Agripedia

हळदीच्या शेतात पाणी साचून राहिल्यास कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव दिसतो.

Updated on 14 July, 2022 7:47 PM IST

हळदीच्या शेतात पाणी साचून राहिल्यास कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. हळद पिकामध्ये कंदकूज प्रामुख्याने बुरशी किंवा जिवाणूंमुळे होते. कंदकूज बुरशीजन्य आहे की जिवाणूजन्य आहे ते सर्वप्रथम ओळखावे. त्यानुसार नियंत्रण करावे. बुरशीजन्य कंदकूज प्रतिबंधासाठी जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा प्लस २ ते २.५ किलो प्रति एकर २५० ते ३०० किलो सेंद्रिय खतामध्ये मिसळून दीड महिन्याच्या अंतराने दोन ते तीनवेळा वापरावे. पाण्याचा योग्य निचरा ठेवावा. कंदकूजीस सुरवात झाल्यानंतर कॉपर ऑक्सिक्लोराईड ४ ते ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून किंवा १ टक्के बोर्डो मिश्रणाची आळवणी करावी. रोगाची तीव्रता जास्त

असल्यास, मेटॅलॅक्‍सिल (८%) + मॅंकोझेब (६४% डब्ल्यूपी) हे संयुक्त बुरशीनाशक ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आळवणी करावी. आळवणी करताना जमिनीस वाफसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास थोडासा पाण्याचा ताण द्यावा. गरज वाटल्यास पुन्हा एकदा वरील औषधांची आळवणी करावी. जिवाणूजन्य कंदकूज ओळखण्यासाठी रोगग्रस्त कंदाचा भाग धारदार ब्लेडने कापून स्वच्छ काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन त्याचे टोक त्यामध्ये बुडवावे. त्यामधून दुधासारखा स्राव पाण्यामध्ये आल्यास जिवाणूजन्य कंदकूज आहे हे ओळखावे. जीवाणूजन्य कंदकूज असल्यास स्ट्रेप्टोसायक्लीन २ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून आळवणी करावी.

आले विषयी कृषी सल्ला आल्याच्या शेतात पाणी साचून राहिल्यास कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. आले पिकामध्ये कंदकूज प्रामुख्याने बुरशी किंवा जिवाणूंमुळे होते. कंदकूज बुरशीजन्य आहे की जिवाणूजन्य आहे ते सर्वप्रथम ओळखावे. त्यानुसार नियंत्रण करावे. बुरशीजन्य कंदकूज प्रतिबंधासाठी जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा प्लस २ ते २.५ किलो प्रति एकर २५० ते ३०० किलो सेंद्रिय खतामध्ये मिसळून दीड महिन्याच्या अंतराने दोन ते तीनवेळा वापरावे. पाण्याचा योग्य निचरा ठेवावा. कंदकूजीस सुरवात झाल्यानंतर कॉपर ऑक्सिक्लोराईड ४ ते ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून किंवा १ टक्के बोर्डो

मिश्रणाची आळवणी करावी. रोगाची तीव्रता जास्त असल्यास, मेटॅलॅक्‍सिल (८%) + मॅंकोझेब (६४% डब्ल्यूपी) हे संयुक्त बुरशीनाशक ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आळवणी करावी. आळवणी करताना जमिनीस वाफसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास थोडासा पाण्याचा ताण द्यावा. गरज वाटल्यास पुन्हा एकदा वरील औषधांची आळवणी करावी. जिवाणूजन्य कंदकूज ओळखण्यासाठी रोगग्रस्त कंदाचा भाग धारदार ब्लेडने कापून स्वच्छ काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन त्याचे टोक त्यामध्ये बुडवावे. त्यामधून दुधासारखा स्राव पाण्यामध्ये आल्यास जिवाणूजन्य कंदकूज आहे हे ओळखावे. जीवाणूजन्य कंदकूज असल्यास स्ट्रेप्टोसायक्लीन २ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून आळवणी करावी.

English Summary: Important agricultural advice for turmeric and ginger crops
Published on: 14 July 2022, 07:47 IST