प्रत्येक शेतकऱ्याला पीक कोणतेही असो, रासायनिक खतांची गरज ही असतेच. पेरणीसाठी किंवा हळद, ऊस, आले, टोमॅटो, इत्यादी बागायती पिकांसाठी रासायनिक खतांचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो.प्रत्येक रासायनिक खतांच्या पोत्यावर (बॅगवर) त्यामध्ये असलेले नत्र, स्फुरद व पालाश या घटकांची टक्केवारी दिलेली असते. त्यावरून अनेक शेतकऱ्यांच्या मनात गैरसमज असतात.1) युरियाच्या पोत्यावर 46 % नत्राचे प्रमाण दिलेले असते. यावरून अनेक शेतकऱ्यांचा असा समज
असतो की, युरियाच्या त्या पोत्यात 46 किलो नत्र आहे. परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे.युरियाच्या 45 किग्रॅ. वजनाच्या पोत्यात फक्त 20 किलो 700 ग्राम नत्र असते.काहीजण म्हणतील ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. परन्तु ते चुकीचे आहे. ही अजिबात फसवणूक नाही.पोत्यावर 46 % N म्हणजेच नायट्रोजन (नत्र )असे दिलेले असते. याचा अर्थ असा असतो की, 100 किलो युरियात 46 किलो नत्र आहे. या हिशोबाने 45 किलो युरियात 20 किलो 700 ग्राम नत्र असते.
याचा अर्थ असा असतो की, 100 किलो युरियात 46 किलो नत्र आहे. या हिशोबाने 45 किलो युरियात 20 किलो 700 ग्राम नत्र असते.(2) सिंगल सुपर फॉस्फेटच्या 50 किलोच्या पोत्यावर 16 % P (स्फुरद) असे दिलेले असते. याचा अर्थ 16 किलो स्फुरद नसून 8 किलो असतो.सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये जलद विरघळणारे व हळू हळू विरघळणारे असे दोन्ही प्रकारचा स्फुरद असते. तसेच सल्फर (गंधक) कॅल्शियम व मॅग्नेशियम ही अन्न द्रव्येही समाविष्ट असतात.
( 3) पोटॅशच्या 50 किलोच्या पोत्यावर 60 % K (पालाश) असे दिलेले असते, तेव्हा त्यामध्ये केवळ 30 किलो पालाश असते.4) वरील हिशोबाने 10 26 26 या खताच्या 50 किलोच्या पोत्यात केवळ 5 किलो नत्र, 13 किलो स्फुरद व 13 किलो पालाश या प्रमाणातच असतात.इतर सर्व मिश्र खते ही 50 किलोच्या बॅग मध्येच असतात. म्हणूनच त्या बॅगवर नत्र, स्फुरद व पालाश यांची जितकी टक्केवारी दिलेली असते, त्याच्या निम्मे किलो अन्नद्रव्ये असतात.
Published on: 08 July 2022, 06:20 IST