Agripedia

या पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी कथा बरोबर त्याला माती परीक्षण करून रासायनिक खतांचा योग्य पुरवठा करावा लागतो.सेंद्रिय खतांचा वापर वाढवल्यास शेंगांचे प्रमाण, रंग,चकाकी आणि प्रत सुधारते. शेवग्याला वर्षातून दोनदा बहार येतो.

Updated on 30 November, 2021 1:17 PM IST

या पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी कथा बरोबर त्याला माती परीक्षण करून रासायनिक  खतांचा योग्य पुरवठा करावा लागतो.सेंद्रिय खतांचा वापर वाढवल्यास शेंगांचे प्रमाण, रंग,चकाकी  आणि प्रत सुधारते. शेवग्याला वर्षातून दोनदा बहार येतो.

त्यामुळे शेवगा पिकाला खतांचा वापर करणे गरजेचे आहे.शेवगा झाडाची छाटणी केल्यावर एकदा शेणखत वापरावे.शेण खतासोबत रासायनिक खतांचा देखील वापर करणे फायद्याचे असते. एका एकर साठी 50 किलो युरिया, 150 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश ही खते द्यावीत. त्यानंतर 30 ते 40 दिवसांनी पुन्हा एकदा एकरी 50 किलो युरिया द्यावा. माती परीक्षण करून जमिनीचा प्रकार आणि झाडांची वाढ यानुसार नत्राचे प्रमाण ठरवावे.

  • पहिला बहार निघाल्यानंतर नवीन पालवी फुटून जेव्हा फुले येऊ लागतात त्यावेळी पुन्हा एकदावरील प्रमाणे खतांचे नियोजन करावे.
  • अशाप्रकारे वर्षातून दोनदा रासायनिक खतांचा वापर करावा. शक्य असल्यास सेंद्रिय खतांचा वापर जर वाढवला तर शेंगांचे प्रमाण, शेंगांना चकाकी आणि त्यांची प्रत सुधारते. शेवग्याचा शेंडा जास्त वाढत असल्यास नत्र वापर कमी करावा. जर शेंगांची फुगवण कमी होत असेल आणि फुलगळ कमी होऊन शेंगांची संख्या वाढवायची असेल तर स्फुरदखतांचा वापर करावा.

शेवगा पिकासाठी ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन

  • दर आठवड्याला एकरी पाच किलो याप्रमाणे फुले लागेपर्यंत 19:19:19
  • आलटून-पालटून दर आठवड्याला एकरी पाच किलो याप्रमाणे फुले लागल्यानंतर 12:61:0 आणि 13:00:45
  • दर आठवड्याला आलटून-पालटून एकरी पाच किलो याप्रमाणे शेंगा फुगवण्यासाठी 00:52:34 आणि 0:00:50
English Summary: important fertilizer management in drumstick crop for more production
Published on: 30 November 2021, 01:17 IST