Agripedia

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते, कांदा एक नगदी पीक आहे आणि याची मोठ्या प्रमाणात लागवड शेतकरी बांधव करतात. भारतात एकूण कांदा उत्पादनापैकी सर्वात जास्त कांद्याचे उत्पादन हे राज्यात घेतले जाते. महाराष्ट्रातील कांदा लागवडीखालील क्षेत्र हे खूप लक्षणीय आहे. महाराष्ट्रात जवळपास एक लाख हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली जाते. महाराष्ट्रातील नाशिक पुणे सोलापूर, सातारा, अहमदनगर हे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे कांदा लागवडीसाठी विशेष प्रसिद्ध आहेत, तसेच खानदेश मधील जळगाव धुळे या जिल्ह्यातील कांद्याची लागवड बऱ्यापैकी बघायला मिळते.

Updated on 22 December, 2021 4:00 PM IST

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याला कांद्याचे आगार म्हणून ओळखले जाते, तसेच याच जिल्ह्यात आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणजे लासलगाव कांदा बाजारपेठ सुद्धा आहे. आज आपण कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या टिप्स घेऊन आलो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स

महाराष्ट्रात कांद्याची लागवड ही तीन हंगामात केली जाते, खरीप हंगामात, रब्बी हंगामात आणि उन्हाळी हंगामात. खरीप हंगामात चूक कांदा लागवड केला जातो त्याला लाल कांदा म्हणून ओळखले जाते, रब्बी हंगामात लावल्या जाणाऱ्या कांद्याला रांगडा कांदा म्हणून संबोधले जाते तर उन्‍हाळी हंगामात लावल्या जाणाऱ्या कांद्याला उन्हाळी कांदा म्हणून संबोधले जाते.

  • कांद्याची लागवड पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. कांदा लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन उत्तम असल्याचे सांगितले जाते. तसेच कांदा लागवड करताना सेंद्रिय खतांचा वापर करणे आवश्यक आहे.
  • कांदा लागवडीत सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरते ती म्हणजे पूर्व मशागतीची. जर जमिनीची पूर्वमशागत चांगली केली तर उत्पादन हे दर्जेदार प्राप्त होते. नांगरणी केल्यानंतर जमीन हे पूर्णता समतल करणे आवश्यक आहे. 40 ते 50 टन प्रति हेक्‍टरी या प्रमाणात शेणखत टाकले तर उत्पादनात वाढ होते.
  • राज्यात लाल कांदाचे उत्पादन हे जून ते ऑक्टोबर या दरम्यान घेतले जाते. रांगडा कांदाचे उत्पादन हे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान घेतले जाते. आणि उन्हाळी कांद्याचे उत्पादन हे जानेवारी ते जून या दरम्यान घेतले जाते.
  • कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी खरीप आणि रब्बी हंगामात कांद्याची लागवड करायची असल्यास बसवंत 780 या जातीची निवड करावी असा सल्ला अनेक कांदा उत्पादक शेतकरी देतात. या जातीचा कांदा हा गडद लाल असतो. या जातीचा कांदा जवळपास एकशे दहा दिवसात काढण्यासाठी तयार होते, या जातीच्या कांद्यापासून हेक्‍टरी 300 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते. शेतकरी मित्रांनो N-53 ही देखील एक सुधारित वाण आहे, ही एक खरीप हंगामात घेतले जाणार वाण आहे, या जातीपासून हेक्‍टरी अडीचशे क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते.
  • कांदा लागवड करताना जमिनीत 50 किलो नायट्रोजन 50 किलो फॉस्फरस आणि 50 किलो पोटॅश टाकून जमिनीची प्रक्रिया करणे महत्त्वाचे ठरते. त्यानंतर एक महिन्याने 50 किलो नायट्रोजन प्रति हेक्‍टरी या प्रमाणात जमिनीत टाकले पाहिजे. कांद्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन करणे देखील महत्त्वाचे असते. खरीप हंगामात कांद्याला 10 ते 12 दिवसांनी पाणी द्यावे आणि रब्बी हंगामात सहा ते आठ दिवसांनी पाणी द्यावे अशी शिफारस केली जाते.
English Summary: important tips for onion growers
Published on: 22 December 2021, 04:00 IST