Agripedia

शेतकरी आपल्या शेतीमध्ये नवनवीन पिके घेऊन चांगले उत्पादन घेत असतात. मात्र अधिक चांगल्या उत्पादनासाठी चांगल्या खताची आवश्यकता असते. अनेकदा खतांच्या किमती वाढल्या आणि त्याचा काळाबाजार होत असल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात. अशा प्रकरणामुळे शेतकऱ्यांना मात्र ज्यादा पैसे भरावे लागतात.

Updated on 08 October, 2022 5:32 PM IST

शेतकरी आपल्या शेतीमध्ये नवनवीन पिके घेऊन चांगले उत्पादन घेत असतात. मात्र अधिक चांगल्या उत्पादनासाठी चांगल्या खताची आवश्यकता असते. अनेकदा खतांच्या किमती (prices DAP Urea) वाढल्या आणि त्याचा काळाबाजार होत असल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात. अशा प्रकरणामुळे शेतकऱ्यांना मात्र ज्यादा पैसे भरावे लागतात.

हंगामात शेतकऱ्यांसाठी खते मौल्यवान वस्तुपेक्षा कमी नाही. त्यामुळेच त्याची किंमत कमी ठेवणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि शासन प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार खताची व्यवस्था करण्यासाठी सरकार सर्व प्रयत्न करत आहे. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर खतांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. इफकोच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारने (central government) खतांच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी यावर्षी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

IFFCO ने 2022 च्या खरीप हंगामासाठी रासायनिक खतांच्या किमती जाहीर केल्या आहेत. काळाबाजार रोखण्यासाठी खतांच्या पाकिटांवर किंमती छापल्या जाणार आहेत. महत्वाचे म्हणजे तिथेच खताची विक्री कोणत्या दराने केली जाईल हे छापले जाणार आहे. 

सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरात होणार मोठी वाढ; जाणून घ्या आजचे भाव

यावर्षी अनुदानित खताची किंमत

युरियाच्या एका पॅकेटची किंमत - रु. 266.50

डीएपीच्या एका पॅकेटची किंमत - 1350 रुपये

NPK च्या एका पॅकेटची किंमत - 1470 रुपये

एमओपीच्या पॅकची किंमत - 1700 रुपये

'लम्पी स्कीन'ने दगावलेल्या जनावरांसाठी मिळणाऱ्या मदतीमध्ये बदल; मिळणार इतकी रक्कम

विनाअनुदानित खताची किंमत

युरियाच्या एका पॅकेटची किंमत - 2450 रुपये

डीएपीच्या एका पॅकेटची किंमत - 4073 रुपये

NPK च्या एका पॅकेटची किंमत - 3291 रुपये

एमओपी खताच्या एका पॅकेटची किंमत - 2654 रुपये

महत्वाच्या बातम्या 
LIC ने लॉन्च केली सर्वोत्तम पॉलिसी; वयाच्या 40 व्या वर्षी मिळणार 50 हजार रुपये पेन्शन
शेतकऱ्यांनो पपई लागवडीसाठी ऑक्टोबर महिना सर्वोत्तम; कमवू शकता लाखों रुपयांमध्ये उत्पन्न
फक्त 2 मिनिटांत ब्लड प्रेशर, तणाव आणि वेदनांपासून मिळणार आराम; फक्त हे एकच काम करा

English Summary: Important news IFFCO announces new prices DAP Urea
Published on: 08 October 2022, 05:27 IST