Agripedia

झिंक हे सूक्ष्म अन्नद्रव्य सर्व पिकांसाठी महत्त्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणून ओळखले जाते,

Updated on 24 September, 2022 9:13 PM IST

झिंक हे सूक्ष्म अन्नद्रव्य सर्व पिकांसाठी महत्त्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणून ओळखले जाते, जेकी पिकाच्या वाढीसाठी व उत्पादनासाठी खूप कमी प्रमाणात पण अति महत्वाचे असतेझिंक ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याचे पिकांमध्ये खूप महत्त्वाचे कार्य असते जसे की हरितद्रव्याची निर्मिती, एन्झाइम रिॲक्शन, प्रकाशसंश्लेषण, DNA ट्रान्सस्क्रिपशन, ऑक्सिन ची निर्मिती

झिंक ची कमतरता आपल्या भागातील बऱ्याच जमिनींमध्ये जास्त आहे Zinc deficiency is high in many soils in our region  त्यातल्यात्यात हलक्या ते मध्यम जमिनींमध्ये ती कमतरता जास्त आढळून येते.

हे ही वाचा - गादीवाफा पद्धतीने रोपवाटिका फायद्याची

इतर सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांपैकी झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता मका या पिकावर खूप मोठ्या प्रमाणात दिसते म्हणजे ह्या पिकाला झिंकची गरज इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांपेक्षा जास्त प्रमाणात लागते व त्यामुळे उत्पादनात 10 ते 15 % ने वाढ होते

मका पिकामध्ये शेतकऱ्यांची झिंक वापरण्याची पद्धतबरेच शेतकरी मका पिकामध्ये झिंक सल्फेटचा वापर प्रति एकर 10 किलो या प्रमाणात करत असतात, परंतु शेतकरी या झिंक सल्फेटचा वापर इतर स्फुरदयुक्त रासायनिक खतासोबत मिक्स करून करत असतात व त्यामुळे त्या झिंक सल्फेट मधील झिंकचे मोठ्या प्रमाणात स्फुरदयुक्त खतामधील स्फुरद बरोबर स्थिरीकरण होते व तो झिंक पिकांना खूप कमी प्रमाणात उपलब्ध होते.

दुसरे म्हणजे बरेच शेतकरी कमी किमतीच्या झिंक सल्फेटचा वापर जास्त करतात, परंतु एक लक्षात घेतले पाहिजे की जेवढे झिंक सल्फेट स्वस्त तेवढे त्यामध्ये जडधातूंचे प्रमाण किंवा अशुद्धता जास्त असतात व त्याचा विपरीत परिणाम जमिनीच्या पोतावर होत असतोम्हणून झिंक सल्फेट चा वापर शेतकऱ्यांनी स्फुरदयुक्त खतासोबत टाळावा जसे की 18 : 46, 10:26:26, 12:32:16, 15:15:15, 24:24:0, म्हणून झिंक सल्फेट चा वापर शेतकऱ्यांनी टाळावा व खालील सोप्या पद्धतीने रिलीज झिंक व झिंकाबोर चा वापर मका पिकात करावा

 

vinod dhongade

English Summary: Importance and method of use of zinc as a micronutrient in maize crop
Published on: 24 September 2022, 07:18 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)