Agripedia

आपल्याला भविष्यात शेती करायची असेल तर दर वर्षी आपल्या शेतात प्रती एकर कमीतकमी ५ झाडे लावा.

Updated on 31 May, 2022 10:14 AM IST

अन्यथा हवामान बदलामुळे शेती बरबाद होईल.हि विनंती नाही निसर्गाने दिलेली चेतावणी आहे.तुम्हाला माहिती असेल नसेल एक झाड 50 वर्षांत 35 लाख रूपये किंमतीचे वायु प्रदूषण टाळते.बरोबर आहे ना.एक झाड 15 लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन उत्पादन करते.एक झाड 40 लाख रूपये किंमतीचे पाण्याचे रीसाइक्लिंग करते.एक झाड 1 वर्षांत 3 किलो कार्बनडाय ऑक्साईडचा नाश करते.एक परिपूर्ण झाड 1000 हजार माणसांचे जेवण शिजवण्यासाठी उपयोगी येते.एक झाड आसपासच्या परिसरातील तापमान 2 अंशाने कमी करते.एक झाड 12 विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते.

एका झाडापासून कुटूंबासाठी लाकडी सामान तयार होते.एका झाडावर 100 पक्षी घरटे बांधून राहू शकतात व त्याच्यावर त्यांच्या 25 पिढ्या जन्माला येतात आणि मधमाश्यांचे पोळे झाडावर असल्यास तीच संख्या लाखावर जाते.एक झाड 18 लाख रूपये किंमतीचे जमिनीची धूप थांबवते.एक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळगाड्या पासुन ते आराम खुर्ची पर्यंत तसेच वार्धक्यातील हातातील काठी पासुन स्मशानातील लाकडा पर्यंत साथ देते.एक झाड आपल्या पालापाचोळयाची भर टाकून जमिनीची कस वाढवते.एक झाड फळ, फुल, बिया आपल्या साठी देते.एक झाड 50 वर्षांत काय करत आणि आपण माणसं काय करतो याचा लेखाजोखा आम्ही मुद्दामच मांडत आहोत जेणे करून प्रत्येक माणुस ह्याचा विचार करेल.

आता नाही तर कधीच नाही.तुमची आमची मुले पाठीला ऑक्सिजनचा सिलेंडर लाऊन फिरताना कशी दिसतील विचार करा.जगातील सर्व पैसा जरी एका केला तरी आपण 6 महिने पुरेल येवढा ऑक्सिजन आपण तयार करू शकत नाही.जगातील सर्व पैसा जरी एका केला तरी आपण 6 महिने पुरेल येवढा ऑक्सिजन आपण तयार करू शकत नाही.मग मित्रांनो तुम्ही आम्हाला एक सांगा कि असं कुठलं स्त्रोत्र तुमच्या कडे आहे ज्या माध्यमातून आपण आपल्याला लागणारा ऑक्सिजन तयार करू शकतो.तासभर ऑक्सिजन विकत देणा-या डॉक्टरांना आपण देव मानतो पण आयुष्यभर फुकट ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची मात्र कत्तल करतो.

म्हणून तर मित्रांनो संत परंपरा आपल्याला सांगुन गेली.।। वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे ।।मित्रांनो आज पासुन आपण शपथ घेऊया कि प्रत्येकाने 1 किंवा 2 झाड लावायलाच पाहीजेत.एक किंवा दोन झाडे लावा आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहून यशस्वी व्हा!एक झाड आसपासच्या परिसरातील तापमान 2 अंशाने कमी करते.एक झाड 12 विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते.एका झाडापासून कुटूंबासाठी लाकडी सामान तयार होते.एका झाडावर 100 पक्षी घरटे बांधून राहू शकतात व त्याच्यावर त्यांच्या 25 पिढ्या जन्माला येतात आणि मधमाश्यांचे पोळे झाडावर असल्यास तीच संख्या लाखावर जाते.एक झाड 18 लाख रूपये किंमतीचे जमिनीची धूप थांबवते.एक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळगाड्या पासुन ते आराम खुर्ची पर्यंत तसेच वार्धक्यातील हातातील काठी पासुन स्मशानातील लाकडा पर्यंत साथ देते.

 

विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल

मिलिंद जि गोदे

9423361185

Mission agriculture soil information

Save the soil all together

स्रोत -विकीमाफीया

English Summary: If you want to bring prosperity to agriculture, plant trees on the dam, and see this amazing change
Published on: 31 May 2022, 10:14 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)