मसालेदार पिकात लवंग या पिकाला महत्वाचे स्थान आहे जे की भारतात प्रामुख्याने हे पीक केरळ, कर्नाटक व तमिळनाडू राज्यात घेतले जाते. अन्न पदार्थाचा स्वाद घ्यायचा असेल तर लवंग हा त्यातील खूप महत्त्वाचा घटक आहे. दात दुखी तसेच पोटातील विकारांवर लवंग हे फायदेशीर आहे. जवळपास १७ टक्के तेल लवंग पासून मिळते.
केरळ प्रमाणेच महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागात सुद्धा लवंग लागवड चांगल्या प्रमाणात सुरू आहे. कोकण कृषी विद्यापीठ मध्ये संशोधन करण्यासाठी लवंग ची लागवड करण्यात आली आहे त्यामधून समाधानकारक उत्पन्न मिळते जे की अत्ता कोकण भागातील शेतकऱ्यांना लवकरच लवंग लागवड साठी प्रोस्थाहन केले जाणार आहे. आपण जी मसाल्यात लवंग वापरतो ती झाडावरची कळी आणि ती कळी पूर्ण फुलले की त्याची लवंग तयार होते.लवंग हे उष्णकटिबंधीय झाड असून ते दमट हवामानात वाढते. समुद्र-सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हे झाड येते जे की २० ते ३० अंश डिग्री सेंटीग्रेड तापमान आणि १५०० ते २५०० मिमी पाऊस लागतो. लवंग या पिकाला चांगले उगवण्यासाठी सावलीची गरज लागते. भारतामध्ये ज्या ठिकाणी लवंगाची लागवड केली जाते त्या ठिकाणी प्रत्येक महिन्यात थोड्या प्रमाणात तर पाऊस असतोच आणि तापमान सुद्धा कमी असते. त्यामुळे येथे लवंगाची लागवड उघड्यावर केली जाते तसेच पाऊस पडत असल्याने पाण्याची गरज भासत नाही.
हेही वाचा:असे करा रब्बी हंगामात हुमनी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन
लवंगेच्या झाडाला पाणीपुरवठा करताना:
पाणी पुरवठा करताना जमीन सतत ओलसर ओहीजे मात्र दलदल होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे कारण दलदल झाल्याने मररोग होण्याची क्षमता जास्त असते, त्यामुळे थोडे थोडे पाणी द्यावे.
किती मिळते उत्पादन…?
कळीचा अंकुर दिसायला लागला की तिथून पुढे पाच ते सहा महिन्यात कळी काढण्यास तयार होते मात्र त्या गुछातील सर्वच कळ्या सोबत काढण्यासाठी तयार होत नाहीत. त्या कळ्यांचा घुमट वाढला की त्यास फिकट नारंगी रंग येतो त्यावेळी कळ्यांची काढणी करावी आणि त्या उन्हामध्ये वाळवाव्या. चार ते पाच दिवसात कळ्या चांगल्या वाळतात. जर लवंगचे झाड १५ ते २० वर्ष जुने असेल तर त्यापासून २ ते ३ किलो वाळलेल्या लवंगा भेटतात.
रोगाचा प्रादुर्भाव कसा रोखाल?
लवंग ची रोपे पूर्ण वाढली की त्याच्या पानांवर रोगाचा प्रादुर्भाव होतो जे की त्या पानांवर काळसर टिपके आणि चट्टे पडतात. काही दिवसाने ते पान पूर्णपणे गळून पडते. पाणी पुरवठा कमी पडला की लवंग च्या रोपण लगेच रोग पडतो जे की या रोगाचा प्रादुर्भाव उन्हाळा संपला आणि पावसाळा चालू होण्याच्या आधी दिसतो.
बोडोमिश्रणाच्या फवारण्या:
लवंग झाडावर रोगाचा प्रादुर्भाव पडू नये म्हणून वर्षातून १ टक्का बोडो मिश्रणाच्या फवारण्या कराव्यात. ज्या फांद्यावर आणि पानांवर रोग पडला आहे त्या लगेच कापून टाकाव्यात.
Published on: 29 August 2021, 06:09 IST