Agripedia

तण म्हटलं म्हणजे आपल्याला पिक विरोधी वनस्पती अशीच भावना निर्माण होते.शेतामध्ये जर तणांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला तर त्याचा थेट परिणाम पीक उत्पादन वाढीकडे होतो. त्यामुळे आपण शेत तणमुक्त ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतो.परंतु आपल्याला माहित आहे का यायातनांचा उपयोग शेतकरीवर्गालाच न होता अवतीभवती असलेल्या सगळ्या घटकांना होत असतो.या लेखामध्ये आपणतन व त्यांचे औषधी गुणधर्म तसेच त्यांचे काही उपयोगाबद्दल जाणून घेणार आहोत.

Updated on 26 August, 2021 7:40 PM IST

 रासायनिक तणनाशकांचा पुढे आणि त्यांनी नामशेष होताना दिसत आहेत.  परंतु या पानांचा उपयोग नुसता औषधी म्हणून न होता निसर्गातील अनेक जीवजंतू, बुरशी इत्यादींची हक्काचीजगण्याची जागा आहेत.जनावरांना सकस चारा म्हणून त्यांचा उत्तम वापर करता येऊ शकतो.जेव्हा आपण तणनष्ट करतो तेव्हा त्यावर अवलंबून असणारे असंख्य किड्यांच्या,बुरशीच्या प्रजातींचे जगण्याचे साधनच संपल्याने ते पिकांवर येऊन जगण्याची धडपड करतात.परिणामी पिकांवर कीड व रोग पसरतात.म्हणून त्यांचे महत्त्व शेतीशी निगडीत तर आहेच परंतुत्यांचे औषधी गुणधर्मही जाणून घेणे महत्वाचे आहे.

तसेच शेतातील तणे नांगरणी करून जमिनीत पूरल्यामुळे यांच्यापासून सेंद्रिय पदार्थ व अन्नद्रव्ये मिळतात.अनेक तणांमध्ये नत्रयुक्त पदार्थ भरपूर प्रमाणात असतात.उदाहरणार्थ गोखरु,बाऊची आणि धोत्राइत्यादी त्याने फेकून न देता ती जमिनीत गाडली तर जमिनीतील नत्राचे स्थिरीकरण होण्यास मदत होते. शेळ्या आणि मेंढी आणि प्रकारच्या नैसर्गिक रित्या वाढणारे तण खात असल्यामुळे त्यांच्यामध्ये काटकपणा व निरोगीपण असतो.तसेच बऱ्याच पानांचा उपयोग औषधी निर्मितीसाठीकिंवा प्रत्यक्ष औषध म्हणून देखील उपयोग केला जातो.आता पण काही तणांचे प्रकार व त्यांचे औषधी उपयोग पाहू.

 तणाचे प्रकार व त्यांचे औषधी उपयोग

  • आघाडा-या तणाचा चा उपयोग पिसाळलेली जनावरे चावल्यास तसेच याच्या पानांचा रस व मूळ मूत्र रोगांवर उपयुक्त आहे.
  • कस्तुरी भेंडी-कस्तुरी भेंडीच्या बीचे तेल मज्जातंतूच्या अशक्तपणा वर तसेच पोटाच्या विकारात उपयोगी असते.

  • धोतरा- धोत्र्याचे मूळ हेत्वचारोगांवर तसेच याचा पिवळा चीक काविळीवर वर उपयोगी आहेत तसेच फोड,जखमेवर उपयुक्त आहे.
  • वासनवेल-या वेलाची उगळून पोटाच्या विकारात देतात. पानांचा रस दुधातूनदिल्यास हा गर्मी वर व धातू पातावर उपयुक्त आहे.काविळी वर देखील उत्तम असा याचा फरक आहे.
  • टाकळा- याच्या  बिया व लिंबू रस एकत्र करून त्वचा रोगावर रामबाण उपाय आहे.

संदर्भ-कृषकोन्नती

English Summary: importantant of weed in farming and health
Published on: 26 August 2021, 07:40 IST