नमस्कार मंडळी थोडं पण महत्वाचं मातीचे परीक्षण का करावे व कशासाठी? हा प्रश्न सर्वसामान्य शेतकरी यांना पडतो. माती परीक्षण मातीमध्ये विविध अन्नद्रव्ये घालण्यापूर्वी त्यातील अन्नद्रव्यांचे प्रमाण तपासणे गरजेचे आहे. त्या पुढील कोणते पीक घ्यावयाचे, प्रश्न सर्वसामान्य शेतकरी यांच्या मनात येत असेल माझ्या ही मनामध्ये निर्माण झाला होता
पण मला या क्षेत्रात मार्गदर्शन केले केले ते म्हणजे कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावती यांनी माती परीक्षण या संदर्भात संपूर्ण माहिती प्रधान केली.श्री अमर तायडे सर यांनी शेतकरी यांच्या सोबत संवाद साधताना सुचक माहीती दीली की कोणती वरखते व खते घालावी लागतात त्यांचे प्रमाण ठरवता येते. माती परीक्षण ही जमिनीचे रासायनिक विश्लेषण करण्याची जलद आणि शास्त्रीय पद्धती आहे. जमिनीमध्ये असलेल्या वेगवेगळ्या अन्नद्रव्यांचे प्रमाण काढणे आणि त्यानुसार पिकांना रासायनिक खतांच्या मात्रा देणे हा माती परीक्षणाचाच मुख्य उद्देश आहे. योग्य खत व्यवस्थापन आणि फायदेशीर शेती उत्पादन यासाठी माती परीक्षण हे शेतीचे आवश्यक आहे.माती परीक्षण ही जमिनीचे रासायनिक विश्लेषण करण्याची जलद आणि शास्त्रीय पद्धती आहे.कारत जमिनीमध्ये असलेल्या वेगवेगळ्या अन्नद्रव्यांचे प्रमाण काढणे आणि त्यानुसार पिकांना रासायनिक खतांच्या मात्रा देणे हा माती परीक्षणाचाच मुख्य उद्देश आहे.
माती परीक्षणामुळे जमिनीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता ठरविणे, शेतजमिनीतील उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश व इतर अन्नद्रव्यांचे प्रमाण काढून त्यानुसार रासायनिक खतांच्या मात्रा देणे सोयीचे होते. वनस्पतींच्या वाढीसाठी लागणार्या पोषक अन्नद्रव्यांचा समतोल जमिनीत कायम राखून कृत्रिम अन्नद्रव्यांच्या खर्चात अधिक बचत करता येते. माती परीक्षण आधारे गाव व तालुका पातळीवर जमिनीची सुपिकता निर्देशांक ठरवून त्यानुसार उत्पन्न वाढीसाठी प्रय करता येतो किंवा विभाग वार खतधोरण ठरवता येते.
माती परीक्षण अश्या साठी ?
आपल्या माती शिल्लक अन्नद्रव्य उपलब्धता किती आहे हे पाहून पुढील अन्नद्रव्यांच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
आपन बारमाही पिकं उत्पादन घेतो तेव्हा पिक अन्नद्रव्य ची उचल करत असतो पण आपल्या कोणते पीक किती उचल करतात हे माहीत होण्यासाठी तिनवर्षातून कमीत कमी एकदा योग्यवेळी माती परीक्षण करणे गरजेचे आहे.
बऱ्याचदा जमिनीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्ये असूनसुद्धा ती पिकांकडून घेतली जात नाहीत त्यामुळे अतिरिक्त खते शेतकऱ्यांकडून जमिनीत दिली जातात आणि त्यामुळे जमिनीचा समतोल बिघडतो या साठी माती परीक्षण यांच्या अहवालानुसार आपण पुढे अचूक खत व्यवस्थापन करून पिकांची उत्पादकता व गुणवत्ता यामध्ये सातत्य राखू शकतो. जेव्हा शेतकरी मातीचा नमुना घेतात कृषी विज्ञान केंद्र घातखेड येथील विषय तज्ञांचे नेहमी मार्गदर्शन लाभत असते तसेच यांच्या संकल्पनेतून माती परीक्षण यांचे महत्त्व शेतकरी यांच्या पर्यंत पोहचवण्यासाठी तत्पर असतात.
माझ्या शेतकरी बांधवांना
मातीचा नमुना कसा घ्यावा
हे समजणे महत्त्वाचे आहे
आपल्या जमिनीचा उतार,खोली, पोत याचा सर्वसाधारण विचार करून प्रत्येक विभागातून स्वतंत्ररीत्या नमुना घ्यावा.
जमिनीच्या पृष्ठभागावरील काडीकचरा,दगड,गोटे बाजूला सारून 30x30x30 सेमी आकाराचा चौकोनी खड्डा घ्यावा.
खड्ड्यातील पूर्ण माती काढून त्यानंतर खड्ड्यातील चारही बाजूची जाडीची माती खुरप्याच्या अथवा टोकदार लाकडी खुंटीच्या साह्याने वरपासून खालपर्यंत खरडून घ्यावी.
असे एका एकरातून मातीच्या प्रकारानुसार 7 ते 8 ठिकाणावरून नमुने घ्यावा नमुना घेतांना GPS रीडींग घेऊन
नमुने गोळा करण्यासाठी फावडे, खुरपे, घमेले व कापडी पिशवी इ. साहित्य जवळ बाळगावे.
गोळा केलेल्या मातीचे समान चार भाग करावे.
समोरासमोरील दोन भाग काढून टाकून उर्वरित मातीचा पुन्हा ढीग करावा व त्याचे पुन्हा समान भाग करून समोरासमोरील दोन भागाची माती काढून टाकावी.
नमुन्यादाखल घेतलेली माती ओली असल्यास ती सावलीत वाळवावी. फळबागेसाठी लागवड करावयाच्या व लागवड झालेल्या क्षेत्रामध्ये मातीचा नमुना घ्यावयाच्या ठिकाणी खोलीचा खड्डा घेऊन प्रत्येक खोलीसाठी स्वतंत्र नमुना घ्यावा.
अश्या प्रकारे घेतलेला 1 किलो मातीचा नमुना कृषी विज्ञान केंद्र यांच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा.
पुन्हा एकदा लक्षात ठेवा मित्रांनो सूक्ष्म अन्नद्रव्यांची तपासणी करण्यासाठी लोखंडी हत्यारांचा वापर करूच नये.
शेतकऱ्याचे संपूर्ण नाव,पूर्ण पत्ता, व मोबाईल क्र.
नमुना घेण्याची तारीख
सर्व्हे न./ गट नं
मोबाईल मध्ये घेतलेलं GPS रीडींग
शेतीचा प्रकार – बागायत / कोरडवाहु
ओलितांचे साधन....
हि सर्व माहिती देणे महत्त्वाचे आहे.....
Save the soil all together
कृषी विज्ञान केंद्र घातखेड यांना समर्पित
आपला शेती सेवक
मिलिंद जि गोदे
शेती बलवान तर शेतकरी धनवान
Published on: 05 April 2022, 04:25 IST