कोणत्याही पिकाचे चांगल्या प्रकारे उत्पादन घ्यायचे असेल तर त्यास लागते पोषक वातावरण आणि योग्य ती जमीन. सुपारी पान मळ्यांची लागवड करण्यासाठी उंच जमीन तसेच पाणथळ जमिनीची आवश्यकता भासते. केरळ राज्यात सुद्धा सुपारी आणि नारळ पिकाच्या मध्ये आंतरपीक मध्ये सुपारी ची पाने लावली जातात त्यासाठी माती सुपीक लागते. ज्या जमिनीत पाणी साचते किंवा ज्या ठिकाणी क्षारयुक्त जमीन असते त्या ठिकाणी या पिकाची जोमाने वाढ होत नाही. पिकाची वाढ होण्यासाठी पोषक वातावरण तसेच योग्य प्रमाणात पाणी लागते. भुसभुशीत जमिनीमध्ये सुपारी च्या पानांची चांगल्या प्रकारे वाढ होते. या पिकाची वाढ होण्यासाठी सुमारे किमान १० अंश तर कमाल ४० अंश तापमान लागते. उष्ण तसेच कोरडी हवा या पिकाच्या वाढीसाठी धोकादायक आहे.
१०० प्रकारची पाने :-
जगात सुमारे १०० प्रकारची पाणी आहेत जे की एकट्या भारतात ४० तर पश्चिम बंगाल मध्ये ३० पाने आहेत. पानांचे प्रामुख्याने पाच प्रकार आहेत त्यामध्ये देसावरी, बांगला, कापूरी, मिथा आणि सांची ही पाच पाने आहेत. भारतात सांची आणि कापुरी हे द्विपकल्पीय पीक घेतले जाते तर उत्तर भारतात देसवारी आणि बांगला पीक घेतले जाते. पश्चिम बंगाल मध्ये मिठाई करण्याच्या दृष्टीने पाने पिकवली जातात.
असे करा व्यवस्थापन :-
कृषी शास्त्रज्ञ डॉ. एस. के. सिंग यांचे असे मत आहे की या पिकाची चांगली वाढ होण्यासाठी वेल पसरावे तसेच फळधारणा व्हावी म्हणून २ मीटर रुंद खाटा बनवाव्यात. पानांची बीजे लांब रांगेत लावावीत. बेड च्या काठावर झुपडे लावावी जी सुपारी च्या वेलासाठी आधार बनतात. जेव्हा ४ मीटर पेक्षा जास्त उंची होईल त्यावेळी याना वरच्या बाजूस ठेवले जाते.
असे करा पाण्याचे नियोजन :-
पानांची लागवड केली की आठवड्यात १ वेळ पाणी द्यावे त्यानंतर एक महिन्यात त्याची उगवण होऊन वाढ सुद्धा होते. १५ - २० सेमी वाढ झाली की त्यावेळी छताचा आधार देणे गरजेचे आहे. छताचा योग्य प्रकारे आधार दिला की याची योग्य प्रकारे वाढ होते. १५-२० दिवसांनी वाढीप्रमाणे त्यांना तपासणे गरजेचे आहे.
Published on: 20 January 2022, 06:25 IST