Agripedia

महाराष्ट्र मध्ये बरेचसे शेतकरी सोयाबीन पिकाचे उत्पन्न घेत असतात

Updated on 05 August, 2022 8:21 PM IST

महाराष्ट्र मध्ये बरेचसे शेतकरी सोयाबीन पिकाचे उत्पन्न घेत असतात मात्र त्यामध्ये काही कीटक व विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने उत्पन्नावर फटका बसतो त्यामुळे राहुरी कृषी विद्यापीठाने सोयाबीन पिकावर विषाणूजन्य रोगाचे व्यवस्थापन कसे करावे यावर मार्गदर्शन केले आहे.

१ ] मोझॅक : सोयाबीन पिकावरील मोझॅक हा विषाणूजन्यरोग असून तो सोयाबीन मोझॅक व्हायरस नावाच्या विषाणूमुळे होतो.Caused by a virus called soybean mosaic virus.लक्षणे व परिणाम : रोगग्रस्त झाडांच्या पानांच्या शिरा पिवळ्या पडतात तसेच फिक्कट हिरवे व पिवळसर हिरवे रंगाचे पट्टे विर दिसून येतात. झाडांची पाने गुंडाळली जातात. पानांवरील पेशी नष्ट होतात व झाड वाळते. त्यानंतर रोगग्रस्त झाडापासून तयार होणारे बियाणे आकाराने लहान व सुरकतलेले असते

व त्याची उगवण क्षमता कमी होते. साधारणपणे ३० से. पेक्षा जास्त तापमान या रोगास पोषक असून या हवामानात रोगाची लक्षणं ठळकपणे दिसून येतात, रोगाचा प्रसार या रोगाचा प्रसार प्रामुख्याने मावा या किडीव्दारे तसेच बियाणेव्दारे होतो.रोग व्यवस्थापन : १] विषाणूविरहित चांगल्या प्रतीचे बियाणे पेरणीसाठी वापरावे.२]रोगाची लक्षणे दिसताच विषाणूजन्य रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.३] विषाणूजन्य रोग प्रभावित क्षेत्रातील सोयाबीन बियाण्यासाठी वापरु नये.

४] या विषाणुजन्य रोगाचा प्रसार प्रामुख्याने मावा या किडीव्दारे होत असल्याने मावा या किडीच्या नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस या किटकनाशकाची १५ मि.ली. १० लि. पाण्यात किंवा इमिडाक्लोरोपिड १७.८ टक्के एस.एल. या किटकनाशकाची ४ मि.ली. प्रति १० लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.२ ] पिवळा मोझॅक :पिवळा मोझॅक हा विषाणूजन्य सोयाबीन पिकावर रोग असून तो मुगविन येलो

मोझॅक या विषाणूमुळे होतो. रोगाचा प्रसार या रोगाचा प्रसार प्रामुख्याने पांढरी माशी या किटकाव्दारे होतो.लक्षणे व परिणाम- रोगट झाडांच्या पानांचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. शेंडयाकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात. बाधित झाडाची वाढ पुर्णपणे खुंटते. पाने सुरकतून जातात फुलांची व शेंगाची संख्या देखील कर्मी होते. सोयाबीनच्या उत्पन्नावर रांगाचा विपरीत

परिणाम होतो. या रोगाचा प्रसार पांढरी माशी या किटकाव्दारे होती.रोग व्यवस्थापन :१] या रोगाचा प्रसार पांढ-या माशीव्दारे होतो. त्यामुळे पांढ माशीच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही किटकनाशकाचा वापर करावा डायमिथोएट ३० टक्के प्रवाही १० मि.ली. किंवा मिथील डेमेटॉन २५ टक्के प्रवाही १० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२] रोगाची लक्षणं दिसताच शेतातील रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.३सोयाबीन पिकात आंतरपीक व मिश्र पीक घेतल्यास रोगाचे प्रमाण कमी आढळते.४ पिवळे चिकट सापळे सोयाबीन पिकात हेक्टरी १० ते १२ प्रमाणे लावावेत.

 

विभाग प्रमुख

वनस्पती रोगशास्त्र व कृषि अणुजीवशास्त्र व कृषि अणुजीवशास्त्र विभाग, म.फु. क.वि, राहुरी

संशोधन संचालक

महात्मा फुले कृषि विदयापीठ, राहुरी

English Summary: Important Advice on Viral Disease Management on Soybean Crop by Rahuri Agricultural University
Published on: 05 August 2022, 08:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)