Agripedia

कॅल्शियम हे नत्र, स्फुरद व पालाश या मुख्य अन्नद्रव्य प्रमाणे पीक पोषणात महत्त्वाचे असे दुय्यम अन्नद्रव्ये आहे. त्याच्या वापरासंदर्भात माहिती देणे आवश्यक असून त्याचा डोळसपणे वापर केल्यास पीक पोषण चांगल्या प्रकारे होते

Updated on 08 December, 2021 1:53 PM IST

कॅल्शियम हे नत्र, स्फुरद व पालाश या मुख्य अन्नद्रव्य प्रमाणे पीक पोषणात महत्त्वाचे असे दुय्यम अन्नद्रव्ये आहे.  त्याच्या वापरासंदर्भात माहिती देणे आवश्यक असून त्याचा डोळसपणे वापर केल्यास पीक पोषण चांगल्या प्रकारे होते

कॅल्शियम हे पिकांच्या महत्त्वाच्या शरीर क्रियांमध्ये महत्त्वाचे अन्नद्रव्य आहेनत्रयुक्त खतांचा कार्यक्षम वापर वाढण्यासाठी विद्राव्य कॅल्शियमचीमदत होते. या लेखात आपणपिकांच्या शरीरांतर्गत क्रियेसाठी कॅल्शियम चे महत्व जाणून घेणार आहोत.

 पिकांच्या शरीरांतर्गत क्रियेसाठी कॅल्शियम चे महत्व

  • पेशी मजबूत ठेवणे- सेलवॉल मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम मदत करते. कॅल्शियम मुळे पेशीभित्तिका मजबूत व जाड बनतात. पेशीमध्ये प्रॅक्टीन व पॉलीसॅकराड आधारक तयार होण्यासाठीकॅल्शियमची जरुरी असते.कॅल्शियममुळे पेशींना मजबुती येते. पिकांच्या पेशी, ऊती व अवयवांचे लवकर वाढ व मजबुती कॅल्शियममुळे होते.
  • फुल व फळधारणा- पिकांमध्ये फूल व फळ धारणा क्षमता वाढविण्यासाठी कॅल्शियम मदत करते.
  • पिकांची प्रत-ठिकाण ची प्रत उत्तम राहण्यास व उत्पादन अधिक काळ टिकून राहण्यास कॅल्शियम मदत करते.
  • उष्णतेपासून पिकांचे संरक्षण- पिकांमध्ये सर्वात महत्त्वाची वातावरणातील प्रकाश संश्‍लेषण क्रिया असते. वातावरणामधील तापमान जर 35 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यास प्रकाश संश्‍लेषण क्रिया मंदावते.अतिउष्णतेमुळे झाडांचे खोड लांब होते,तर पानांचा आकार लहान होतो.या सर्व घटकांशी लढा देण्यासाठी पिकांना कॅल्शियम गरजेचे असते. कॅल्शियम मुळे पिकांमध्ये उष्माघात विरोधी प्रथिने तयार केले जातात.
  • भुईमूग पिकाला कॅल्शियमची योग्य मात्रा दिली असता शेंग कुज  रोग उद्भवत नाही तसेच शेंगा चांगल्या भरल्या जातात..
  • कॅल्शियम मुळे फळपिके,  भाजीपाला पिके यांचाही बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोग होण्यापासून बचाव  होतो.
  • अन्नद्रव्यांचे शोषण- अन्नद्रव्य शोषण करणाऱ्या प्रथिनांच्या कार्यात कॅल्शियम ची भूमिका महत्त्वाची असते.
  • त्यामुळे अन्नद्रव्यांचे मुळांद्वारे शोषण होऊनत्यांच्या प्रत्येक भागाला अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो.कॅल्शियम नायट्रेट किंवा कॅल्शिअम अमोनिअम नायट्रेटपाण्यात सहज विरघळत असल्याने पाण्या द्वारा व ठिबक  सिंचनाद्वारा दिल्यास फायदाहोतो.
  • भूसुधारक- कॅल्शियम चा वापर भूसुधारकमध्ये होतो.  कॅल्शियम युक्त खतांचा वापर जमिनीची आम्लता कमी करण्यासाठी आणि मातीचे जडणघडण चांगले राखण्यासाठी केला जातो.
  • रोगप्रतिकारक क्षमता- कॅल्शियम पिकांमध्ये बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोग  विरुद्ध रोगप्रतिकारक क्षमता वाढवते. पिकांमध्ये कॅल्शियमची कमतरता असल्यास बुरशीचा प्रादुर्भाव होऊन पाणी वहन करणाऱ्या नलिकेवर परिणाम होतो. पेशीभित्तिका ना पाणी व पाणीपुरवठा करणारे अवयवांचे झीज होऊन मर रोगाचे लक्षणे पिकात दिसून येतात.
English Summary: important of calcium in all crop and orcherd useful for more production
Published on: 08 December 2021, 01:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)