Agripedia

किटकनाशक फवारणी हा कीड नियंत्रणामधील एक महत्वाचा भाग पण जितकी ही गोष्ट महत्वाची तितकीच समंजसपणे हाताळणे गरजेचे आहे. कारण कीटकनाशकांवर होणारा अमाप खर्च पाहता,खर्चाच्या मानाने काळजीपूर्वक वापर होत नाही

Updated on 30 September, 2021 9:52 AM IST

अकराशे रुपयांची D A P बॅग जितकी काळजीपूर्वक आणि व्यवस्थित पुरवून वापरतो तसे 500 रुपयांचे कीटकनाशक हाताळताना उदासीनता दिसते. त्यामुळे ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे कारण वरील फोटो सत्य परिस्थिती दर्शवतो.

फवारणी घेण्याआधी किडीची ओळख,आर्थिक नुकसान पातळी,कीटकनाशकांचे लेबल क्लेम,वापरण्याचे प्रमाण/पद्धत,किटकनाशकाचे फॉरम्युलेशन,संरक्षण कपडे,योग्य फवारणी अवजारे, या सर्व गोष्टी लक्ष्यात घेणे गरजेचे असते.

सर्वात पहिली गोष्ट किडींची ओळख,कोणत्या किडीसाठी आपण फवारणी घेतोय हे माहिती असले पाहिजे.

किडीच्या सर्वच्या सर्व अवस्थांचा अभ्यास नसला तरी चालेल पण अळी अवस्था कशी दिसते किंवा किमान कोणत्या पिकामध्ये कोणती कीड येते इतकी माहिती असलीच पाहिजे.जसे पाने खाणारी अळी-सोयाबीन,अमेरिकन लष्करी अळी- मक्का, घाटेअळी- हरभरा,कपाशी,खोडकिडा-ऊस,

मक्का अशा प्रकारच्या विविध किडी.

कीड ओळखल्यानंतर पिकामधील कीडीचे प्रमाण,त्यावरून आर्थिक नुकसान पातळी ठरवता येते.कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन करणे आता काळाची गरज बनली आहे.कीटकनाशकांचे अवशेष,दुष्परिणाम,आरोग्यावर होणारा परिणाम त्यामुळे कीड आर्थिक नुकसान पातळीच्या वर जातेय अस जाणवल्यासच रासायनिक फवारणीचा पर्याय निवडावा. 

आर्थिक नुकसान पातळी:-किडींची कमीत कमी संख्या जी पिकाचे आर्थिकदृष्ट्या नुकसान करण्यास कारणीभूत ठरते.

किडीची ओळख झाली,किडीचे एकात्मिक व्यवस्थापन करून सुद्धा कीड आर्थिक नुकसान पातळी ओलांडतेय असे जाणवले त्यामुळे रासायनिक कीटकनाशके फवारणीचा निर्णय झाला.आता किटकनाशक कोणते वापरावे? प्रत्येक किडीसाठी व पिकासाठी प्रमाणित व शिफारशीत किटनाशके बाजारात उपलब्ध आहेत.त्यामधुन आपण कोणत्या पिकामध्ये व कोणत्या किडीसाठी फवारणी घ्यायची आहे हे कृषीमित्राकडून किंवा शेतीसेवा केंद्रामध्ये,एखाद्या अभ्यासू व्यक्तीकडून कीटकनाशकांच्या योग्यतेची खात्री करून घ्यावी.

कीटकनाशकांच्या योग्यतेची खात्री पटवण्याचा आणखी एक पर्याय म्हणजेच लेबल क्लेम होय. लेबल क्लेम म्हणजे एका विशिष्ट किडीच्या नियंत्रणासाठी विशिष्ट पिकामध्ये कीटकनाशकाचा शिफारशीत प्रमानात वापर होय. जर आपण कीटकनाशकांच्या लेबल क्लेम मध्ये उल्लेख नसलेल्या पिकामध्ये किंवा किडीवर कीटकनाशक फवारले तर कीड निर्मूलनाची शास्वती नसते. त्यामूळेच गैरवापर टाळण्यासाठी लेबल क्लेम महत्वाची भूमिका बजावते.

लेबल क्लेम मध्ये शिफारस केलेली मात्राच आपण फवारणी करताना वापरली पाहिजे. विविध निकषांच्या आधारावर,अवशेष राहू नयेत,किडीमध्ये प्रतिरोधक क्षमता तयार होऊ नये यासाठी हे प्रमाण निष्चित केंद्रीय कीटकनाशक नियामक मंडळ यांच्याकडून प्रमाणित केले गेलेले असते.

फवारणीआधी फवारणी पंप-नोझल ये व्यवस्थित दुरुस्त करून तपासून घ्यावेत. संरक्षक कपडे वापरने कधीही फायद्याचे ठरते.खराब अवजारे वापरल्यास विषबाधेचा धोका वाढतो.तसेच कीटकनाशकाचा त्वचेशी संपर्क आल्यामुळे खाज-जळजळ,तोंडात गेल्यास उलटी अशी लक्षणे दिसू शकतात.

अतिरिक्त खर्च कमी करण्यासाठी ,गैरप्रकार टाळण्यासाठी, योग्य पद्धतीने कीड नियंत्रणात आणण्यासाठी वरील गोष्टी किटकनाशक फवारणी आधी लक्ष्यात घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

 

संकलन -टीम IPM SCHOOL

 

English Summary: Important tasks before spraying pesticides
Published on: 30 September 2021, 09:52 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)