आता ऑगस्ट महिना चालू असून काही दिवसांनी हिवाळा ऋतूचे आगमन होईल. आपल्याला माहित आहेच कि हिवाळ्यामध्ये बऱ्याच प्रकारचे भाजीपाल्याला चांगला बाजारभाव मिळतो. जर आपण सप्टेंबर मध्ये काही भाजीपाला पिकांची लागवड केली तर त्यांचे उत्पादन हे नोव्हेंबर,डिसेंबर किंवा जानेवारीच्या सुरुवातीला निघण्यास सुरुवात होते व हिवाळ्याच्या सुरुवातीला चांगला बाजारभाव मिळण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आपण या लेखात सप्टेंबरमध्ये लागवड करून कोणत्या भाजीपाला पिकांच्या माध्यमातून चांगला नफा मिळवता येईल याची माहिती घेऊ.
नक्की वाचा:अशी करा घोसाळी व पडवळ लागवड आणि कमवा बक्कळ पैसा
सप्टेंबर महिन्यात करा या भाजीपाला पिकाची लागवड
1- हिरवी मिरची- हिरवी मिरची स्वयंपाक घरातील अत्यावश्यक असा पदार्थ असून याला बाजारभाव कायमच चांगल्या पद्धतीने मिळतो. थोडा पाण्याचे व्यवस्थापन करून सप्टेंबर मध्ये मिरचीची लागवड केली तो लागवड करण्यासाठी रोगप्रतिरोधक बियाण्याची निवड केली तर चांगले उत्पादन हातात येऊ शकते.
2- ब्रोकोली- ब्रोकोली ही एक विदेशी भाजीपाला पीक असून कोबीवर्गीय पिक आहे. बाजारपेठेत चांगली मागणी असणारे हे विदेशी भाजीपाला पीक असून याची किंमत देखील जास्त असून पन्नास ते शंभर रुपये प्रति किलोने विकले जाते.
ब्रोकोली ची लागवड देखील सप्टेंबरमध्ये सुरू होते. यासाठी अगोदर रोपवाटिका तयार करावी लागते व नंतर पुनर्लागवड करावी लागते. ब्रोकली चे उत्पादन निघण्यास 60 ते 90 दिवसाचा कालावधी लागतो.
3- वांगी- सप्टेंबरमध्ये लागवड करता येईल असे भाजीपाला वर्गीय पीक आहे. सहसा शेतकरी जून आणि जुलै मध्ये याची लागवड करतात. परंतु सप्टेंबर मध्ये लागवड देखील फायद्याचे ठरते.
4- शिमला मिरची- बाजारात कायमच मागणी असणारे हे एक पीक असून सप्टेंबर महिन्यापर्यंत रोपवाटीका तयार करावी. शिमला मिरची पासून जर जास्त नफा हवा असेल तर सप्टेंबर पर्यंत लागवड होणे गरजेचे आहे.
5- फुलकोबी- हिवाळ्यात खाल्ले जाणारे प्रमुख भाजीपाला पीक असून तसे पाहायला गेले तर मेच्या अखेरपर्यंत किंवा जूनच्या सुरुवातीला याची लागवड करण्याची शिफारस केली जाते परंतु ज्या जाती उशिरा येतात अशांसाठी ऑगस्ट ते सप्टेंबर चा कालावधी किंवा ऑक्टोबर चा नोव्हेंबरचा पहिला आठवडा खूप चांगला काळ आहे.
Published on: 10 August 2022, 07:46 IST