Agripedia

भारताच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचे खुप मोठे योगदान आहे असे घोषित करण्यात आले आहे. आपला देश कडधान्य, दूध, तांदूळ, गहू, ऊस, मसाले इत्यादींचा सर्वात प्रमुख उत्पादक देश म्हणून जगावर राज्य करतो. भारताच्या जीडीपीमध्ये (एकूण देशांतर्गत उत्पादन) भारतीय कृषी क्षेत्राचे योगदान १८ % इतके आहे.

Updated on 02 June, 2022 5:24 PM IST

भारताच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचे खुप मोठे योगदान आहे असे घोषित करण्यात आले आहे. आपला देश कडधान्य, दूध, तांदूळ, गहू, ऊस, मसाले इत्यादींचा सर्वात प्रमुख उत्पादक देश म्हणून जगावर राज्य करतो. भारताच्या जीडीपीमध्ये (एकूण देशांतर्गत उत्पादन) भारतीय कृषी क्षेत्राचे योगदान १८ % इतके आहे. हे योगदान देशाच्या सुमारे ५८ % लोकसंख्येसाठी, प्रामुख्याने ग्रामीण भागांसाठी उपजीविकेचे मुख्य साधन किंवा स्त्रोत मानल्या जाते.

भारतीय कृषी क्षेत्र, वनीकरण आणि मासेमारीसह २०१९ पर्यंत सुमारे रु. १८.५५ लाख कोटी एकूण जोडलेले मूल्य प्राप्त केले आहे. जीडीपीमध्ये भारतीय शेतीचे योगदान कितीही असले तरी आपल्या देशाने अद्याप या क्षेत्रातील उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवण्याची गरज आहे, जेणेकरून उच्च क्षमतेपर्यंत पोहचता येईल. पिकांचे निरीक्षण, पाणी सिंचन, कीटकनाशके वापरणे आणि इतर अनेक आवश्यक शेतीविषयक उपक्रमासाठी सध्या अयोग्य पद्धती अवलंबल्या जात आहेत. या अडथळ्यांनी तंत्रज्ञानाच्या जगात वाढ आणि विकासाच्या अनेक संधी दिल्या आहेत.

कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा प्रभाव त्याच्या प्रारंभापासून नेहमीच सकारात्मक राहिला आहे. देशभरातील सरकारे आणि व्यवसायांनी अन्न सुरक्षेचे महत्त्व आणि पर्यावरणाचा ऱ्हास, प्रदूषण आणि पाणी टंचाईचे परिणाम ओळखल्यामुळे काही अडथळ्यांवर मात करण्याची निकड निर्माण झाली आहे.

अंबानी, बच्चन, तेंडुलकर आणि अक्षयकुमार हे पुणे जिल्ह्यातील 'या' डेअरीचे दूध पितात..!

कृषी क्षेत्रामध्ये ड्रोन वापरण्याची गरज का आहे ?

ड्रोन तंत्रज्ञानाला त्याच्या विविधतेमुळे उद्योगात मान्यता मिळाली आहे आणि आता कृषी क्षेत्रासाठी ड्रोन चा विचार केला जात आहे. सुरुवातीला लष्करामध्ये त्याचा वापर केला गेला. आता इतर क्षेत्रांमध्ये पण मानवरहित हवाई वाहनांचा उपयोग केला जात आहे. ड्रोन शेतकऱ्यांना इतर विविध अडथळ्यांचे निराकरण करण्यासाठी आणि अचूक शेतीद्वारे भरपूर फायदे मिळवण्यासाठी प्रोत्साहित करतात.

कृषी ड्रोनची (मानवरहित हवाई वाहन) बाजारपेठ तब्बल १.३ अब्जपर्यंत पोहोचल्याने पारंपरिक शेती पद्धतींद्वारे मानवांकडून होणाऱ्या चुका आणि अकार्यक्षमतेची पोकळी भरून काढतात. ड्रोन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा उद्देश कोणताही अंदाज किंवा अस्पष्टता वगळणे आणि त्याऐवजी अचूक आणि विश्वासार्ह माहितीवर लक्ष केंद्रित करणे हा आहे.

आता सगळ्या शेतकऱ्यांचे टेन्शन मिटणार!! आता बांध कोरला तर होणार 5 वर्षांची शिक्षा, ट्रॅक्टरही होणार जप्त

हवामान, मातीची स्थिती आणि तापमान यासारखे बाह्य घटक शेतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. कृषी ड्रोन शेतकऱ्याला विशिष्ट वातावरणाशी जुळवून घेण्यास आणि त्यानुसार विचारपूर्वक निवड करण्यास सक्षम करते.

प्राप्त आकडेवारी पीक आरोग्य, पीक उपचार, क्रॉप स्काउटिंग, सिंचन आणि शेतातील मातीचे विश्लेषण त्याचप्रमाणे पीक नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी नियमन करण्यास मदत करते. ड्रोन सर्वेक्षण वेळ, खर्च कमी करण्यास आणि पीक उत्पादन वाढविण्यात मदत करते. तज्ञांच्या मते, २०५० पर्यंत जगाची लोकसंख्या ही ९ अब्ज होईल, असा एक अंदाज आहे.

कृषी वापरामध्येही एकाच वेळी सुमारे ७० % वाढ होईल असे म्हटले जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि रिमोट सेन्सिंग इत्यादी वैशिष्ट्यांसह सुसज्ज ड्रोन तंत्रज्ञान, त्याच्या फायद्यांमुळे मागणी वाढत आहे. केंद्र सरकारने मानवरहित हवाई वाहने, मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे महत्त्व त्यांच्या 'डिजिटल स्काय प्लॅटफॉर्म' ऑनलाइनद्वारे मान्य केले आहे. भारतातील ड्रोन स्टार्टअप्सनी या संधीचा उपयोग उत्तम तांत्रिक क्षमता पूर्ण करण्यासाठी केला आहे.

गवार डिंकाचे उत्पादन, प्रक्रिया, अन्न पदार्थामधील वापर आणि आरोग्यवर्धक फायदे..!

ड्रोन तंत्रज्ञानाचे फायदे:

नवनवीन तंत्रज्ञान सादर करत असताना, त्यांचा व्यावसायिक उपयोग दिवसेंदिवस वाढत जात आहे. सरकार ड्रोन वापरावरील निर्बंध कमी करत आहे आणि नवीन कल्पना आणण्यासाठी स्टार्टअप्सना समर्थन देत आहे. ड्रोन सर्वेक्षण अधिक सामान्य झाल्यामुळे ते अधिक किफायतेशीर होत आहे. शेतीमध्ये त्यांचे भरपूर फायदे आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत.

१. उत्पादन वृद्धी - शेतकरी सर्वसमावेशक सिंचन नियोजन, पीक आरोग्याचे पुरेसे निरीक्षण, मातीच्या आरोग्याविषयी वाढलेले ज्ञान आणि पर्यावरणीय बदलांशी जुळवून घेऊन उत्पादन क्षमता सुधारू शकतो.

२. प्रभावी आणि अनुकूल तंत्रज्ञान - ड्रोनच्या वापरामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांबद्दल नियमित अपडेट मिळतात आणि मजबूत शेती तंत्र विकसित करण्यात मदत होते. ते हवामानाच्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतात आणि कोणत्याही अपव्यय न करता संसाधनांचे वाटप करू शकतात.

३. शेतकर्‍यांची अधिक सुरक्षितता - शेतकऱ्यांना पोहोचण्यास आव्हानात्मक भूभाग, संक्रमित क्षेत्रे, उंच पिके आणि पॉवर लाईनमध्ये कीटकनाशक फवारण्यासाठी ड्रोनचा वापर करणे अधिक सुरक्षित आणि अधिक सोयीचे आहे. ते शेतकऱ्यांना पिकांवर फवारणी करण्यास मदत करते, ज्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होते.

४. संसाधनांचा कमी अपव्यय - कृषी ड्रोन्स मुळे खते, पाणी, बियाणे आणि कीटकनाशके यासारख्या सर्व संसाधनांचा कमी वापर आणि करण्यास मदत होते.

५. अचूकता दर - ड्रोन सर्वेक्षण शेतकऱ्यांना जमिनीच्या अचूक आकाराची गणना करण्यास, विविध पिकांचे विभाजन करण्यास आणि माती सर्वेक्षणमध्ये मदत करते.

६. पिक विम्याच्या दाव्यांसाठी उपयुक्त - कोणतेही नुकसान झाल्यास शेतकरी ड्रोनद्वारे कॅप्चर केलेल्या आकडेवारी चा वापर करून पिक विम्याचा दावा करण्यासाठी ड्रोन नी घेतलेल्या आकडेवारी चा वापर करू शकतात.

ड्रोन तंत्रज्ञान त्वरीत पारंपारिक कृषी पद्धती पुनर्संचयित करते आणि त्यानंतर ते खालीलप्रमाणे पूर्ण करत आहे :

१. सिंचन निरीक्षण:

हायपरस्पेक्ट्रल, थर्मल किंवा मल्टीस्पेक्ट्रल सेन्सर्ससह ड्रोन, खूप कोरडे असलेले किंवा शेतकऱ्याला सुधारण्याची गरज असलेले क्षेत्र ओळखतात. ड्रोन सर्वेक्षण पाण्याची कार्यक्षमता सुधारण्यास आणि सिंचनातील संभाव्य गळती उघड करण्यास मदत करते.

२. पीक आरोग्य देखरेख आणि पाळत ठेवणे :

वनस्पतींच्या आरोग्याची माहिती घेणे आणि सुरुवातीच्या टप्प्यात जिवाणू/बुरशीजन्य रोग शोधणे हे खूप महत्त्वाचे असते. कृषी ड्रोन हे कोणत्या वनस्पती वेगवेगळ्या प्रमाणात हिरवा प्रकाश आणि निअर-इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी (NIRS) प्रकाश प्रतिबिंबित करतात ते पाहू शकतात. हा आकडेवारी पिकाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा असतॊ व तो पीक आरोग्याचा मागोवा घेण्यासाठी मल्टीस्पेक्ट्रल प्रतिमा तयार करण्यात मदत करतो.

जलद निरीक्षण आणि कोणत्याही दोषांचा शोध घेतल्यास पिके वाचविण्यास मदत होऊ शकते. पिकाची नुकसान झाल्यास, शेतकरी विमा दाव्यासाठी नुकसानीचे दस्तऐवजीकरण देखील करू शकतो.

३. पीक नुकसान मूल्यांकन :

मल्टीस्पेक्ट्रल सेन्सर्स आणि आरजीबी सेन्सर्ससह बसवलेले कृषी ड्रोन तण, संक्रमण आणि कीटकांनी ग्रस्त क्षेत्रे देखील शोधून काढतात. या माहितीनुसार, या प्रादुर्भावांशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या रसायनांची नेमकी मात्रा ज्ञात होते यामुळे शेतकऱ्याकडून होणारा खर्च कमी होण्यास मदत होते.

४. माती विश्लेषण :

ड्रोन सर्वेक्षणामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या स्थितीची माहिती मिळू शकते. मल्टीस्पेक्ट्रल सेन्सर बियाणे लागवड पद्धती, शेतातील मातीचे विश्लेषण, सिंचन आणि नायट्रोजन-स्तरीय व्यवस्थापनासाठी उपयुक्त आकडेवारी मिळण्यास मदत होते. त्याचप्रमाणे फोटोग्रामेट्री किंवा ३ डी मॅपिंग करतांना शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या स्थितीचे विश्लेषण करण्यास मदत होते.

५. पिक लागवड:

भारतातील ड्रोन स्टार्टअप्सनी ड्रोन पीक लागवड प्रणालीचा शोध लावला आहे. पिकांची लागवड करण्यासाठी ड्रोन चा वापर केल्या जात आहे. या तंत्रज्ञानामुळे श्रम तर वाचतीलच शिवाय इंधनाची बचत होण्यासही मदत होणार आहे. वनक्षेत्र वाढवण्यासाठी किंवा ज्या ठिकाणी पेरणीयंत्र व मजूर पोहचणे शक्य नाही त्या ठिकाणी ड्रोन द्वारे बियाणे जमिनीवर पसरवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा खूप उपयोग होऊ शकतो.

लवकरच, हे अपेक्षित आहे की ट्रॅक्टरऐवजी बजेट-अनुकूल ड्रोन वापरले जातील, कारण ते हानिकारक वायू उत्सर्जित करतात आणि प्रक्रियेत पर्यावरण प्रदूषित करतात. हे तंत्रज्ञान केवळ खर्च जवळजवळ ८५ % खर्च कमी करत नाही तर सातत्य आणि कार्यक्षमता देखील वाढवते

६. कृषी फवारणी :

ड्रोन पीक फवारणीद्वारे हानिकारक रसायनांशी मानवी संपर्क कमी होतो. अॅग्री-ड्रोन्स हे कमी वेळात जास्त फवारणी करण्या सक्षम आहेत. आरजीबी सेन्सर आणि मल्टीस्पेक्ट्रल सेन्सर असलेले ड्रोन समस्याप्रधान क्षेत्रे अचूकपणे ओळखू शकतात आणि त्यावर उपचार करू शकतात. इतर पद्धतींच्या तुलनेत ड्रोनद्वारे हवाई फवारणी पाचपट जलद असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

निष्कर्ष : ड्रोन च्या साहाय्याने आपण शेतीचे पिक व्यवस्थापन व निरीक्षण करू शकतो. विशेषत: लहान क्षेत्रासाठी हे अत्यंत उपयोगी आहे. ड्रोन च्या वापरामुळे आपल्या इंधनामध्ये व वेळेमध्ये खूप बचत होते. तसेच आपण कमी वेळेमध्ये जास्त फवारणी करू शकतो. कीटकनाशकांच्या फवारणीसाठी ड्रोन चा वापर केल्याने शेतकऱ्यांचा रसायनांशी संपर्क कमी होऊ शकतो.

ड्रोन च्या वापरामुळे श्रम खर्च सुध्दा कमी होत आहे. आपल्याला ड्रोन च्या साहाय्याने पीक नुकसान मूल्यांकन, माती विश्लेषण, सिंचन निरीक्षण, पिक लागवड, आणि कृषी फवारणी इत्यादी कामे करणे शक्य झाले आहे.

लेखक : अमोल घाडगे (आचार्य पदवी विद्यार्थी)
(कृषी, यंत्रे व शक्ती विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

प्रशांत शहारे(प्राध्यापक आणि प्रमुख)
(कृषी, यंत्रे व शक्ती विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

जतीन पटेल (तांत्रिक संचालक)
(अस्पि, कृषी संशोधन आणि विकास प्रतिष्ठान, तानसा फार्म, तालुका- वाडा, जिल्हा-पालघर)

English Summary: Importance and benefits of drone technology in Indian agriculture
Published on: 02 June 2022, 05:24 IST