Agripedia

पालक हे एक लोकप्रिय भाजीपाला पीक असून कमी कालावधीत चांगले उत्पन्न या पिकाच्या लागवडीतून मिळू शकते. पालक हे एक औषधी गुणांनी युक्त असे भाजीपाला पीक असून जर आपण व्यवस्थित व्यवस्थापन आणि नियोजन करून हजर पालकाचे उत्पादन घेतले तर चांगले फायदा होतो. या लेखात आपण पालक लागवडीच्या सुधारित पद्धती विषय जाणून घेणार आहोत.

Updated on 15 February, 2022 4:56 PM IST

पालक हे एक लोकप्रिय भाजीपाला पीक असून कमी कालावधीत चांगले उत्पन्न या पिकाच्या लागवडीतून मिळू शकते. पालक हे एक औषधी गुणांनी युक्त असे भाजीपाला पीक असून जर आपण व्यवस्थित व्यवस्थापन आणि नियोजन करून हजर पालकाचे उत्पादन घेतले तर चांगले फायदा होतो. या लेखात आपण पालक लागवडीच्या सुधारित पद्धती विषय जाणून घेणार आहोत.

पालक लागवडीचे सुधारित पद्धत

 जमिन आणि हवामान

  • पालकचीपिक हे वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी मध्ये घेता येते.
  • अगदी खारवट असलेल्या जमिनी मध्ये सुद्धा पालक चांगले येते.
  • पालकहे हिवाळी पीक आहे.
  • अत्यंत कमी कालावधीत येणारी पिके आहे.
  • आपल्याकडे कडक उन्हाळ्याचे दोन महिने वगळता सर्व महिन्यांमध्ये पालक घेता येते.
  • जर जास्त तापमानामध्ये पालक ची पीक घेतले तर त्याचा दर्जा घसरतो.

पालकची लागवड

  • पालकच्या भाजीचा सतत पुरवठा करता यावा यासाठी 10 ते 15 दिवसांच्या अंतराने टप्प्याटप्प्याने बियाण्यांची पेरणी करावी.
  • पालक लागवडीसाठी सपाट वाफ्याचा वापर करणे फायदेशीर ठरते.
  • बीयाफोकून पेरणी करणे चांगले असते.
  • त्यानंतर बिया मातीत पेरुण  त्यावर हलके हलके पाणी द्यावे.
  • 2बियांमधील अंतर पंचवीस ते तीस सेंटिमीटर ठेवावे.
  • दाट लागवड करू नये. लागवड दाट झाली तर पिकाची वाढ पूर्णपणे होत नाही.
  • 25 ते 30 किलो बियाणे प्रति हेक्‍टर लागते.

पालक पिकासाठी खते आणि पाणी व्‍यवस्‍थापन

  • पालक पिकासाठी नत्राचा पुरवठा जास्त प्रमाणात करावा लागतो.
  • जमिनीत ओलावा असणे गरजेचे असल्यामुळे नियमित पाण्याचा पुरवठा करावा.
  • पालक पिकासाठी जमिनीला जवळ-जवळ 20 गाड्या शेणखत, 40 किलो स्फुरद, 40 किलो पालाश आणि 80 किलो नत्र देणे गरजेचे आहे.

शेणखत हे  पूर्वमशागत करताना जमिनीत मिसळून द्यावे

  • पालकच्या पानांना हिरवेपणा यावा आणि उत्पादनात चांगली वाढ व्हावी यासाठी बी उगवल्यानंतर 15 दिवसांनी आणि कापणीनंतर दीड टक्का युरिया फवारावे.
  • पिकाला नियमित पाणीपुरवठा करावा.
  • हिवाळ्या मध्ये लागवड केली असेल तर पाणी देताना दहा ते पंधरा दिवसांचा गॅप द्यावा.
  • पिकाची काढणी करण्याच्या दोन ते तीन दिवस अगोदर पिकाला पाणी द्यावे.
  • पालक बियांची लागवड केल्यानंतर लगेचच पाणी द्यावे.

 पालकाची काढणी

  • पालक पेरणीच्या एका महिन्यानंतर पीककापणी ला तयार होते.
  • कापणी करीत असताना खराब पालक वेगळी काढावी.
  • पालकाची व्यवस्थित जुडी बांधून घ्यावे.
  • जुळ्या व्यवस्थित जागेत रचून त्यावर कापड झाकून किंवा बांबूच्या टोपल्यात किंवा पोत्यात ठेवाव्यात.
  • टोपली च्या खाली किंवा वर कडुनिंबाचा पाला ठेवला तर पालक लवकर खराब होत नाही.
  • पालक च्या जुळ्यांवर जास्त प्रमाणात पाणी मारू नये अन्यथा पालक खराब होऊ शकते.

पालकचे उत्पादन

  • दहा ते पंधरा टन हेक्‍टरी उत्पादन होते.
  • तसेच बियाण्याचे उत्पादन दीड टनपर्यंत  मिळू शकते.
English Summary: if you get more income in short time for spinch cultivation is benificial
Published on: 15 February 2022, 04:56 IST