Agripedia

अतिउत्क्रांत वनस्पतीजगताच्या शरीरक्रिया शुद्ध आहेत स्वसामर्थ्याने स्वतःला जन्माला घालून स्वतःसाठी व इतरांसाठी जगण्यास अनुकूल व्यवस्था केवळ तेच निर्माण करू शकतात .

Updated on 06 May, 2022 9:44 PM IST

प्रत्येकाला सुरक्षित आसरा देताना त्याचे जीवनउद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी लागणारी शरीररचनासुद्धा तेच करतात. प्रत्येकाच्या शरीररचननेस अनुकूल स्वभाववैशिष्ठ्ये आणि शारीरिक क्षमता जोपासण्यासाठी आवश्यक पोषणव्यवस्था उभी करतात. मानवी आकलनशक्तीच्या पलीकडे असणारी; अत्यंत गुंतागुंतीची तरीही काटेकोर नियोजनबद्ध अशी ही संपूर्ण व्यवस्था आहे.हवा, पाणी आणि जमीन अशा सर्वांमधून कार्यरत असणारी ही जीवनव्यवस्था- जल आधारित आहे आणि प्रत्येकामध्ये पाण्याचे अस्तित्व आहे. विश्वास बसणार नाही परंतु डोळ्यांनाकोरड्या दिसणाऱ्या कोणत्याही दगडात40 टक्‍क्‍यांपर्यंत पाणी असते.आणि तेथेसुद्धा जीवन नांदत असते. किंबहुना दगडातील जीवन अतिउच्च कोटीचे असते.सृष्टीच्या नवनिर्मिती आणि damage repair ची केंद्रके तेथे असतात. आपणदेखील दगडातील जीवसृष्टीच्या आधारे सर्वांचे जीवन समृद्ध करू शकतो. आजवर काही जणांनी ते केले आहे आणि इतरांना साध्य होण्यासाठी काही विधींची योजनासुद्धा केलेली आहे. 

अशा दगडांच्या साहाय्याने जगणारे वनस्पतीजगत उत्क्रांतीच्या परमोच्च जागी आहे. मानवी मती कुंठीत होईल अशा शारीरिक क्षमता त्यांच्याकडे आहेत. चिरतरूण दीर्घायुष्य म्हणजे काय हे त्यांना पाहताक्षणी जाणवते. अत्यंत कठीण परिस्थितीला देखील ते चिवटपणे तोंड देतात आणि पूर्णपणे उन्मळून पडलेल्या स्थितीतही नव्याने उभे राहतात. त्यांच्या जीवनेच्छा एवढ्या प्रबळ आहेत की आत्यंतिक प्रतिकूलतेवरसुद्धा मात करूनच ते उभे राहतात. इतरांनाही तसे मार्ग दाखवतात. त्यांच्या ठायी असणारी पुनरुत्पादन क्षमता जगात अन्यत्र कोठेही आढळणार नाही.उभयलिंगी असणारे वनस्पती जगत, त्यांनी निर्माण केलेल्या मधमाश्या फुलपाखरादी कीटकांच्या सहाय्याने स्वतःमध्ये फलन घडवून आणतात. फलनप्रसंगी त्यांची संयमित मने आनंदाची उधळण करतात त्यांच्या पर्णरंध्रातूनसुद्धा सुगंध स्त्रवतो.वनस्पतींची गात्रे त्यावेळी कमालीची शांत असतात.पूर्ण relaxed असतात. त्या स्थितीचा अनुभव प्रत्येक प्राणिमात्राला त्याच्या समागमाच्या अत्त्युच्च प्रसंगी मिळण्याची शरीर व्यवस्था वनस्पतींनी तयार केलेली आहे. प्रत्येकाच्या शांत स्वभावानुरूप त्याचे रोमांच कमी-अधिक प्रमाणात शरीरावर रेंगाळतात. प्रबुद्ध असलेल्या वनस्पतींच्या शरीरावर फार प्रदीर्घ काळ रेंगाळतात.

वंशसातत्य सुरू ठेवणाऱ्या या नैसर्गिक क्रियेला सृष्टीनियमांत अत्युच्च महत्त्वbआहे.मानवी शरीरात प्रजनन क्षमता नियंत्रण केंद्र- मेंदूतील सर्वोच्च महत्त्वाच्या (nucleus accumbens) जागी अतिसुरक्षित असते. त्याच्या संरक्षणयंत्रणा कमालीच्या गुंतागुंतीच्या*असतात. त्यासाठी आवश्यक शरीरबांधणीची तयारी त्याच्या गुणसूत्रापासून सुरू झालेली असते. हे काटेकोरपणे होण्यासाठी अनेक नियम सृष्टीने आखून ठेवले आहेत. गर्भधारणेपूर्वीची शरीरशुद्धता हा त्यातला महत्त्वाचा नियम आहे. ज्यामध्ये आंतरिक शुद्धतेला जास्त महत्व आहे आणि ते आपोआपच बाह्यशुद्धतेच्या रूपाने प्रकटते. शरीराची बाह्यस्वच्छता हे त्याचे केवळ एक अंग झाले.त्याच्या आधारेसुद्धा आपल्याला शुद्धतेचे महत्त्व समजेल _ काही कारणास्तव आपल्याला घाम आल्यास शरीराला एक प्रकारचा चिकटपणा येतो शरीरावर जमा होणाऱ्या त्या उत्सर्जितांमुळे एक प्रकारची अस्वस्थतासुद्धा येते. जी स्नान करण्याने निघून जाते. त्याशिवाय नविन उत्साह येतच नाही. घामटलेल्या अंगाने कामे करायला कुणाला आवडेल? जेवणसुद्धा धड जाणार नाही. जोडीदार जर घामटलेला असेल तर समागम करायला आवडेल का? 

आणिजर जबरदस्तीने करावा लागला तर मनात तिटकाराच शिल्लक राहणार ना ? त्याच्याही पुढे जाऊन आजारी अवस्थेत किंवा पोट बिघडलेलल्या स्थितीत, समागम नीटपणे होऊ शकतो का ? पेशीपेशींतून पराकोटीच्या शुद्ध असलेल्य वनस्पती अशुद्ध अवस्थेतस्वतःच्या फलनक्रिया घडवून आणतील का ?सर्व प्रयत्नांती शरीर नाही का शुद्ध करणार ?आपले स्नानसुद्धा अंगावर फक्त पाणी उतरून होते का ? चोळून चोळूनच अंग साफ करावे लागते ना मग वनस्पतींसाठी वेगळा नियम लागू होणार का ? कधीच नाही.फक्त त्यांची व्यवस्था वेगळी आहे. कोणत्याही मार्गाने शरीरात विजातीय किंवा विषारी द्रव्ये शिरल्यास ती काढून टाकण्याची स्वतःची संरक्षणव्यवस्था वनस्पतीजगता सोबत उत्क्रांत झालेली आहे आणि वनस्पतीजगता एवढीच म्हणजे सुमारे तीन अब्ज वर्षे जुनी आहे. प्रसंगी प्राण पणाला लावून लढणाऱ्या अत्यंत विश्वासू अंगरक्षकाप्रमाण सोबत करते आहे.

English Summary: Imposing diseases on the plant world
Published on: 06 May 2022, 09:44 IST