भाजीपाला पिकांमध्ये मेथी ही महाराष्ट्रातील लोकप्रिय पालेभाजी असून मेथीचा वापर आहारात विविध प्रकारे करण्यात येतो. महाराष्ट्रात बहुतेक सर्व जिल्ह्यांत मेथीची लागवड केली जाते. मोठ्या शहरांच्या आसपासच्या भागात मेथीच्या लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. महाराष्ट्रातील हवामानात मेथीचे पीक खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात घेता येते. भातीचा सतत पुरवठा होण्यासाठी टप्याटप्याने लागवड करून जवळजवळ वर्षभर मेथीचे पीक घेता येवू शकते.
-
महत्व
:
मेथीची हिरवी पाने आणि कोवळ्या फांद्या भाजीसाठी वापरतात. मेथीच्या बियांचा म्हणजे मेथ्थांचा मसाल्यामध्ये आणि लोणच्यामध्ये उपयोग करतात. मेथीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. मेथीची भाजी पाचक असून मेथीच्य भाजीमुळे यकृत आणि प्लिहा यांची कार्यक्षमता वाढून पचनक्रिया सुधारते. मेथीमध्ये प्रोटीन्स आणि मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह इत्यादी खनिजे तसेच अ आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणाते असतात. मेथीच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात पुढील अन्नघटक असतात.
-
अन्नघटक प्रमाण(0%) अन्नघटक प्रमाण (0%)
-
पाणी 86 कार्बोहायड्रेटस् 0
-
प्रोटीन्स् 4 फॅटस् 0.9
-
तंतुमय पदार्थ 1 खनिजे 1.5
-
मॅग्नेशियम 07 फॉस्फरस 0.005
-
सोडियम 08 कॅल्शियम 0.4
-
पोटॅशियम 05 लोह 0.02
-
सल्फर 02 क्लोरीन 0.02
-
जीवनसत्व अ 6450 जीवनसत्व क 05
-
उष्मांक (कॅलरीज) 49
-
हवामान आणि जमीन :
मेथी हे थंड हवामान वाढणारे पीक आहे. विशेषत: कसुरी मेथीस थंड हवामान मानवते म्हणून हिवाळ्यात ह्या मेथीची लागवड करतात. मेथी हे कमी दिवसात तयार होणारे पीक आहे. विविध प्रकारच्या हवामानांत मेथीचे पीक येत असते तरी उष्ण हवामानात पिकाची वाढ कमी होऊन चांगल्या दर्जाची भाजी मिळत नाही. मेथीच्या लागवडीसाठी मध्यम ते कादार आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी.
-
उन्नत जाती : मेथी हे शेंगा कुळातील पीक असून मेथीचे मुख्य दोन प्रकार आहेत.
कसुरी मेथी : ह्या मेथीची पाने लहान, गोलसर असून तिची वाढ सुरुवातीला फारच सावकाश होते. ह्या मेथीची रोपे लहान झुडूपवजा असतात आणि फांद्या आणि देठ नेहमीच्या मेथीपेक्षा बारीक असतात. ह्या मेथीची फुले आकर्षक पिवळ्या रंगाची, लांब दांड्यावर येणारी असून शेंगा लहान, कोयत्याच्या आकाराच्या आणि बाकदार असतात तर बिया नेहमीच्या मेथीपेक्षा बारीक असतात. कसुरी मेथी अधिक सुगंधित आणि स्वादिष्ट असते. कसुरी मेथीमध्ये कसुरी सिलेक्शन (पुसा सिलेक्शन) ही सुधारित जात असून, ती 2 महिन्यात तयार होते. ही जात उशीरा तयार होणारी असली तरी तिचे अनेक खुडवे घेता येतात आणि ही जात परसबागेत लावण्यास फारस उपयुक्त आहे.
- नेहमीची मेथी :
ही मेक्षी लवकर वाढते. या मेथीला भरपूर फांद्या येतात आणि वाढीची सवय उभट असते. या मेथीची पाने लंबगोल किंवा गोलसर असतात. या मेथीची फुले पांढरी असून ती शेंड्याकडे पानाच्या बेचक्यातून प्रत्येक ठिकाणी दोन किंवा तीन येतात. या मेथीच्या शेंगा लांब आणि बी मोठे असते. यामध्ये पुसा अर्ली बंचींग ही सुधारित जात विकसित करण्यात आली आहे. बर्याच ठिकाणी स्थानिक वाणांची लागवड केली जाते. हिरवी, कोवळी कुसकुशीत पाने, लवकर फुलावर न येणे, कोवळेपणा जास्तीत जास्त टिकून राहाणे चांगल्या जातीची काही वैशिष्ट्ये आहेत.
-
लागवडीचा हंगाम :
मेथी हे थंड हवामानातील पीक असले तरी महाराष्ट्रातील खरीप आणि रबी हवामानात मेथीचे पीक घेतले जाते. मेथीची लागवड खरीप हंगामात जून-जुलै महिन्यात आणि रब्बी हंगामात सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यात करतात. भाजीचा सतत पुरवठा होण्यासाठी पेरणी टप्याटप्याने करतात. समशीतोष्ण हवामान आणि पाण्याचा नियमित पुरवठा असल्यास मेथीची लागवड वर्षभर करता येते. परंतु थंड हवामानात उत्पादन आणि पिकाचा दर्जा चांगला मिळतो.
-
लागवड पद्धती :
मेथीची लागवड सपाट वाफ्यांमध्ये 20-25 सेंमी. अंतरावर ओळीतून पेरुन किंवा बी फेकून करतात. आंतरपीक म्हणून मेथीचे पीक घेताना मुख्य पिकामधील मोकळ्या जागेत मेथीचे बी 20-2 सेंमी. अंतरावर पेरावे. मेथीच्या लागवडीसाठी 3 2 मीटर आकाराचे किंवा त्यापेक्षा अधिक लांबीचे सपाट वाफे तयार करून त्यात बी फोकून किंवा ओळीत पेरणी करतात. पेरणीनंतर लगेच हलके पाणी द्यावे. बी ओळीत पेरल्यास खुरपणी आणि तण काढणे सोपे होते. तसेच कापणी करणे सोपे जाते.
नेहमीची मेथी पेरणीनंतरे 3-4 दिवसाते उगवते तर कसुरी मेथीची उगवण होण्यास 6-7 दिवस लागतात. साध्या किंवा नेहमीच्यो मेथीच्या एक हेक्टर लागवडीसाठी 25-30 किलो बियाणे लागते. आंतरपीक म्हणून घेताना बियाण्याचे प्रमाण आवश्यकतेनुसार ठेवावे. बियाणे पेरताना एकसारखे आणि पातळ पडेल याची दक्षता घ्यावी. तसेच बियांसाठी बीजप्रक्रिया करताना कॅप्टन 3 ग्रॅम प्रति किलो बियाणेे या प्रमाणात बियास चोळावे.
खते आणि पाणी व्यवस्थापन :
पानांची चांगली वाढ होण्यासाठी मेथीच्या पिकाला नत्रयुक्त खतांची आवश्यकता असली तरी हे शेंगावर्गीय कुळातील पीक असल्यामुळे सुरवातीला हेक्टरी 20 किलो नत्र आणि त्यानंतर 15 दिवसांनी खुरपणी करून हेक्टरी 20 किलो नत्र दिल्यास पिकाची वाढ जोमदार होते किंवा पेरणीनंतर 3 आठवड्यांनी 10 लिटर पाण्यात 150 ग्रॅम युरिया मिसळून फवारणी केल्यास मेथीचे उत्पादन आणि प्रत सुधारते.
पिकाचा खोडवा घेतल्यासही वरीलप्रमाणे खतांचा वापर करावा. मेथीला नियमित पाणी देणे आवश्यक आहे. कोवळी आणि लुसलुशीत भाती मिळण्यासाठी 4-6 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पाण्याचा नियमित पुरवठा केल्यास अधिक उत्पादन मिळवून खोडवेही जास्त येतात.
महत्त्वाच्या किडी, रोग आणि त्यांचे नियंत्रण :
मेथीवर मावा आणि पाने पोखरणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव होतो. मावा कीड काळसर रंगाची असून पानांच्या खालच्या भागावर आणि शेंड्यावर राहून मोठ्या प्रमाणात पानांमधील रस शोधून घेते. त्यामुळे रोपे निस्तेज होऊन मालाची प्रत खराब होते. पाने पोखरणारी कीड पानांमधील रस शोषनू घेत वेडीवाकडी पुढे जाते. त्यामुळे पानांवर पांढर्या रंगाच्या वेड्यावाकडड्या ओळी दिसतात आणि मालाची प्रत खराब होते. ह्या किडीच्या नियंत्रणासाठी पीक लहान असतानाच 15 मि.ली. मॅलॅथिऑन (50% प्रवाही) 10 लिटर पाण्यात मिसळून दर 8-10 दिवसांच्या अंतराने पिकावर फवारावे. पीक काढणीच्या 8 दिवस आधी औषध फवारू नयेत.
मेथीच्या पीकावर रोगाचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. मात्र काही वेळा मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी पिकाची फेरपालट करावी. पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. बियांची दाट पेरणी करू नये. पिकाला नियमित पाणी द्यावे आणि शेतात स्वच्छता राखावी. मेथी पिकावर काही प्रमाणात मुळकुज, पानावरील ठिपके, केवडा व तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. पेरणीपूर्वी कॅप्टन 3 ग्रॅम मेटॅलॅक्झिल 35% ग्रॅम प्रतिकिलो बियोणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी जमिनीत ट्रायकोडर्माचा उपयोग करावा. पानांवरील रोगाच्या नियंत्रणासाठी क्लोरोथॅलोनिल किंवा कॅप्टन किंवा थायरम 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारे गंधक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे किंवा गंधक भुकटी 25 किलो प्रति हेक्टरी धुरळशवी.
-
काढणी, उत्पादन आणि विक्री :
बी पेरल्यापासून 30-35 दिवसांनी मेथीचे पीक काढणीला तयार होते. मेथीची काढणी करताना संपूर्ण रोपटे मुळापासून उपटून काढतात किंवा जमिनीलगत खुडून घेतात. मेथीच्या पिकाचा खोडवा 2-3 वेळा घेता येतो. कसुरी मेथीचे जास्त खोडवे घेता येतात. प्रामुख्याने हिवाळ्यात खोडवा घेणे शक्य होते. काही वेळा 2-3 खुडवे घेतल्यावर पीक बियांसाठी ठेवतात. मेथीची पाने तजेलदार असताना आणि फुले येण्यापूर्वी काढणी करावी. काढणीच्या 2-3 दिवस आधी पाणी दिल्यास काढणी करणे सोपे जाते आणि पाने ताजी राहतात.
काढणीनंतर मेथीच्या योग्य आकाराच्या जुड्या बांधून कापडात किंवा जाळीदार पिशव्यांमध्ये अथवा बाबूंच्या टोपल्यामध्ये जुड्या व्यवस्थित रचून बाजारात विक्रीसाठी पाठवाव्यात. मेथीच्या जुड्या तुडवल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच काढणी संध्याकाळी करावी म्हणजे ताजी भाजी बाजारपेठेत पाठवता येते. मुळांना जास्त माती असल्यामुळे मुळे पाण्यात धुवून पाणी झटकून घ्यावे. म्हणजे भाजी सडत नाही. मेथीची काढणी आणि विक्री ह्यामध्ये कमीत कमी कालावधी असावा.
मेथीचे उत्पादन काढणीच्या पद्धतीनुसार दर हेक्टरी 7-8 टन इतके मिळते. कसुरी मेथीचे उत्पादन हेक्टरी 9-10 टन मिळते. मेथीचे पीक बियाण्यासाठी ठेवल्यास साध्या मेथीचे हेक्टरी 1 ते 1.5 टन तर कसुरी मेथीचे हेक्टरी 600 ते 700 किलो एवढे बियाणे मिळते.
1) ज्ञानेश्वर सुरेशराव रावनकार
पी.एच.डी. विद्यार्थी (भाजीपाला शास्त्र)
उद्यानविद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
2) प्रा.मयूर बाळासाहेब गावंडे
सहायक प्राध्यापक (उद्यानविद्या विभाग)
श्री. शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती
Published on: 13 May 2021, 06:48 IST