वरील कीटकनाशके बुरशीपासून (Pesticides from fungi) मिळवलेल्या घटकांद्वारे तयार केली जातात. ते विविध किडींचे नियंत्रण करण्यास मदत करतात.मेटारायझिम ॲनिसोपली ही बुरशी २८ प्रकारचे डिस्ट्रक्सिन (कीटकनाशक घटक) तयार करते.बिव्हेरिया बॅसियाना ही बुरशी बॅसियानीन व बिव्हेरिसिन ही कीटकनाशके तयार करते.व्हर्टिसीलिअम लेकॅनी ही बुरशी डिपोकोलॉनिक ॲसिड, सायक्लोस्पोरीन ही कीटकनाशक अर्क तयार करते.हिर्सुटेला थॉम्पसनी ही बुरशी हिर्सुटलीन ए व हिर्सुटलीन बी हे कोळीनाशक अर्क तयार करते.
कुजणे: शेतीतील सर्वांत महत्त्वाची प्रक्रियामेटारायझिम या बुरशीचे वैशिष्ट्ये-बऱ्याच किडींसाठी उत्कृष्ट कीटकनाशक.-सेंद्रिय किंवा नैसर्गिक घटक कुजवून खत करण्यात मदत करते.-वनस्पतीची वाढ करणे, रोग प्रतिकारक्षमता वाढणे यात मदत.-वनस्पतीच्या (plant) आत राहूनही कार्य करते.- अनेक देशांमध्ये मेटारायझिम या बुरशीचा वापर ऊस पिकात ५० लाख एकर क्षेत्रावर करण्यात येतो.-ही बुरशी मृत किडींमधील नत्र वनस्पतीला देतात. वनस्पतीतील कार्बन स्वतःच्या वाढीसाठी वापरतात.
मेटारायझिम बुरशीमुळे किडीचा मृत्यू कसा होतो?मेटारायझिम बुरशीच्या कोनिडीया जेव्हा किडींच्या संपर्कात येते, तेव्हा किडींच्या शरीरावर सर्वप्रथम चिटकून राहतात. मेटारायझिम बुरशीच्या कोनिडीयाचे अंकुरण होऊन मायसिलियमचे जाळे किडीच्या शरीरावर होते. अंकुरणानंतर अप्रेसोरीयम तयार होते. त्याच्या साह्याने बुरशी किडीच्या शरीरात शिरते. किडीच्या शरीरातील संपूर्ण अन्नद्रव्य संपवते. त्यामुळे कीड मृत होते. मृत किडीच्या शरीरात व बाहेरून मेटारायझिमची बुरशी वाढते.
किडीच्या शरीरातील संपूर्ण अन्नद्रव्य संपवते. त्यामुळे कीड मृत होते. मृत किडीच्या शरीरात व बाहेरून मेटारायझिमची बुरशी वाढते.मेटारायझिम किंवा बिव्हेरिया या सोबत वनस्पतींचे अर्कांचा वापर केल्यास चांगले परिणाम दिसतात. उदा. निमतेल अर्क व करंजतेल अर्क.निमयुक्त निविष्ठांच्या वापरातून हेलिकोव्हर्पा व स्पोडोप्टेराचे नियंत्रण करता येते.नीम व करंज अर्काचा लष्करी अळी, हेलिकोव्हर्पा अळीचे नियंत्रण शक्य होते.सर्वच प्रकारच्या जमिनीत "हुमणी अळी" नियंत्रणासाठी फायदेशीर
Published on: 02 July 2022, 07:28 IST