मान्सून पाऊस जसा जसा जवळ येतजातो तसतशी शेतातील कामाची लगबग मोठ्या प्रमाणात चालू लागते.राज्यातील विविध भागांमध्ये पेरणीच्या अनेक पद्धती आहेत
त्यातील एक म्हणजे धूळवाफ पेरणी ही होय. धूळवाफ पेरणी म्हणजे पाऊस पडण्यापूर्वी म्हणजेच जून महिन्या पूर्वी जी पेरणी केली जाते त्याच धूळवाफ पेरणी असे म्हणतात.
ही पेरणी करण्याकरता सर्वप्रथम एप्रिल ते मे महिन्यामध्ये शेतीची मशागत करत असतात.ज्यावेळी कुळवणी,पाठवणी करण्यात येते त्यावेळी जमीन तापली असल्याने गरम पाण्यातून वाफ निघत आहे त्याप्रमाणे बारीक झालेली माती वाफेप्रमाणे वर येते म्हणून या पेरणीला धूळवाफ म्हणतात.
धूळ वाफ पेरणी पद्धत सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये देखील धूळवाफ पेरणी करण्यात येते.ही पेरणी साधारण अतिपावसाच्या ठिकाणी केली जाते. धूळवाफ पेरणी पद्धती ही कुरी,बांडगयांच्या साहाय्याने केली जाते.फक्त 20 टक्के पेरणी टोकण पद्धतीने केली जाते यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असते.
धुळवाफ पेरणी पद्धत भाताची शेती करण्यासाठी अधिक उपयुक्त ठरते.इंद्रायणी,कोमल,सोनम,भोगावती,नाथ पोहा,पार्वती,मधुमती,मेनका,राशी,पुनम,कोलम 51इत्यादी प्रकारच्या तांदूळ बियाणे यांचा यामध्ये समावेश होतो.
Published on: 21 December 2021, 05:44 IST