Agripedia

फवारणीनंतर साधरणतः ३-४ तास पाऊस नको असतो.

Updated on 01 July, 2022 6:12 PM IST

फवारणीनंतर साधरणतः ३-४ तास पाऊस नको असतो.रसायन जर आंतरप्रवाही असतील तर ३-४ तासात शोषली जातात, व जर स्पर्शीय असतील तर कीटक व किडींवर ५०-६०% परिणाम केलेला असतो. अशावेळी पुनर्फवारणीची करू नये.कोणत्या रसायनाची फवारणी केली ऍसिफेट सारख्या रसायनांना परिणाम करण्यासाठी १२-१४ तास लागतात त्यामुळे संततधार पाऊस चालू असेल तर ऍसिफेट ची फवारणी टाळावी. डायमेथोऍट हे सर्वाधिक जलद काम करते, मात्र लागोपाठ वापर टाळावा.

पावसाची तीव्रता व वेग - फवारणीनंतर लगेचच २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ रिमझिम पाऊस चालला तर ५०-६० % फवारा धुवून जातो. अशावेळी दुसऱ्या दिवशी फवारणी करणे गरजेचे असते.फवारणीनंतर एक तासाने १५-२० मिनिटांसाठी रिमझिम पाऊस आला तर तिसऱ्या दिवशी फवारणी केली तरी चालते.थेंबाचा आकार मध्यम किंवा मोठा असेल व फवारणीनंतर १५-२० मिनिटे पाऊस चालला तर ९५% फवारा धुवून जातो. अशावेळी हवामानाचा अंदाज बघून २-३ तासानंतर फवारणी करावी. पावसाळ्यात फवारणी शक्यतो सकाळी करावी.

फवारणी करताना घ्यावयाची काळजीहवामानाचा अंदाज बघून पाऊस येण्याआधी फवारणी टाळावी.फळबागांवर पावसाळ्यात ३ दिवसांतून एकदा बुरशीनाशकांची फवारणी आवश्यक असते.किटकनाशकापेक्षा बुरशीनाशकांचा अधिक वापर करावा.पावसानंतर लगेच फवारणी टाळावी.कारण तुम्ही फवारलेले रसायन झाडावर पाणी असल्याने जमिनीवर पडते. परिणामी वाया जाते व जमिनीत झिरपल्याने मित्रजिवाणू मारले जातात. त्याचबरोबर विहिरीत मिसळण्याचा धोकाही असतोच.पावसाळ्यात फवारणी करताना स्टिकर, इमल्शन (चिकट द्रावण) चा उपयोतग करावा, जेणेकरून रिमझिम पावसाचा फवाऱ्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

कोणत्या रसायनाची फवारणी केलीऍसिफेट सारख्या रसायनांना परिणाम करण्यासाठी १२-१४ तास लागतात त्यामुळे संततधार पाऊस चालू असेल तर ऍसिफेट ची फवारणी टाळावी. डायमेथोऍट हे सर्वाधिक जलद काम करते, मात्र लागोपाठ वापर टाळावा.पावसाची तीव्रता व वेग - फवारणीनंतर लगेचच २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ रिमझिम पाऊस चालला तर ५०-६० % फवारा धुवून जातो. अशावेळी दुसऱ्या दिवशी फवारणी करणे गरजेचे असते.फवारणीनंतर एक तासाने १५-२० मिनिटांसाठी रिमझिम पाऊस आला तर तिसऱ्या दिवशी फवारणी केली तरी चालते.

English Summary: If it rains after spraying, re-spraying depends on the following factors
Published on: 01 July 2022, 06:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)