आज आपण त्या जिवन देण्यार्या मातीमायच्या उपकाराची जाणीव नाही आहे आपण दररोज तिच्यावर चालत असतो.तिच आरोग्य आणि तिची ओळख नष्ट करत आहे. परंतु आपल्याला तिची तेवढीच गरज असते जेवढी प्रत्येक क्षणाला श्वासाची.आता वेळ आली आहे ती म्हणजे आपण तिच्याविषयी बोलण्याची व आता ती वेळ म्हणजे की आपण तिचं रक्षण केलं पाहिजे कारण तिचं अस्तित्व आता धोक्यात आहे आणि आपलं अस्तित्व तिच्यावर अवलंबून आहे. ती आपलं पोषन आणि म्हणून तिचं रक्षण ही आपली नैतिक जबाबदारी आहे. ती आपल्या माती चीओळख आहे.तिएक क्षणभर कल्पना करा की पृथ्वीवर सुपीक मातीच उरली नाही. तर मानवाच अस्तित्व राहील का?मग आपल्या रोजच्या ताटामधे जेवण नसेल हे सर्व सुपीक माती शिवाय असणं शक्यच नाही.उन्ह, वारा, पाऊस, प्राणी, वनस्पती यांद्वारे खडकाचे हळूहळू विघटन होऊन माती तयार होत असते. या प्रकारे १० सेंटीमीटर सुपीक माती तयार होण्यासाठी जवळपास २००० वर्षे एवढा दीर्घ कालावधी लागतो. विचार करा, फक्त दहा सेंटीमीटरसाठी दोन हजार वर्ष लागतात! त्या मातीची आपण काळजी न घेतल्याने अगदी काही वर्षात तिला नष्ट करतो ते ही नेहमीसाठी. वने आणि वनस्पती या मातीचं सतत रक्षण करत असतात.
पण प्रत्येकवर्षी जगात १३ दशलक्ष हेक्टर एवढ्या प्रचंड क्षेत्रफळाची वने संपवली जातात. जमीन व्यवस्थापनाच्या अभावी प्रचंड प्रमाणावर शेतजमीनीचा ह्रास होतो. बड्या व्यावसायिकांच्या शेतातल्या शेतातल्या हस्तक्षेपामुळे एकपीक पद्धतीचा अतिअवलंब, उताऱ्यावरील जमिनीचा शेतीसाठी वापरामुळे मातीचा ह्रास होण्यास जास्तच भर पडत आहे. एका अहवालानुसार, २०११ या फक्त एका वर्षात २४ अब्ज टन सुपीक माती नष्ट झाली. म्हणजे तुमच्या आमच्या जगातल्या प्रत्येक माणसाच्या वाट्याची ३.४ टन माती नष्ट झाली, मग ते तान्हं बाळ असेल तरी! जमिनीच्या धूप होण्यामुळे प्रत्येक मानवाला दरवर्षी जवळपास ५००० रुपये एवढी किंमत मोजावी लागते. म्हणजे सर्व मानवतेला मिळून दरवर्षी सुमारे ३२,००० अब्ज रुपये हे गणित आहे मातीचे!आपण सर्वांनी आपल्या स्वतःमध्ये डोकावून पहा, आपण जमिनीपासून आपल्या मातीपासून अलिप्त होत आहोत. आजघडीला जगातली अर्ध्याच्या वर लोकसंख्या शहरात राहते. आणि २०५० च्या सालापर्यंत जगातली ७० टक्के लोकसंख्या शहरांत असेल. जागतिक बँक आणि बडे उद्योजक यांनी असं कारस्थानच रचवून दिलं आहे. आपल्याकडे तशी व्यवस्थित अमलबजावणी पण चालू आहे मग ते कोण्याही पक्षाचं सरकार असो. आपल्याकडील 'जमीन अधिग्रहण कायदा' हा त्यातलाच भाग आहे.
जगात मुंबई च्या क्षेत्रफळाच्या आकाराएवढी जमीन शहरांमध्ये बदलत आहे. शहरीकरणामुळे ही जमीन कायमस्वरूपी निरुपयोगी बनते. त्यातून काहीही पिकू शकत नाही.पृथ्वीवरील सुपीक जमीन मर्यादित आहे आणि म्हणून अमूल्य आहे. हे उद्योजक आणि शासन व्यवस्थेने अभ्यासलेलं आहे, म्हणून जमिनीच्या अधिग्रहणासाठी घोडदौड सुरू आहे मग ती कोणत्याही कारणासाठी का होईना, कोणत्याही थराला जाऊन का होईना. या हस्तगत होणाऱ्या लाखो एकर जमीनी छोट्या आणि अति गरीब शेतकऱ्यांच्या आहेत. त्यांच्याकडे पर्याय नसतो. यामुळे त्यांचं जीवन, त्यांची कुटुंब विखुरली जात आहेत. भविष्यात ज्याच्या हातात सुपीक माती असेल त्याच्या हातात जीवनाचा हक्क असेल!आपल्याला सुपीक आणि निरोगी मातीची आज जास्त गरज आहे. जागतिक संस्थे'च्या अहवालानुसार, २०५० पर्यंत प्रत्येक जमीनधारकाकडे आत्ताच्या तुलनेत अर्धीच जिरायत जमीन असेल. आजमितीला जगातील एक अब्जच्या वर लोक रोज रात्री उपाशीपोटी झोपतात आणि जर छोट्या शेतकऱ्यांच्या जमिनी हडपणे बंद झाले नाही तर ही संख्या दिवसेंदिवस वाढत जाईल.ही भूकमारी थांबवण्यासाठी आपल्याला जमिनीच्या प्रत्येक उरलेल्या तुकड्यावर रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढावं लागेल किंवा दुसरी पृथ्वी शोधून काढावी लागेल. पण हा दुसरा पर्याय अधिक खडतर आणि खर्चिक आहे!आज आत्ता आपलं जमिनीच्या किंवा मातीच्या विषयाकडे लक्ष वेधलं जात नाही.
आपण सुपरमार्केट मध्ये भरगच्च भरलेले रेक पाहतो आणि आपल्याला वाटत हे नेहमीकरता असच राहील. पण हे उधारीवर जगण्यासारखं आहे- मातीच्या उधारपत्रावर. बँकेत आपण कधीही रक्कम जमा न करता आहेत ते पैसे काढत राहील तर ते आज न उद्या संपणारच. तसंच मातीच्या बाबतीतही आहे. माती ही काही वस्तू नाही की कसली फॅक्टरी नाही. ती एक स्वतंत्र सजीवसृष्टी ची संस्था आहे. एका मूठभर मातीत पृथ्वीवरच्या मानवसंख्येएवढे सूक्ष्मजीव असतात. शेतीच्या उद्योगिकीकरणामुळे, बेसुमार रासायनिक खते - कीडनाशक याच्या वापरामुळे मातीतील ही सजीवसृष्टी नष्ट होते. त्या सृष्टीचं पालनपोषण आपली जबाबदारी आहे पुढच्या पिढीसाठी माती वाचवण्यासाठी काय करायला हवं आणि काय नको हे मानवाला पूर्वीपासून माहिती आहे. आपल्या प्रत्येकाला मातीची गरज आहे. सुपीक माती हा आपला हक्क आहे. ह्या हक्काला कायद्याचं पण रक्षण हवं. ही माती शहरीकरणाच्या आणि अज्ञानतेच्या काँक्रेट खाली गाढली जाऊ नये ही काळजी घेणे आपले सर्वांचे काम आहे. आपण आज जागे होऊन आपल्या सर्व शक्ती पणाला लावून आपल्या काळ्या आईला वाचवणे गरजेचे आहे. नाहीतर आपल्या पायाखालची माती सरकेल आणि आपल्या अस्तित्वाचीच 'माती' होईल!हे ही तेवढेच सत्य आहे.
मिलिंद जी गोदे.
milindgode111@gmail.com
Published on: 04 July 2022, 04:59 IST