Agripedia

पिकांच्या योग्य वाढीसाठी 18 अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. प्रत्येक अन्नद्रव्ये पिकांच्या शरीरात विशिष्ट प्रकारचे कार्य करीत असते. दुसरे अन्नद्रव्यांची कमतरता भासली तर पिकांवर त्यांचा वाईट परिणाम होतो.

Updated on 13 February, 2022 6:44 PM IST

पिकांच्या योग्य वाढीसाठी 18 अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. प्रत्येक अन्नद्रव्ये पिकांच्या शरीरात विशिष्ट प्रकारचे कार्य करीत असते. दुसरे अन्नद्रव्यांची कमतरता भासली तर पिकांवर त्यांचा वाईट परिणाम होतो.

त्यामुळे या सर्व अन्नद्रव्यांचे कार्य समजून घेऊन त्यांचे विविध खतांद्वारे योग्य पुरवठा केल्यास पिकाला लागणारे पोषक घटक मिळून पिके चांगली येतात व उत्पादनात वाढ होते. या लेखात आपण काही अन्नद्रव्य विषयी माहिती घेणार आहोत.

  1. नत्र व त्याचे कार्य :-

पिकांच्याशरीरातील प्रथिने आणि हरितद्रव्य तयार करण्याच्या प्रक्रियेत मदत करणारा नत्र हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे पिकाचे पाणी हिरवीगार राहतात.तसेच पानांची खोडाची वाढ झपाट्याने होते.नत्रामुळे अन्नधान्य व कडधान्य बियांमध्ये प्रथिनांचे प्रमाण वाढते. यांचा योग्य पुरवठ्यामुळे स्फुरद व पालाश तसेच अन्य घटकांचे शोषणाला मदत होत

  1. नत्राच्या कमतरतेमुळे होणारे परिणाम :-

नत्राच्या कमतरतेमुळे झाडाची अधिक परिपक्व झालेली पाणी हळद पिवळी पडून गळतात.मुळे व खोडाचे वाढ मंदावते.झाडांना नवीन फूट तयार होत नाही.फुले कमी येतात. तसेच तृणधान्य, दाणे व फळे पूर्णपणे पक्व होत नाहीत. तसेच नत्राच्या अधिक मात्रा दिल्यामुळे पालवीची अधिक वाढ होऊन किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

  1. स्फुरद व त्याची कार्य :-

कार्य - पिकांच्या पेशीची विघटन आणि त्यांच्या वाढीसाठी स्फुरदाची गरज असते.स्फुरदाच्या यथायोग्य उपलब्धतेमुळे अंकुरण लवकरच होते. बाल्यावस्थेत लवकर मुळे फुटतात तसेच मा यांचे जाळे तयार झाल्याने पिक ती जमिनीवर लोळत नाही.

 फुले, दाणे भरपूर येतात त्यातील खनिज द्रव्यांचे प्रमाण वाढते. द्विदल वनस्पती मध्ये स्फुरदाच्या अस्तित्वामुळे सूक्ष्मजीवांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. मुळांवरील गाठींची प्रमाणात वाढ होते.

  1. स्फुरदाच्या कमतरतेची लक्षणे :-

स्फुरदाच्याकमतरतेमुळे सर्वसाधारणपणे पिकांची वाढ खुंटून तसेच तृणधान्य, कडधान्यव फळांचे उत्पादन कमी होते.पानावर जांभळ्या छटा दिसतात पानांवरील दाट  हिरवेपणा आणि जांभळी छटा हे स्फुरदाच्या कमतरतेचे मुख्य लक्षण आहे.

  1. पालाश व त्याचे कार्य :-

पिकाची वाढ जोमदार पणे होऊनधाड्यांमध्ये ताठपणा येतो.पिके अधिक वाढली तरी जमिनीवर लोळत नाहीत. कोरडवाहू शेतीमध्ये पालाशच्या वापरामुळे बाष्पीभवनाची प्रक्रिया मंदावते. पेशींमध्ये पाणी अधिक साठवण राहते.

 पिकामध्येपिष्टमय आणि शर्करा युक्त पदार्थ तयार करण्यासाठी पालाशची गरज असते. पालाश हा विकाराचा महत्त्वाचा घटक असून संश्लेषित शर्करा आणि पिष्टमय पदार्थ बिया, मुळे कंद फळांकडे वाहून नेण्याचे कार्य करते. प्रथिने तयार करण्याचे कामही पालाश मुळे नियंत्रित केले जाते. किड व रोग प्रतिकार शक्ती ही पालाश मुळे वाढते.

  1. पालाशच्या कमतरतेची लक्षणे:-

जुन्या पानांच्या कडा पिवळसर होऊन पानांवर पांढरे ठिपके पडतात.सर्वसाधारण पिकांची वाढ मंदावते. पिकांचे धांडे कमजोर होतात. शेंडे जळतात,बिया आणि फळांचा आकार ओबडधोबड होतो.

English Summary: important acticity of main nutrution in crop and symptoms of dificiency
Published on: 13 February 2022, 06:44 IST