Agripedia

हंगामानुसार आपण विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड करतो. त्यासाठी संबंधित पिकापासून आपल्याला चांगले उत्पादन मिळावे यासाठी योग्य वाणांची निवड व रोपवाटिका टाकण्याचा कालावधी हा फार महत्वाचा असतो. म्हणजे व्यवस्थित व्यवस्थापन केले तर हातात मिळणारा पैसा देखील आपल्याला चांगला मिळतो. या लेखात आपण अशाच काही भाजीपाला पिकांची माहिती घेऊ व त्यांचे थोडक्यात व्यवस्थापन पद्धत जाणून घेऊ.

Updated on 10 August, 2022 7:31 PM IST

 हंगामानुसार आपण विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड करतो. त्यासाठी संबंधित पिकापासून आपल्याला चांगले उत्पादन मिळावे यासाठी योग्य वाणांची निवड व रोपवाटिका टाकण्याचा कालावधी हा फार महत्वाचा असतो. म्हणजे व्यवस्थित व्यवस्थापन केले तर हातात मिळणारा पैसा देखील आपल्याला चांगला मिळतो. या लेखात आपण अशाच काही भाजीपाला पिकांची माहिती घेऊ व त्यांचे थोडक्यात व्यवस्थापन पद्धत जाणून घेऊ.

 रब्बीतील भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन

1- वांगी- जर तुम्हाला देखील वांगी लागवड करायची असेल तर यासाठी जातींची निवड करताना कृष्णा, प्रगती आणि वैशाली सारख्या जातींची निवड करावी.

वांगी लागवडीसाठी हेक्‍टरी 600 ग्रॅम बियाणे पुरेसे होते. लागवड करताना लागवडीवेळी 75 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश अशा पद्धतीने खत मात्रा द्यावी व लागवड केल्यानंतर तीस दिवसांनी पुन्हा 75 किलो नत्राची मात्रा द्यावी.

नक्की वाचा:Fertilizers: शेतकरी मित्रांनो सावधान! खतांच्या अतिवापरामुळे पिकांचे होतेय मोठे नुकसान

2- टोमॅटो- जर तुम्हाला टोमॅटो लागवड करायचे असेल तर पुसा रुबी, देवगिरी, यशश्री आणि परभणी सारख्या जातींची लागवड करावी.

टोमॅटो लागवडीसाठी हेक्‍टरी 500 ग्रॅम बियाणे पुरेसे ठरते. खत व्यवस्थापन करताना लागवडी वेळी 50 किलो नत्र व प्रत्येकी 50 किलो स्फुरद व पालाश द्यावे. तसेच उर्वरित 50 किलो नत्राची मात्रा लागवड केल्यानंतर 30 दिवसांनी दिली तर उत्तम ठरते.

3- फुलकोबी- तुमच्या डोक्यात फुलकोबी लागवड करायचे असेल तर यासाठी पुसा सिंथेटिक आणि फुलकोबी स्नोबॉल 16 या जातींची लागवड महत्त्वाची ठरते. जर यामध्ये लागणारे बियाण्याचा विचार केला तर हेक्‍टरी 600 ते 700 ग्रॅम बियाणे पुरेसे ठरते.

फुल कोबीची लागवड करताना ती थोडीशी व्यवस्थितपणे करावी म्हणजे 60 बाय साठ किंवा साठ बाय 45 सेंटिमीटर अंतरावर रोपांची लागवड करावी.

लागवडीअगोदर 21 ते 25 दिवस आधी गादीवाफ्यावर रोपवाटिका तयार करून घ्यावी लागवड करण्यापूर्वी रोपे कार्बनडेसिम एक ग्रॅम प्रति लिटर या द्रावणात बुडवून लावावीत. फुलकोबी साठी खतांचे व्यवस्थापन करताना 160 किलो नत्र, प्रत्येकी 80 किलो स्फुरद व पालाश द्यावे.

नक्की वाचा:Greenary Fertilizer:ऊस लागवडीपूर्वी हिरवळीचे खत म्हणून तागाची लागवड ठरेल फायदेशीर,परंतु का?वाचा सविस्तर….

4- पालक- जर तुम्हाला पालक लागवड करायची असेल तर त्यासाठी ज्योती परित व ऑल ग्रीन या जाती खूप महत्त्वपूर्ण ठरतात. पालक लागवडीसाठी हेक्‍टरी आठ ते दहा किलो बियाणे गरजेचे आहे.

खत व्यवस्थापन करताना लागवडी वेळी 80 किलो नत्र प्रत्येकी 40 किलो स्फुरद व पालाश यांची मात्रा द्यावी. लागवड करताना दहा बाय दहा सेंटिमीटर अंतरावर बियाणे पेरावे किंवा तीन बाय दोन मीटर आकाराचे सपाट वाफे करून पेरणी करावी.

नक्की वाचा:Agri Tips: उसाच्या पाचटाचा असाही करा उपयोग, होईल जमीन सुपीक मिळेल उत्पादन भरपूर

English Summary: important management tips for rubby vegetable crop
Published on: 10 August 2022, 07:31 IST