
जिरायत 8-10, बागायत 20-22 |
जिरायत 85-90, बागायत 100-109 |
आय सी आर आय एस ए टी, हैदराबाद |
मर रोगास प्रतिकारक्षम, अधिक टपोर्या दाण्याचा असल्या मुळे अधिक बाजारभाव, बोट्रीटिस ग्रे मोल्ड प्रतिकारक्षम |
लेखक:
एन. व्ही. लांडे (पीएच.डी. विद्यार्थी)
8802360388
राष्ट्रीय पादप जीनोम अनुसंधान संस्थान, नवी दिल्ली
डॉ. ए. ए. दसपुते (सहायक प्राध्यापक)
9607705240
कृषि बायोटेक्नॉलॉजी कॉलेज मदडगाव, अहमदनगर
डॉ. एस. जी. वाघ (सहायक प्राध्यापक)
9673806666
एस. डी. एम. व्ही. एम. कृषि बायोटेक्नॉलॉजी कॉलेज, औरंगाबाद
एस. एच. टिमके (पीएच.डी. विद्यार्थी)
8459950081
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
Published on: 01 December 2020, 08:15 IST