आपल्या राज्यामध्ये परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकांचे अतोनात नुकसान या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या सगळ्या आशा राज्य सरकारकडे लागलेल्या असताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ?उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,What did Deputy Chief Minister Devendra Fadnavis say? Deputy Chief Minister Fadnavis said, की “शेतीच्या नुकसान भरपाईची योजना सॅटेलाईट बेस होणार आहे. शेतीत नुकसान झाल्यास पंचनामे करावे लागणार नाहीत.
म्हणजे उपग्रहाच्या माध्यमातून थेट घटनास्थळाची माहिती मिळेल. त्यानंतर ऑटो पायलट मोडवर मदत केली जाईल. लवकरच अशी सिस्टीम उभारली जाणार आहे. दरम्यान राज्यात ओला - दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नसल्याचे कृषिमंत्री अब्दुल
सत्तार यांनी म्हटलं आहे. परतीचा पाऊस नेहमीच होतो. शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती घेत आहोत.तसे सगळे पंचनामे झाल्यावर नुकसानीचा आकडा कळेल, त्यानंतर शेतकऱ्यांना मदत करु. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार, असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
Mazi Batmi - Govt. Update
Published on: 21 October 2022, 07:36 IST