Agripedia

नमस्कार मंडळी थोडं पण महत्वाचं आहे आपन वाचाल यांची मला जाणीव आहे मित्रांनो आपल्या शेतात रसायनाचा अतिरेक वापर केला जातो यामुळे काय होते की माती मधे मोठ्या प्रमाणात क्षार जमा होतात व जमीन कडक होते.

Updated on 02 May, 2022 9:16 AM IST

नमस्कार मंडळी थोडं पण महत्वाचं आहे आपन वाचाल यांची मला जाणीव आहे मित्रांनो आपल्या शेतात रसायनाचा अतिरेक वापर केला जातो यामुळे काय होते की माती मधे मोठ्या प्रमाणात क्षार जमा होतात व जमीन कडक होते.

परीनाम आपल्या समोर आहे आज जमिनीच कल्टीवेशन करतो तर ट्रॅक्टर सुद्धा लागत नाही पिकं हे सुद्धा अपटेक करत नाही. देशात रसायनाचे आगमन व त्यांचा वापर होण्यापूर्वी शेतकरी शेणखत, गाळाचे खत, निरनिराळया पेंडींचा वापर, पिकांची फेरपालट यांचेद्वारे जमिनीची सुपिकता टिकवून ठेवत असे. कालांतराने शेतकरी रासायनिक खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करु लागले व त्यामुळे त्याचा दुष्परिणाम पिकावर तसेच जमिनीत दिसून येऊ लागला. पर्यायाने शेतकरी, पाणी, प्राणी, पक्षी मानवी आरोग्य व गांडूळ मित्रांचे अस्तित्वच धोक्यात आले.त्या मुळे मातितील जैविक घटक कमी होत आहे.आता हेच पहाना मर  हा रोग नैसर्गिक क्रिया नाही ति मानव निर्मित क्रिया आहे. आपन शेतात तननाशकाची फवारणी करतो त्या मुळे शेती मधिल सुपिकता कमी होत आहे व क्षारता वाढत आहे.

त्या मुळे आपन मर या रोगाला फुकटचे आमंत्रण दिले आहे.आपन आपल्या शेती चा रसायनांचा कारखाना केला आहे त्या मुळे माती मधले जिवाणू व बुरशी संपवण्याचा विडा उचलला आहे.समजुन सुद्धा न समजल्या सारखे करत आहे.मि माझ्या लेखात नेहमी सांगत असतो की मातीला वाचवा ति जिवंत  परीसंस्था आहे तिच्या कर्बाची वाढ करा. तुम्हाला कळेल की आपन अनेक गोष्टी वर विनाकारण खर्च करत आलो आहोत आपन या गोष्टीतुन तनाव मुक्त झालो तर आपला आत्मविश्वास वाढेल.चुकीच्या पद्धती ने आपली जमिन खराब करु नका कोणतीही गोष्ट जास्त झालीतर अपायकारक ठरू शकते मग ति रासायनिक असो की सेंद्रिय पद्धती असो मला हेच सांगायचे आहे की शेती मधली सुपिकता ही यशस्वी व प्रगत शेतकर्यांनी ओळख आहे.आपण शेती करतो पण आपल्या  काही शेतकर्‍यांच्या शेतीच्या व्यवसायाला कोणत्या ज्ञानचा आधारच नाही त्यामुळे काय होते कि आपल्या शेतीतून जास्तीत जास्त किती उत्पन्न आपन काढु शकतो आणि किती उत्पन्न निघते याचा या शेतकर्‍यांनी कधी सकारात्मक  विचारच करतं नसतो.आपत  कृषि प्रधान देशात आहे पण या देशाचा दर एकरी उत्पन्नाच्या बाबतीत जगात हा खालच्या क्रमांक आहे.आपल्या येथे शेतीचि परीस्थिती अनुकूल असूनही योग्य रित्या शेती केली जात नाही ही अवस्था निर्माण झालेली आहे.

शेतजमिनीचे विभाजन म्हणजे शेती व्यवसायाच्या अधोगतीचे कारण आहे.आता तुम्हीच सांगा आपन ज्ञानी अहो कि अज्ञानी...!

*मिलिंद जि गोदे*

*Save the soil all together*

*Mission agriculture soil information*

*milindgode111@gmail.com*

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:गांडूळ शेतकऱ्यांचा मित्र कसा ते समजून घेऊ या. आणि महत्वाचे कार्य

नक्की वाचा:जमिनीची होणारी धूप - आणि प्रगतशील शेतकऱ्याने सागितले हे त्यावर महत्वाचे उपाय

नक्की वाचा:खरीप हंगाम 2022 साठी भगवती सीड्सचा कापूस आणि बियाणे सल्ला

English Summary: important anylysis on soil fertility and excess use of chemical fertilizer
Published on: 02 May 2022, 09:16 IST