Agripedia

जमीनीत असंख्य सुक्ष्म जीवजंतु वास्तव्य करीत असतात .त्यात ,बुरशी ,बँक्टेरिया ,अँक्टीनोमायसिटीस ह्यांचा समावेश होतो .हे जीवजंतू सेंद्रिय पदार्थाचे विघटन दोन किवा तीन अवस्थेत होते .सेंद्रिय पदार्थाचे विघटन होवून पिकांना लागणारे अन्नद्र्व्ये नमुद केलेले जीवाणू उपलब्ध करुन देतात .

Updated on 25 December, 2021 1:25 PM IST

लिग्रीन नावाचा सेंद्रिय पदार्थातील घटक लवकर विघटीत होत नाही.त्यासाठी बराच काळ जावा लागतो ह्युमस नावाचा पदार्थसेद्रिंय पदार्थांच्या विघटनाअंती तयार होतो . ह्युमस हे अत्यंत महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे ह्युमस मुळे पिकांची वाढ होऊन उत्पादन चांगले येते.सेंद्रिय पदार्थ विघटन क्रमसुरुवातीला बुरशी सेंद्रिय पदार्थाचे विघटन करते त्यावरुन तयार होणा-या विघटीत पदार्थावर बँक्टेरियामुळॆ पुढील विघटन होत.राहाते. लवकर विघटीत होणारे पदार्थ जसे ,साखर ,स्टार्च ,प्रथिने ,सेल्युलोज ,हेमीसेल्युलोज इत्यादीवर बँक्टेरिया व इतर सुक्ष्म जीवाणूच्या प्रक्रियेतून त्याचे रुपांतर ह्युमसच्या स्वरुपात करतात या प्रक्रियेत पाणी कार्बनडाय आँक्साईड (वायु) व उर्जा निर्माण होते .लिग्रीनचे विघटन व्हायला वेळ लागतॊ . लिग्रीन विघटनात सुगंधी पदार्थ तयार होतात. त्यचप्रमाणे काही प्रथिने लिग्रीन सोबत विघटीत होऊन ह्युमस तयार होते .

सेंद्रिय पदार्थातील प्रथिने

सुक्ष्म जीवाणूंमुळे प्रथिनांचे रुपांतर अमिनो आम्ल व अमाईड ह्या पदार्थात होते .पुढे हे पदार्थ अमोनियम संयुगा मध्ये रुपांतरीत होतात .अमोनियम कंपाऊड पुढे प्राणवायुच्या संपर्काने नायट्राईट (नायट्रोसोमोनस बँक्टेरियामुळे व पुढे नायट्रेट (नायट्रोबँक्टेर ) या रुपात तयार होतात . नायट्रेटच्या रुपात नत्र झाडांना उपलब्ध होतो.

 

स्फुरद 

हे अन्नद्र्व्य सेंद्रिय पदार्थात फायटिन ,न्युक्लीक ,अँसीड आणि फाँस्फोलीपीड ह्या स्वरुपात असते ह्या पदार्थाचे जीवाणूमुळॆ विघटन होऊन आँरथोफाँस्फेट आयाँन तयार होतात.

आँर्थोफाँस्फेट आयाँनच्या स्वरूपात स्फुरद पीकांना उपलब्ध होते .

सेंद्रिय पदार्थातील गंधक हे अन्नद्रव्य अमिनो आम्ल (मिथीओनिन ,सीस्टीन ,सिस्टाईन ) ह्या स्वरूपात सेंद्रिय पदार्थात असते.

ही अमिनो आम्ल सुक्ष्मजीवाणू विघटीत करुन गंधकाचे रूपातर सल्फॆट्च्या रुपात करतात.सल्फेट रुपात गंधक हे अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होते

इतर अन्नद्रव्ये

पिकांना लागणारे इतर अन्नद्रव्ये जसे कँलशियम ,पालाश ,मँगनीज ,लोह ,जस्त ,इत्यादी सेद्रिय पदार्थाच्याविघटनाने पिकांना उपलब्ध होतील ह्या स्वरुपात जीवाणूंच्या क्रियेमुळे आणल्या जातात.

सुक्ष्मजीवाणूंच्या प्रक्रियेमुळे सेंद्रिय पदार्थातील वेगवेगळ्य़ा सेंद्रिय अन्नद्र्व्यांचे रुपातर शेवटी असेंद्रिय पदार्थात होते.ह्या असेंद्रिय स्वरुपात अन्नद्रव्ये पीकांच्या मुळाद्वारे शोषून घेतली जातात .

ह्या क्रियेला अन्नद्रव्याचे खनिजीकरण असे म्हणतात.

वरील प्रक्रियेच्या अगदी उलट प्रक्रिया जमिनीतील सुक्ष्म जीवाणू घडवून आणतात तेव्हा उपलब्ध अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होत नाहीत .ह्या प्रक्रियेला अन्नद्र्व्याचे इमोबिलायझेशन असे म्हणतत .

जमिनीत ,सुरुवातीला उपलब्ध असलेले असेंद्रिय पदार्थ सुक्ष्म जीवाणू त्यांचे खाद्य म्हणून वापरतात .सुक्ष्म जीवाणूंची वाढ होऊन त्यांची संख्या वाढते .हे जीवाणू सेंद्रिय पदार्थाचे विघटन करतात . .जेव्हा सर्व सेंद्रिय पदार्थाचे विघटन होते .तेव्हा सुक्ष्मजीवजंतु विनाश पावतात . (कारण त्यांना आवश्यक असलेली उर्जा मिळत नाही ) सुक्ष्म जिवाणूंच्या विनाशानंतर त्याचे शरीरातील सेंद्रिय पदार्थाचे विघटन पुढे असेंद्रिय पदार्थात होते .

 

ह्युमस म्हणजे काय ? 

 ह्युमस हा पदार्थ जमिनीत सुक्ष्म जीवाणूच्या सेंद्रिय पदार्थावरील प्रक्रियेत तयार होतो .ती अत्यंत बारीक भुकटी असते तिचा रंग तांबडा -काळा असुन बारीक कणांचा झालेला असतो .काही जिवाणू खतांचे महत्त्व ,त्याची निर्मिती व वापर याविषयी माहिती पुढीलप्रमाणे आहे

रायझोबियम जीवाणू खत :-             

रायझोबियम जीवाणूंना सहयोगी नत्र स्थिर करणारे जीवाणू म्हणतात . हे जिवाणू द्विदल वनस्पतीच्या मुळांवर गाठी तयार करुन त्यामध्ये राहतात . हे जिवाणू वनस्पतीकडून त्यांना लागणारे अन्न मिळवितात व हवेतील नत्र अमोनियाच्या स्वरुपात पिकांना उपलब्ध करुन देतात .हे खत तयार करण्यासाठी कडधान्यांच्या मुळावरील गाठीतून उपयुक्त कार्यक्षम जीवाणू अलग करून विशिष्ट प्रकारच्या माध्यमातून त्यांची मोठ्या प्रमाणावर वाढ करुन निरजानतू केलेल्या लिग्राईट पावडरमध्ये मिसळून होणा-या खताला रायझोबियम जिवाणू खत असे म्हणतात.रायझोबियम जिवाणू खत २५० ग्रँम वजनाच्या पाकिटात उपलब्ध असते हे पाकिट १० ते १५ कि .ग्रँ .बियाण्यासाठी वापरावे .खताची पावडर पुरेशी पाण्यामध्ये मिसळून त्याचे घट्ट द्रावण तयार करावे .तयार केलेले द्रावण बियाण्यावर हळूवारपणॆ सारख्या प्रमाणात लेप बसेल पंरतु बियाण्याचा पूष्ठभागा खराब होणार नाही अशा पध्दतीने लावावे .लेप लावलेले बियाणे सावलीत स्वस्छ कागदावर अथवा किलतानावर सुकवून लगेच पेरणी करावी . 

एकाच प्रकारचे रायझोबियम जिवाणूखत सर्वच शेंगवर्गीय पीकांना उपयोगी पडत नाही.

वेगवेगळ्या गटातील पिकांना विशिष्ट प्रकारच्या रायझॊबियम गटाचे जिवाणूखत वापरतात.

त्यानुसार त्याचे पुढील सात गट पडलेले आहे.

रायझोबियम जिवाणू गटपिके

   १ .रायझोबियम जीवाणू -चवळी ,भूईमूग ,तुर ,मूग ,उडीद ,वाल ,मटकी ,गवार,ताग ,धैंचा,कुळीथ.

२ . रायझॊबियम ल्युपिनी-हरभरा.

३ .रायझोबियम ल्युमिनोसेरम-वाटाणा ,मसुर

४ .रायझोबियम फँसीओलाय-सर्व प्रकारचा (घेवडा गट )

५ . रायझॊबियम जँपोनीकम-मेथी ,बरसीम ,घास

६ . रायझोबियम मेलिलोटी -मेथी,लसुण ,घास

७ . रायझोबियम ट्रायफोली-बरसीम ,घास

 

रायझोबियम जीवाणू खताचे फायदे :-                

१) कडधान्याचे उत्पन्न १५ ते २० टक्क्यांनी वाढते

२) बियाण्यांची उगवण लवकर व चांगली होते.

3) जिवाणू खताच्या वापरामुळे पिकास नत्राचा सतत पुरवठा होत असल्याने रोपांची वाढ जोमदार होते.

४) जिवाणूंनी सोडलेल्या बुरशीरोधक द्रव्यांमुळे पिकांची रोग प्रतिकारक शक्त वाढते.

५) जनिनीत कर्ब ; नत्राचे प्रमाण योग्य राखुन जमिनीचा कस सुधारतो.

 

अँझोटोबँक्टर :-   

सर्व एकदल वर्गीय पीकांना नत्राचा पुरवठा करण्यासाठी अँझोटोबँक्टर जीवाणू खताचा फायदा होतो .

उदा. कापूस ,ऊस ,ज्वारी ,बाजारी ,गहू इ . तूणधान्ये व भाजीपाला इ .

जिवाणूखत बनविण्यासाठी अँझोटोबँक्टर जिवाणूची द्रव माध्यमामध्ये वाढ करण्यात येते व लिग्राईट नावाच्या पावडरमध्ये ही जीवाणूची वाढ म्हणजेच संवर्धक मिसळले जातात .

एक ग्रँम पावडरमध्ये १० कोटी एवढ्या प्रमाणात जिवाणूंच्या पेशी असतात .

हे मिश्नण पाँलिथीन पिशव्यांमध्ये भरून सीलबंद करतात ,या पाकिटातील्जिवाणू खत सहा महिनेपर्यत बिजप्रक्रियेसाठी वापरणे आवश्यक असते.

माती परीक्षणाची गरज :-           

पीकांच्या वाढीसाठी अठरा अन्नद्रव्यांची आवश्यकता असते . त्यापैकी एखादे जरी मातीत कमी किंवा जास्त झाले तर त्याचा परिणाम लगेचच झाडावर दिसून येतो .जसे पाने पिवळी पडणे ,पान गळणॆ ,शिरा सोडून इतर पानांचा सर्व भाग वाळून जाणॆ इत्यादी लक्षणॆ अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे किवा अभावामुळे वनस्पतीमध्ये दिसून येतात .अठरा अन्नद्रव्याशिवाय पीकांची वाढ पूर्ण होत नाही . ती अन्नद्रव्ये मिळताआआआअच खुंटलेली वाढ परत सुधारते . विशेषत: या अन्नघटकांचा वनस्पती वाढीच्या एखाद्या जैविक कार्यात प्रत्यक्ष सहभाग असतो. त्यामुळे माती परिक्षण करणॆ आवश्यक आहे .त्याद्वारे शेतक-यांना समजेल की मातीत कोणत्या अन्नद्रव्याचे प्रमान कमी आहे किंवा जास्त आहे .

माती परीक्षणचा उद्देश :-

१) मुख्य आणि महत्त्वाचा उद्देश म्हण्जे माती परीक्षणावरुन जमीनीत पीक वाढीसाठी कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे व ती कमतरता नाहीशी करण्यासाठी काय करणं आवश्यक आहे हे ठरवता येते.

२) माती परीक्षण व पीक उत्पादन यांच्या संबंधावरून पीकांना जमीनीतून किती प्रमाणात अन्नद्रव्ये मिळतात व कम्पोस्ट ,हिरवळीचे खत ,गाडूळ खत इत्यादी खतापासून किती प्रमाणात अन्नद्र्व्ये द्यावयास पाहिजेत ही माहिती मिळ्ते.

३) मातीच्या नमून्याचे प्रयोगशाळेत सामू ,विद्राव्य क्षार ,सेंद्रिय कर्ब ,उपलब्ध नत्र ,स्फुरद आणि पलाश यासाठी परीक्षण केले जाते .

४) जमीन पीक वाढीसाठी चांगली आहे किंवा नाही ते समजते .

५) विद्राव्य क्षाराच्या प्रमाणावरून पीकांच्या वाढीवर होणा-या परिणामाचा अंदाज होतो .

 

विनोद धोंगडे मो.नं.9923132233 मु. नैनपुर ता.सिंदेवाहि जि. चंद्रपुर(म.रा.)

English Summary: Importance of soil micro-organisms for soil health.
Published on: 25 December 2021, 01:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)