Agripedia

सेंद्रिय शेतीमध्ये निसर्गत: उपलब्ध असणा-या वापर करुन पिकांचे सरंक्षण आणि पीक पोषण केले जाते.

Updated on 13 May, 2022 11:20 PM IST

वनस्पतीजन्य संसाधनमध्ये कडूनिंबाच्या झाडापासून मिळणा-या पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर सेंद्रिय शेतीमध्ये होतो.यात ही कडूनिंबाच्या बियांपासून तयार होणारी निंबोळी पेंड मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये वापरली जाते.मे-जून महिन्यात परिपक्व झालेल्या शुध्द निंबोळी गोळा करुन व्यवस्थित वाळविले जातात. 

त्यापासुन कोल्ड प्रेस्ड पध्दतीने निंबोळी पेंड तयार केली जाते.एक्पेलरमधून तेल न काढता तयार होणारी निंबोळी पेंड जास्त फ़ायदेशीर असते. यात निंबोळी मधील अ‍ॅझाडीरेक्टिन, निम्बीन, सलानिन हे घटक १०० ते १००० पिपिएमपर्यंत तसेच सिलिका १५% सह इतर उपयोगी तत्व आलेले असतात. यात ५ ते ७ टक्के तेल असते. त्यामुळे कीटकनाशक गुणधर्मासह इतर अन्नद्रव्ये शेतात मिसळले जातात.

तसेच यात नत्र ३- ५%, स्फ़ुरद १% पालाश २% या प्रमाणात असून पिकांच्या मुळांना हळुहळू उपलब्ध होतो.कडूनिंबातील विविध घटक जमिनीमध्ये गेल्यानंतर मुळांद्वारे शोषले जातात. या पद्धतीमुळे जमीनीतील वावरणा-या किडींचे तसेच पिकांवरील रसशोषक किडींचे देखील नियंत्रण होते.

 जमिनीमध्ये वास्तव्य करणा-या हानिकारक किडी

जसे मुळे कुरतडणा-या अळ्य़ा, हुमणी यांचा बंदोबस्त चांगल्या प्रकारे होतो.तसेच भाजीपाला पिकांवर डाळींब पिकाच्या मुळांवर गाठी करणा-या हानिकारक सुत्रकृमींचादेखील बंदोबस्त चांगल्या प्रकारे होतो.पिकांमध्ये निंबोळी पेंड वापरल्यानंतर ३ ते ६ आठवड्यात त्याचे फ़ायदे दिसू लागतात. निंबोळी पेंडमधील घटक जमिनीत हळूहळू काम करत असल्यामुळे सहा महिन्यांपर्यंत याचा परिणाम दिसून येतो.

English Summary: Importance and benefits of using lemon powder
Published on: 13 May 2022, 11:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)