Agripedia

थंडीच्या हंगामातील (Winter Season) सर्वात महत्वाचे पिक म्हणजे गव्हाचे पिक (Wheat Crop). थंडीला आता भारतात सुरवात झाली आहे आणि अनेक शेतकऱ्यांनी (Farmers) रब्बी हंगामाच्या (Rabbi Season) दिशेने आपले पाऊल देखील टाकले आहे. गहु हे रब्बी हंगामाचे महत्वाचे पिक आहे. गहु ची लागवड (Wheat Cultivation) हि नोव्हेंबर महिन्यात भारतात केली जाते.

Updated on 14 November, 2021 7:45 PM IST

थंडीच्या हंगामातील (Winter Season) सर्वात महत्वाचे पिक म्हणजे गव्हाचे पिक (Wheat Crop). थंडीला आता भारतात सुरवात झाली आहे आणि अनेक शेतकऱ्यांनी (Farmers) रब्बी हंगामाच्या (Rabbi Season) दिशेने आपले पाऊल देखील टाकले आहे. गहु हे रब्बी हंगामाचे महत्वाचे पिक आहे. गहु ची लागवड (Wheat Cultivation) हि नोव्हेंबर महिन्यात भारतात केली जाते.

भारतात अनेक शेतकरी नोव्हेंबर महिन्यात (November) गव्हाच्या पेरणीला पसंती देतात. गहु हे एक महत्वाचे व्यापारी पिक आहे याची लागवड करून अनेक शेतकरी बांधव चांगला नफा कमवतात अशा या महत्वाच्या पिकाची नेमकी पेरणी (Sowing) कधी करावी, कोणत्या प्रदेशात कधी लागवड करावी याविषयी आज आपण जाणुन घेणार आहोत. चला तर मग शेतकरी मित्रांनो जाणुन घेऊया गहु लागवड कधी करायची याविषयी सविस्तर.

 कधी करावी गव्हाची पेरणी (When to sow wheat Crop)

शेतकरी मित्रांनो कृषी विशेषज्ञ (Agricultural Specialist) बागायती गव्हाची लागवड हि उत्तर पश्चिम भारतात (In North West India) नोव्हेंबरच्या 15 तारखेपर्यंत उरकवून टाकण्याचा सल्ला देतात. जर आपणही गव्हाची लागवड करण्याचा विचार करत असाल तर या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत पेरणी (Sowing) करून टाका, निश्चितच आपल्याला गव्हाच्या पिकातून चांगले उत्पादन प्राप्त होईल. 

तसेच उत्तर पूर्वी (North East) भागात आणि मध्य भारतात (Middle India) गव्हाची लागवड हि मिड नोव्हेंबर (Mid November) मध्ये करण्याचा सल्ला दिला जातो. पसात (late) बागायती गहु लागवडीसाठी डिसेंबरचा पहिला आठवडा (The first week of December) योग्य मानला जातो. बागायती गहु लागवडीसाठी 40 किलो एकर बियाणे हे लागते तसेच पसात गहु लागवडीसाठी 50 किलो एकरी बियाणे हे लागते. गहु पेरणी करताना बियाणे हे चांगल्या क्वालिटीचे निवडावे तसेच बियान्यात घाण, कचरा हा नसावा.

बियाणे स्वच्छ असावे त्यामुळे पिकात जास्त तन वाढणार नाही व उत्पादन हे चांगले मिळेल. शेतकरी मित्रांनो गहु पेरणी करण्यापूर्वी गव्हाच्या बियाण्यावर प्रक्रिया करणे महत्वाचे ठरते. बिजप्रक्रिया करण्यासाठी आपण बाविस्टीन अथवा थिरम चा वापर करू शकता. बाविस्टीन अथवा थिरम 2.5 ग्राम एका किलो बियाण्यासाठी वापरण्याचा सल्ला दिला जातो. बिजप्रक्रिया केल्याने गव्हापासून मिळणारे उत्पादन हे चांगले मिळते शिवाय गव्हाची क्वालिटी हि उत्तम राहते.

English Summary: if you want more production of wheat you cultivate before this date
Published on: 14 November 2021, 07:45 IST