Agripedia

ऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखे पासून सुरु होणारा रब्बी हंगाम या वर्षी थोडा उशिरा सुरु झाला.

Updated on 28 September, 2022 8:27 PM IST

ऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखे पासून सुरु होणारा रब्बी हंगाम या वर्षी थोडा उशिरा सुरु झाला. सर्वत्र पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने या वर्षी कापूस काढून रब्बीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होइल् मका ,ज्वारी ,दादर/शाळू ,हरबरा ,कांदा, गव्हू, हि रब्बीची मुख्य पिके आहेत, त्यांच्या लागवडीत या वर्षी चांगलीच वाढ होईल .मका,रब्बी ज्वारी , दादर/शाळू - या पिकांवर कधी नव्हे, इतक्या मोठ्या प्रमाणात अमेरिकन लष्करी अळी पडली, या अळी च्या बंदोबस्ता साठी डेसीस 100 डेलिगेट कोराजन, आवांट अशी फवारणी

करूनही अळी आटोक्यात आली नाही ,शेतकऱ्यांनी 2/2 , 3/3 वेळा अळी नाशकाचे फवारणी करून प्रत्येक शेतकरी अमेरिकन लष्करी अळी वर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे.Farmers are trying to control the American armyworm.अमेरिकन लष्करी अळी नियंत्रणा साठी डेसीस आंणि क्विनॉलफॉस या कॉम्बिनेशचा ,

शेतकरी बंधुनो कृषि विद्यापीठाच्या सल्ल्याने फायद्याची व्यावसायिक शेती कृतीत आणा :- आ. श्री. हरीश पिंपळे

फॉसफोरफाईव्हचा आणि फायटर या सेंद्रिय अळी नाशकाचा ज्या शेतकऱ्यांनी उपयोग केला त्यांना चांगला फायदा झालेला दिसतो, दीर्घ काळ पर्यंत अळी नियंत्रणात आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.मका या पिकाला झिंक लव्हिंग प्लांट म्हणतात ,

साधारणतः 30/35 दिवसाचे पीक झाल्यावर चिलेटेड झिंक 20 ग्रॅम फवारणी करावी, खताच्या दुसऱ्या हप्त्यात 40/45 दिवसांनी 10 किलो झिंक सल्फेट द्यावे ,वापसा स्थितीतच पाण्याच्या पाळ्या द्याव्यात , मका निसवल्या नंतर दाणे भरण्याच्या अवस्थेत 2 पाणी अत्यंत आवश्यक असतात. मक्याचे पीक निसवल्या नंतर एकरी 200 ते 300 ग्रॅम चिलेटेड झिंक आणि 2/3 किलो पोट्टयाशियम पोलीफॉस्फेट दिल्याने मक्याच्या उत्पन्नात चांगली वाढ होते.उन्हाळी मका लागवड डिसेंम्बरच्या 15 तारखेपर्यंतच करतात पण ह्या वर्षी जास्त पाऊस आणि हिवाळा थोडा उशिरा सुरु झाल्यामुळे थंडीचे

प्रमाण 20/25 फेब्रुवारी पर्यंत चांगले राहील, त्यामुळे जे शेतकऱ्यांनी 20 डिसेंबर पर्यंत मक्याची लागवड करतील त्यांना चांगले उत्पन्न अपेक्षीत आहे ,1 जानेवारी नंतर मका लागवडीला जसजसा उशीर होईल तसतसे उत्पन्नात घट होईल. 10 जानेवारी नंतर लागवड केलेल्या मक्याच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट येईल. माझ्यामते 10 जानेवारी नंतर लागवड केलेल्या मक्याचे उत्पन्न निम्म्यावर येईल.रब्बी ज्वारी ,दादर/शाळू या पिकांना आवश्यकतेनुसार पीक शेलपानावर असताना, म्हणजे निसवत असताना पाण्याची एक वेळ आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत एक वेळ असे दोन वेळा

पाणी दिल्यास उत्पन्नात चांगली वाढ होते.गव्हू - गव्हू या पीकाला थंडी चांगली मानवते, गव्हाचे चांगले उत्पन्न येण्यासाठी 4 ते 5 वेळा सिंचनाची आवस्यकता असते ,1) उगवणीच्या वेळी पेरणीनंतर2) 22 ते 25 दिवसांनी मुकुट मुळे फुटण्याच्या अवस्थेत,3)कांडी धरण्याच्या अवस्थेत म्हणजे 40/42 दिवसांनी,4) गव्हू निसवताना,म्हणजे 60/62 दिवसांनी5)गव्हाच्या दाण्यात चीक भरण्याची किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत ,म्हणजे साधारणतः 80/82 व्या दिवशी.

वरील प्रमाणे पाण्याचे नियोजन करावे.गव्हू या पिकाला पेरणी नंतर दुसरे पाणी 20/22 दिवसांनी दिले तर फुटव्यांची संख्या चांगली वाढते. या वर्षी वाईट हवामानामुळे मावा, अळी, करपा, तांबेरा या रोगांना गव्हाचे पीक बळी पडेल, त्यासाठी मावा आणि अळी नाशकासोबत एम 45 आणि कार्बेनडिझम या बुरशी नाशकांचा वापर करावा.हरबरा -अत्यन्त कमी पाण्यात येणारे पीक आहे, उगवणीच्या वेळी एक ,दुसरे 35 दिवसांनी आणि 3 रे 70/75 व्या दिवशी अशा तीनच पाण्यात हे पीक घ्यावे ,कोरड मध्ये जमिनीतील वापशावर उगवण

झाली असल्यास पेरणीनंतर 40 आणि 75 व्या दिवशी असे दोनच पाण्यात हे पीक चांगले येते. हरबऱ्याला जास्त पाणी दिल्यास मर किंवा उभळ खूप होते यासाठी हलके पाणी देणे उपयुक्त ठरते ,पाट पाण्यापेक्षा तुषार सिंचनाने किंवा ठिबक सिंचनाने पाणी दिल्यास उत्पन्नात चांगली वाढ होते. या पिकाला खतांची खूप आवस्यकता नसते, आमच्या चोपडा जिल्हा जळगाव भागात बरेच शेतकरी कोणतेच रासायनिक खत न देता हरभऱ्याचे चांगले उत्पन्न घेतात, पीक एक दीड महिन्याचे झाल्यावर 19/19/19 100 ग्रॅम आणि चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएन्ट 20 ग्रॅम अशी फवारणी घेतल्यास उत्पन्नात वाढ होते.

उन्हाळी पिके - भुईमूग, बाजरी वैशाखी मूग, उन्हाळी तीळ ,गवार ,कांदा , सोयाबीन वेलवर्गीय भाजीपाला पिके ढेमसे ,कार्ले गिळले ,दोडके , खरबूज, टरभुज, काकडी या पिकांची लागवड साधारणतः 20 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत केली जाते.15 फेब्रुवारी नंतर लावलेल्या उन्हाळी पिकांच्या उत्पन्नात जसजशी लागवड उशिरा होते तसतसे उत्पन्नात घट होत जाते , त्यासाठी कोणतेही उन्हाळी पीक 15 फेब्रुवारीच्या आतच लागवड करावी.भगवती सिड्स च्या सर्व (40) ग्रुप्स वर उन्हाळी पिकांची सविस्तर माहिती, डिसेंम्बर महिन्यात दिली जाईल .उद्या पासून सर्व ग्रुप्स वर रब्बि पिकाचि माहिती दिली जाईल, ज्या शेतकऱ्यांनी जि पिके लावली असतील त्यांनी ते लेख (स्टार) करून ठेवावेत

 

प्रा. दीलीप शिंदे सर

भ्रमणध्वनी 9822308252

English Summary: Important Agricultural Advice for Rabi and Summer Crops
Published on: 28 September 2022, 04:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)