Agripedia

चीन नंतर बांबूची शेती करणारा भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. परंतु मागच्या काही वर्षाचा विचार केला तर बळीराजा बांबू शेती करायला फारशी रुची काही दाखवत नाहीय. आणि म्हणूनच भारत सरकारने राष्ट्रीय बांस मिशन योजने( https://nbm.nic.in/ )अंतर्गत बांबू शेतीला प्रोत्साहन देण्याचे काम हाती घेतले आहे. ह्या योजने अंतर्गत भारत सरकार बांबू शेतीसाठी शेतकऱ्यांना 50000 रु. सबसिडी देते तसेच छोट्या शेतकऱ्यांना एक बांबूच्या झाडामागे 120 रु. देण्याचे प्रावधान ह्या योजनेत करण्यात आले आहे.

Updated on 19 July, 2021 6:27 AM IST

चीननंतर बांबूची शेती करणारा भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. परंतु मागच्या काही वर्षाचा विचार केला तर बळीराजा बांबू शेती करायला फारशी रुची काही दाखवत नाही. आणि म्हणूनच भारत सरकारने राष्ट्रीय बांस मिशन योजने( https://nbm.nic.in/ )अंतर्गत बांबू शेतीला प्रोत्साहन देण्याचे काम हाती घेतले आहे. ह्या योजने अंतर्गत भारत सरकार बांबू शेतीसाठी शेतकऱ्यांना 50000 रु. सबसिडी देते तसेच छोट्या शेतकऱ्यांना एक बांबूच्या झाडामागे 120 रु. देण्याचे प्रावधान ह्या योजनेत करण्यात आले आहे.

कोरडवाहू जमिनीत पण केली जाऊ शकते बांबूची शेती

भारतात बऱ्याच राज्यात शेतकरी कोरड जमीम किंवा कमी मौसमी पाऊसमुळे चिंतीत असतात आणि अशा शेतकऱ्यांसाठी बांबू शेतीही वरदान ठरू शकते. तज्ञांच्या मते बांबू शेतीसाठी कुठल्याही प्रकारची बागायती, सुपीक जमिनीची आवश्यकता नसते. याची शेती कोणत्याही जमिनीत केली जाऊ शकते. नॅशनल बांबू मिशन अनुसार भारतात सध्या 136 प्रकारच्या बांबूच्या जातींची शेती केली जातं आहे.यामध्ये 125 स्वदेशी जाती आहेत व 11 विदेशी जातींचा समावेश आहे. भारत सरकारच्या कृषी विभागाच्या वेबसाईटनुसार भारत दरवर्षी 13.96 टन बांबूच उत्पादन करत आहे.

नॅशनल बांबू मिशनची उद्दिष्ट्ये

1.वनरहित शासकीय तसेच खाजगी क्षेत्रात बांबूच्या लागावडीत वाढ घडवून आणणे.

2.कृषी उत्पन्नाला पूरक म्हणून लागवड तसेच जमीन आणि हवामान व पर्यावरण समतोल राखण्यासाठी.

3.उद्योगासाठी गुणवत्तापूर्ण कच्च्या मालाच्या आवश्यकतेच्या पूर्तीसाठी बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देणे

4.मुख्यत्व: शेतकऱ्यांच्या शेतात व घराजवळ बांबूच्या लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणे.

5.सामुदायिक जमीन,शेतीयोग्य कोरडं जमीन,आणि नदी-नाल्यांजवळ बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणे.

 

 40 ते 50 वर्षांपर्यंत लाभ देतो बांबू

साधारणतः बांबूची शेती तीन ते चार वर्षात तयार होते. शेतकरी चौथ्यावर्षापर्यंत बांबूची तोडणी करू शकतात. याव्यतिरिक्त विशेष बाब अशी की जर आपण बांबूच्या झाडाची लागवड 2.5 मीटरच्या अंतरावर केली तर आपण खाली असलेल्या जागेत जनावरांसाठी चारा देखील उगवु शकता. ह्याव्यतिरिक्त आपण शेतबांधावर देखील बांबूची लागवड करू शकता.सोबतच बांबूची लागवड एकदा केली तर ते 40-50 वर्ष फायदा देणारेच आहे.जवळपास एवढी वर्ष बांबू जिवंत राहू शकतो.प्रत्येक कापणीनंतर बांबूचे झाड नव्याने वाढायला सुरवात होते आणि बांबू शेतीतून दरवर्षी हेक्टरी 3-4 लाखांच उत्पन्न ही सहजरीत्या मिळून जाते.

 येणाऱ्या काळात अजून वाढेल बाजार

सरकार ज्याप्रकारे ह्या क्षेत्रासाठी काम करत आहे ते बघता येणाऱ्या काळात बांबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुवर्णक्षण येणार आहे. देशाच्या पहाडी क्षेत्रात बांबूचा वापर घर बांधणीसाठी व घराच्या साधणासाठी केला जातो ह्याव्यतिरिक्त बांबूचा वापर फर्निचर,कापडं, हर्बल औषध,हॉटेल्स इत्यादी क्षेत्रात बांबूचा वापर उल्लेखनीय आहे. तसेच अनेक सजावटीचे सामान, घर सामान,अशा अनेक प्रॉडक्ट बनवण्यासाठी बांबूला प्राधान्य देण्यात येत आहे.

हेही वाचा: गुलाब शेती;गुलाबावरील लाल कोळीचे नियंत्रण

 

भारत सरकारचा उद्देश आहे की बांबूच्या वापराला प्रोत्साहन देऊन प्लास्टिकच्या वापरावर कमी आणणे.लोकांच्या प्लास्टिक वापरावरची निर्भरता कमी करणे.म्हणूनच ह्याचा बाजार सहजरीत्या उपलब्ध आहे. येणाऱ्या काळात अजूनही ह्याचा बाजार मोठा होईल ह्यात काही शंकाच नाही. बांबूवर आधारित आजीविका व त्यावर आधारित रोजगार निर्माण करण्याला ही प्रोत्साहन देण्याचे काम सुरु आहे. सरकारच्या ह्या मिशन अंतर्गत ग्रामीण अर्थाव्यवस्थेला परत पुनःरुज्जीवीत करण्याचं काम सुरु आहे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पाऊल उचललं जातं आहे.

English Summary: If you are cultivating bamboo, this is best way to make a sustainable income in the future
Published on: 07 July 2021, 07:13 IST