जवस सुधारित लागवड तंत्रज्ञान

14 January 2021 01:46 PM By: KJ Maharashtra
linseed

linseed

जवस हे एक प्राचीन काळापासून लागवड केले जाणारे पीक आहे. त्याच्या बियापासून तेल काढले जाते. व्यावसायिक रित्या संपूर्ण जगभरात आणि भारतात या पिकाची लागवड तेलबिया म्हणून केली जाते. या पिकास हिंदी मध्ये 'तिसी'आणि तेलुगू मध्ये 'अविशल्लू' म्हणून देखील ओळखतात. फायबरचा समृद्ध स्त्रोत आहे.  जवस हे देखील एक महत्त्व पूर्ण तेलबिया पीक आहे. जवसाचे तेल हे बियापासून पिळून काढले जाते आणि लाकडाचे संरक्षण करणारे तेल म्हणून देखील मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

जवस त्याच्या खमंग चवीमुळे एक चटकदार म्हणून देखील ओळखले जाते. भारतामध्ये जवस मुख्यतः तेलासाठी उत्पादित केली जाते, त्याचा वापर केवळ मानवी वापरासाठी न करता त्यापासून व्यवसायिक तत्वावर  रंग आणि वार्निश, लेदर, प्रिंटिंगची शाई, तयार करण्यासाठी होतो. जवसेच्या तेलामध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. जवसाच्या बियाण्याचा वापर कोंबड्यांच्या खाद्यामध्ये केला जातो त्याला बाजारामध्ये  ओमेगा अंडी या नावाने ओळखतात.

भारत युरोपीय देशांकडून जवस  धागा  आयात करतो परंतु भारतामध्ये तयार होणाऱ्या धाग्याचा वापर करत नाही, यामागील कारणे म्हणजेच भारतात तयार होणाऱ्या धागा आणि आयात केलेला धागा यांच्यात गुणवत्तेच्या दृष्टीने फार मोठी तफावत असते परंतु सध्या परिस्थितीत काही नवीन जाती विकसित झाले आहे जशी की गौरव,  शिखा, जीवन, पार्वती यामधून तेल आणि धागा असे दुहेरी हेतू साध्य झाले आहे.

हेही वाचा:हरितगृहातील भाजीपाला पिकावरील प्रभावी रोग व्यवस्थापन

मूळ :-भूमध्य भारत :

नंतर ग्रीक, इजिप्तिशियन,बॉबीलोनिस रोमन आणि इतर प्रगत लोकांनी  त्याची लागवड धागा निर्मितीसाठी  केली. कॅनडा, अर्जंटिना, यू.एस.ए., पोलंड, रोमानिया, चीन आणि भारत हे प्रमुख उत्पादक देश आहे

क्षेत्र उत्पादन :

सध्या जगभरात सुमारे १२ दशलक्ष एकर क्षेत्रावर जवस या पिकाची लागवड केली जाते. उत्तर युरोप आणि रशिया येथे जास्त उत्पादन घेतले जाते. लागवड क्षेत्राच्या दृष्टीने भारत प्रथम क्रमांकावर आहे. जगातील लागवडी खालील क्षेत्रा पैकी सुमारे २५ टक्के क्षेत्र हे भारताने व्यापले आहे.

हवामान :

बियासाठी घेतलेले पीक हे मध्यम थंड हवामानात चांगले येते, परंतु धागा उत्पन्नासाठी ही पीक घेताना त्यासाठी थंड आणि दमट हवामान आवश्यक आहे. बियाणे उगवणीसाठी २५ ते ३०डिग्री सेल्सिअस तापमानाची आवश्यकता आणि बिजनिर्मिती दरम्यान १५ ते २० डिग्री सेल्सिअस इतके तापमान आवश्यक असते. या पिकासाठी उच्च आद्रता आवश्यक असते. जवसेचे पिक कडाक्याच्या थंडीस बळी पडून, त्याचा परिणाम कळीधारणेवर होत असतो. हे पीक दुष्काळास अवर्षण पीक म्हणून ओळखले जाते. ते ४५० ते ७५० मिमी पाऊस पडणाऱ्या भागात घेता येते.

हेही वाचा:ट्रायकोडर्मा करते जैविक रोगांचे नियंत्रण; जाणून घ्या! लागवडीपुर्वी वापरण्याची प्रक्रिया

जाती :-

 • सुरभी, जानकी, हिमालिनी, नगरकोल, गरिमा ,शुभ्रा ,नीलम. महाराष्ट्र साठी :- आर- ५५२,किरण, शितल, जवाहर -२३ .

पेरणीची वेळ :-

 • साधारणतः १५ ऑक्‍टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान पेरणी केली जाते, परंतु वेगवेगळ्या राज्यात पेरणीची वेळ ही सिंचन सुविधा, पिक प्रणाली आणि मातीतील ओलावा यावर अवलंबून असते. लवकर पेरणी केल्यास बुरशीजन्य रोग, तांबेरा रोग आणि जवस पिकावर पडणारे कीड यापासून संभाव्य नुकसान टाळता येते. जवस हे शुद्ध रब्बी हंगामात घेतले जाणारे पीक असून त्याची पेरणी १५ नोव्हेंबर पर्यंत होणे आवश्यक आहे.

बियाणे :-

 1. कोरडवाहूसाठी
 2. फेकण्यासाठी ४० किलो प्रति हेक्टर.
 3. पेरणीसाठी ३०किलो प्रति हेक्‍टर.
 4. सिंचनाखालील क्षेत्रासाठी
 5. फेकण्यासाठी ३५ किलो प्रति हेक्टर.
 6. पेरणीसाठी २५ किलो प्रति हेक्टर.

बीज प्रक्रिया :-

बीज प्रक्रिया करताना थायरम ३ ग्रॅम /किलो, बाविस्टिन १.५ ग्रॅम / किलो आणि टॅप्सिन एम. २.५ ग्रॅम / किलो बियाण्यासाठी बीजप्रक्रिया करावी त्यामुळे बीजजन्य  रोगा पासून होणारे नुकसान टाळता येते.

पेरणी अंतर :

 • ओळी दरम्यान २५ ते ३०सेमी. दोन झाडा दरम्यान ७ ते १० सेमी.

सिंचन:

 • ९०% पिके पावसाच्या पाण्यावर घेण्यात येतात. फुलांची आणि बियाणे तयार होत असताना सिंचननाची आवश्‍यकता असते. चांगल्या उत्पादनासाठी पेरणीनंतर ३५आणि ७५ दिवसांनी सिंचन दिल्यास उत्पादनात दुप्पट वाढ होऊ शकते.

काढणी:

पिकाची पाने सुटल्यानंतर काढणी करावी. थम्ब रूल नुसार जेव्हा पिकाच्या बोंड्या  ९० टक्के तपकिरी आणि चमकदार दिसू लागतात तेव्हा काढणी करावी. धाग्याच्या हेतूने पीक घेतो तेव्हा पिकाची काढणी ही  पिकाची  शारीरिक  परिपक्वता  झाल्यानंतर  जेव्हा पिक हिरवे असते तेव्हा करावी. साधारणता काढणी ही मार्च किंवा एप्रिलमध्ये केली जाते. झाडे ही जमिनीच्या अगदी जवळून कापली जातात किंवा उपटून  घेतात. कापणी केल्यानंतर पिक शेतामध्ये काही दिवस उन्हात वाळत ठेवावे.

 गुणवत्ता :

जवसच्या तेलामध्ये २०% प्रथिने, ६० % फॅट आणि ४२% कार्बोहायड्रेट असतात. कुक्कुटपालन व पशु आहारामध्ये पोषणाच्या दृष्टीने हा एक प्रथिनांचा मौल्यवान स्त्रोत म्हणून ओळखला जातो.

वापर :

धाग्याचा वापर हा हात मोजे ,पादत्राणे, खेळाच्या जाळ्या, कापड उद्योग, सिगारेट रॅपिंगसाठी, कागद, दावे इत्यादी तयार करण्यासाठी केला जातो. जवस चा वापर छपाईची शाई व साबण तयार करण्यासाठी केला जातो. तेलाचा वापर हा खाद्याच्या हेतूने फार कमी प्रमाणात करतात आणि औद्योगिक उद्योगात मोठ्या प्रमाणात केला जातो. तेलामध्ये लीनोलेनिक ॲसिड प्रमाण समृद्ध आहे(६६ टक्क्यापेक्षा जास्त) . जवस हे पूर्णतः कोरडे तेल असून त्याचा वापर पेंट तसेच वार्निस निर्मितीसाठी करतात. तेल निर्मिती दरम्यान मिळणारी ढेप ही जनावरांसाठी पौंष्टिक असते, तसेच खत म्हणून शेतामध्ये वापरली असता सूक्ष्मजीवांच्या प्रक्रियेसाठी चांगली असते.

लेखक :-

 1. श्री. अजय एस. सोळंकी (सहाय्यक प्राध्यापक) कृषी महाविद्यालय कोंघारा, जि. यवतमाळ.
 2. श्री. विजय ए. धोतरे ( एम. एस. सी. ऍग्री)
 3. श्री. अजय डी. शेळके ( सहाय्यक प्राध्यापक)
 4. डॉ.राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय, बुलढाणा
जवस oil seed
English Summary: Improved planting technology of linseed

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.