Agripedia

हवामान पोषक असल्यामुळे याचे उत्पादन व क्षेत्रही वाढले.

Updated on 27 October, 2022 5:14 PM IST

हवामान पोषक असल्यामुळे याचे उत्पादन व क्षेत्रही वाढले. खरीप व रब्बी या दोन्हीही हंगामात ज्वारीचे पीक घेतले जाते. जनावरांना उत्तम चारा देणारे हे पीक असल्यामुळे जनावरांवर अवलंबून असणारी ज्यांची शेती आहे तेथे ज्वारीचा पेरा अधिक केला जातो. सध्या जगभरात ज्वारीचे क्षेत्र भारतात पहिल्या क्रमांकाचे आहे, मात्र उत्पादनात आपला क्रमांक दुसरा आहे. रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या ज्वारीच्या उत्पादनात सोलापूर जिल्हा प्रथम असून त्यानंतर अहमदनगर व पुणे जिल्ह्यात ज्वारीचे

उत्पादन घेतले जाते. खरीप हंगामात नांदेड व लातूर जिल्ह्यात सर्वाधिक ज्वारी घेतली जाते.During the kharif season, most sorghum is grown in Nanded and Latur districts.जमिनीच्या खोलीनुसार पेरणी:

जाणून घ्या गहू पिकातील सर्वात चांगल्या जाती आणि विक्रमी उत्पन्न

रब्बी ज्वारीच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी,चांगला निचरा होणारी जमिन निवडावी. जमिनीच्या खोलीनुसार व पाण्याच्या उपलब्धतेनुसार सुधारित वाणांची निवड करावी. हलकी जमिन (30 ते 45 से.मी. खोल), मध्यम खोल जमिन (45 ते 60 से.मी.खोल) व भारी जमिन (60 से.मी. पेक्षा जास्त खोल) अशा जमिनीच्या खोलीनुसार रब्बी ज्वारीचे वाण निवडावेत.

कोरडवाहू ज्वारीची पेरणीपूर्वी रानबांधणी केल्यास उत्पादनात 35 ते 40 टक्के वाढ झाल्याचे प्रयोगांती आढळून आले आहे. त्यासाठी जुलैचा पंधरवाड्यात पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी 10x12 चौ.मी. आकाराचे वाफे तयार करावेत. सारा यंत्राने सारे पाडून त्यामध्ये बळीराम नांगराने दंड टाकल्यास कमी खर्चात वाफे तयार करता येतात किंवा 2.70 मीटर अंतरावर सरी यंत्राने सारे पाडून दर 20 मीटरवर बळीराम नांगरच्या सहाय्याने दंड टाकावेत. त्यामुळे 15 जुलै ते 15 सप्टेंबर या काळात पडणाऱ्या पावसाचे

पाणी जमिनीत मुरविण्यास मदत होते.रब्बी ज्वारीची पेरणी वेळेवर करण्यासाठी जमिनीची मशागत पेरणी पूर्वी करावी.ज्वारीची उगवण झाल्यावर 10 ते 12 दिवसांनी विरळणी करावी.पिकाच्या सुरवातीच्या 35 ते 40 दिवसात पीक तणविरहित ठेवावे. पेरणीनंतर आवश्यकतेनुसार 1 ते 2 वेळा खुरपणी करावी आणि तीन वेळा कोळपणी करावी. पहिली पेरणीनंतर तीन आठवड्यानी फटीच्या कोळप्याने करावी. दुसरी कोळपणी पेरणीनंतर पाच आठवड्यानी पासच्या कोळप्याने करावी, त्यामुळे रोपांना मातीचा आधार

मिळतो व तिसरी कोळपणी आठ आठवड्यानी दातेरी कोळप्याने करावी. त्यामुळे जमिनीच्या भेगा बुजवण्यास मदत होऊन जमिनीतील ओल्याव्याचे बाष्पीभवन न होता जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.खत व्यवस्थापन: रब्बी ज्वारीचे सुधारीत व संकरित वाण खाताना चांगला प्रतिसाद देतात. कोरडवाहू ज्वारीस 1 किलो नत्र दिल्यास 10 ते 15 किलो धान्याचे उत्पन्न वाढल्याचे दिसून आले आहे. तक्त्यात दिल्याप्रमाणे खत मात्रा द्यावी.

कोरडवाहू रब्बी ज्वारीस पेरणीच्या वेळी 50:25:25 नत्र : स्फुरद : पालाश प्रति हेक्टरी दोन चाड्याच्या पाभरीने दयावे. त्याकरिता साधारणपणे दोन गोणी युरिया, तीन गोण्या एसएसपी व एक गोणी एमओपी या प्रमाणे खतांची मात्रा द्यावी.पाणी व्यवस्थापन: संरक्षित पाण्याची सोय असल्यास पीक गर्भावस्थेत असतांना पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी किंवा पीक पोटरीत असतांना 50 ते 55 दिवसांनी दयावे. दोन पाणी देणे शक्य असल्यास वरील दोन्ही नाजूक अवस्थेत ज्वारी पाणी दयावे.

English Summary: Important Tips for Sowing Rabi Jowar
Published on: 26 October 2022, 06:55 IST