Agripedia

ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या 60 टक्के ठिबक सिंचन हे एकट्या महाराष्ट्रात केले जाते व यातून पिकांना खते पुरवल्यास फर्टिगेशन शेतीसाठी वरदान मानले जाते. ही पद्धत सर्वप्रथम 1960 मध्ये इस्रायलने सुरू केली. त्यानंतर 1970 मध्ये अरस्कॉट यांनी पहिला अहवाल सादर केला.

Updated on 12 October, 2021 2:07 PM IST

 ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या 60 टक्के ठिबक सिंचन हे एकट्या महाराष्ट्रात केले जाते व यातून पिकांना खते पुरवल्यास फर्टिगेशन शेतीसाठी वरदान मानले जाते. ही पद्धत सर्वप्रथम 1960 मध्ये इस्रायलने सुरू केली. त्यानंतर 1970 मध्ये अरस्कॉट यांनी पहिला अहवाल सादर केला.

 ज्यामध्ये हातांनी टाकण्याच्या खत पद्धतीपेक्षा सिंचनातून टाकलेल्या युरियाची पद्धती अधिक लाभदायक व कार्यक्षम आढळून आली होती. विषेशता फुलोऱ्यात, मोहोर येण्याच्या वेळी, फळधारणा च्या वेळी  व त्यानंतर फळांची वाढ होण्यासाठी अन्नद्रव्यांच्या अधिक मात्रा हवी असते. अशावेळी फर्टिगेशन द्वारी दिलेलीखते उपयोगी पडतात. या लेखात आपण फर्टिगेशन ची पद्धत व तिचे फायदे याविषयी माहिती घेऊ.

फर्टिगेशन म्हणजे काय?

 पिकाच्या मुळशी गरजेनुसार ठिबक  सिंचनातून योग्य अन्नद्रव्य, खते व पाणी एकत्रितपणे देण्याच्या पद्धतीला फर्टिगेशन असे म्हणतात.

एरीकेशन द्वारे खते देण्याची पद्धत

 सामान्यतः ठिबक सिंचन व तुषार सिंचन पद्धतीचा उपयोग करून खते वापरली जातात. यात प्रामुख्याने खताची टाकी, वेंचुरी,पंपइत्यादींचा चा उपयोग होतो.

खताची टाकी

 या टाकीमध्ये खताचे मिश्रण असून ते मुख्य पाईपलाईन ला जोडलेले असते. इरिगेशनचे पाणी टाकी मधील खताला पूर्णपणे विरघळून टाकते. त्यानंतर ते मिश्रण ठिबकच्या नळीद्वारे पिकाला पुरवली जातात.

व्हेंचुरी

 विंचुरी हे उपकरण पाइपमध्ये दबाव निर्माण करून त्या ठिकाणी खताच्या मिश्रणाला व इरिगेशनच्या पाण्याला ओढून ते तीव्र गतीने पाईप कडे सोडण्यात येते. हे उपकरण कमी खर्चाची असून कमी जागेसाठी सोयीस्कर आहे.

इरिगेशन फिल्टर

 सबसे पाईप लाईन ला फिल्टर लावल्यास अशुद्ध पाणी शुद्ध होते. त्यामुळे नळ्यांमध्ये घाणसाचत नाही व पाण्याचा प्रवाह सुरळीत चालतो.

फर्टिगेशन चे फायदे

  • द्रवरूपखते सिंचनातून दिली असतात तव्रद्रावण सौम्य होते. त्यामुळे पिकांच्या मुळावर अनिष्ट परिणाम होत नाही.
  • द्रवरूप खतांचा रूपाने मुख्य पोषण द्रव्यांचा व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल पुरवठा केला जातो. पिकांच्या वाढीची अवस्था व त्यांच्या गरजेनुसार द्रवरूप खतांचा वापर केला असता उत्पादनात वाढ होते.
  • सिंचनाद्वारे खते दिल्यास पिकांना पाणी पोषणद्रव्ये यांचा साठा मुळाजवळ होतो. पीक वाढीस घेतो तसेच खते अनियमित आणि कमी प्रमाणात वापरल्यास जमिनीत अन्नद्रव्यांचा साठा कमी असतो आणि नियमित असतो. त्यामुळे अति पावसाचे निचऱ्याद्वारे किंवा जमिनीवरून जास्तीत जास्त पाणी न जाता खताची एकूण 25 ते 30 टक्के बचत होते.
  • कीटकनाशके व तणनाशके द्रवरूप खतात मिसळून दिल्याने मजूर, यंत्रसामग्री व पर्यायाने आर्थिक बचत होते.
  • हलक्या वालुकामय किंवा मुरमाड जमिनीत पिकाचे उत्पादन येण्यासाठी खास व्यवस्थापनाची गरज असते. कारण जमिनीत पाणी व खत या दोन घटकांचा सहभाग महत्त्वाचा असतो. द्रवरूप खतामुळे या समस्येचे निराकरण करता येते.
  • फर्टिगेशन मुळे खत वापर कार्यक्षमता, पाणी वापर कार्यक्षमता व जमिनीचा सुपीकता वाढते. रोगांना बळी पडण्याचे प्रमाण थांबते.

 

फर्टिगेशन करताना घ्यावयाची दक्षता

  • ठिबक तोट्या/ द्रिपर मध्ये माती किंवा पाला  पाचोळा जाणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पिकाला नळ्यांचा त्रास होणार नाही एवढे अंतर ठेवावे
  • ठिबक तोट्या व ड्रीपर मुख्य पाईप लाईन ला योग्यरीतीने जोडावेत.
  • ठिबक/ सूक्ष्म सिंचन संच यामध्ये खत शेवाळे, गंधक, लोह किंवा इतर क्षार साचू देऊ नये. त्यामुळे ठिबक तोट्या बंद पडतात.
  • शेवाळ असल्यास क्‍लोरिन प्रक्रिया व रासायनिक अशुद्धता असल्यास आमलप्रक्रिया करावी.
English Summary: importance of fertigation in fertilizer supply in crop
Published on: 12 October 2021, 02:07 IST