तसा हा लेख लिहून वर्ष झाला. पण प्रवास करतेवेळेस रस्त्यालगतच्या शिवारात आखूड कांड्यांचे दर्शन झाले. की ह्या लेखाची आठवण येते.पहाटेच्या किर्रर्र शांततेनंतर,श्यामल आकाशाचा प्रवास हळूहळू गुलाबी वर्णाकडे होऊ लागला.दिनकराची चाहूल लागताच पक्ष्यांचा मंद किलबिलाट श्रुतीपटलाना स्पर्श करू लागला. ह्या मंद,नाजूक स्पर्शान बळीराज्याचे नेत्र अलगद उघडले.रोजचा नित्यक्रम आवरून बळीराजान आपली वृषभांची जोडी घेऊन शेताची वाट धरली. शेताच्या बांधावर पोहचताच शेतकऱ्याची नजर आपल्या घामाच पाणी पाजलेल्या भाताच्या रोपांवर गेली आणि चेहऱ्यावर एक वेगळीच प्रसन्नता निर्माण झाली.पानांचा रंग हा सगळ काही आलबेल असल्याची प्रचिती देत होते. पण..... शेताच्या ऐका कोपऱ्यात काही रोपांची उंची तुलनेने जास्तच वाढलेली जाणवली. पानांची काळोखीही थोडी कमी दिसत होती. शेतकर्याने त्या रोपां खालची माती तपासली पण काहीच दोष दिसत नव्हता ह्याच कोपऱ्यात ही रोपं तुलनेनं का वाढली असावी ह्याचे गूढ त्याला उमजत् नव्हत पान तपासले,देठ पाहिले थोडी माती उकरून पाहिली पण काहीच दोष दिसला नाही. ह्या रोपांचा विचार करत असतानाच तेथे ऐका वृद्ध शेतकऱ्याचे आगमन झाल.
त्यांना ह्या समस्येबद्दल विचारणा केल्यास त्यांनीही आपले अनुभवी नेत्र रोपांकडे वळवले. त्यांनाही काही दोष दिसून आला नाही. शेवटी त्यांनी ह्या रोपांचे बेणे खराब असाव असा शिक्का मारून टाकला.ह्या दोघा शेतकऱ्यांना ज्ञात नव्हते की काही दशकानंतर आपल्या शेतातील ह्या दुर्लक्षित घटने मुळे जागतिक शेती व्यवस्थे मध्ये मोठे बदल होतील. ह्या घटनेची बातमी ज्वालेेसारखी पंचक्रोशीत पसरली. ही बातमी ऐका शास्त्रज्ञचा कानावर पडली.त्याने ह्या रोपांवर अभ्यास केला आणि ह्या रोपांवर ऐका बुरशीचा संसर्ग झाला आहे असा निष्कर्ष काढला. ह्या बुरशीचे नाव जिबरेला फ्युजिकोराय.ह्या बुरशीद्वारे ऐका संप्रेरकाची उत्पत्ती झाली आणि त्या संप्रेरकाचे नाव ठेवण्यात आले जिब्रेलीन.जसे ऑक्सिनची निर्मिती झाडांचा शेंड्यावर होत असते, सायटोकायनिनची निर्मिती झाडाचा मुळीचा शेंड्यावर होत असते तसेच जिब्रेलीनची निर्मिती झाडाचा नवीन फुटी व नव्या कोवळ्या पानांमध्ये होत असते. ज्यावेळी आपण एखाद्या बियाण्याची पेरणी करतो त्यावेळेस
बियाण्याचा पाण्याबरोबर संपर्क आल्यास बियाणे आपल्या सुप्तावस्थेतुन बाहेर येते. बियाण्याचा डोळा ह्या पाण्याचा संपर्कात आल्यास जिब्रेलीन ह्या संप्रेरकाचे निर्मिती करते. जिब्रेलीन ह्या संप्रेरकामुळे त्यांची सुप्तावस्था मोडते. जसे आपण आपल्या मुलांचा उज्वल भविष्याची सोय करून ठेवतो तसेच वृक्ष आपल्या पुढचा पिढीच्या वाढीसाठी बियाण्यांमध्ये स्टार्चरूपी ऊर्जा साठवून ठेवतात. ह्या स्टार्चचे ग्लुकोज मध्ये रूपांतर करण्यासाठी जिब्रेलीन ह्या संप्रेरकाचा वापर संदेशवाहकाचा रूपाने होत असतो.आपण बर्याच वेळा ऑक्सिन,सायटोकायनिन व जिब्रेलीनची फवारणी काही पिकांवर करत असतो. जिब्रेलीनची फवारणी केल्यास उसामध्ये दोन पेर्यातील अंतर वाढते. जर उसाचा कांड्या आखूड पडत असतील तर आपण असा निष्कर्ष लावतो की उसामध्ये जिब्रेलीनची निर्मिती होत नसावी. काही मटार व तुरीचा जातींची उंची मुळातच कमी असते. ह्या रोपांची उंची वाढवण्यासाठी जिब्रेलीन ह्या संप्रेरकांचा वापर केला
जातो. जसे सायटोकायनिन ह्या संप्रेरकामुळे पानामधील पेशींचे विभाजन होते तसे जिब्रेलीन ह्या संप्रेरकामुळे त्याच पेशींचे लांबी वाढते. जिब्रेलीन हा संप्रेरक काही पिकांसाठी अपायकारक ठरतो. जसे सोयाबीनसारख्या पिकांमध्ये दोन पानांमधील अंतर हे दोन इंचाचा वर राहिले तर फुलांची संख्या घटून उत्पादन कमी येते. सोयाबीनमध्ये सायटोकायनिनची निर्मिती जास्त झाल्यास फुलांची संख्या वाढते व आपले उत्पादनात वाढ होते.काही वर्षांपूर्वी आमचा उसा मध्ये दोन पेर्यातील अंतर चांगले वाढलेलं जाणवले. पेरे जवळपास एक वितीचा वर भरत होते. एवढी पेर्याची लांबी आम्ही कधीच पाहिली नव्हती. ह्यावर एखादी फवारणी किंवा टॉनिकचा वापर केलेलाही आठवत नव्हता. आम्ही ह्या निरीक्षणाचा विचार केल्यास आम्ही ह्यावेळेस पहिल्यांदाच जिवाणू खतांचा वापर केला असे आढळले.ह्या गोष्टीचा आणखी खोलवर विचार केल्यास आम्हाला असे जाणवलेकीऍझोटोबॅक्टर,ऍझोस्पिरीलम,असिटोबॅकटर, बॅसिलस आणि सुडोमोनास ह्या जिवाणूंचा वापर मोठ्या प्रमाणात झालेला जाणवला. नंतर असा अनुभव आम्हाला प्रत्येक क्षेत्रावर जाणवले.आखूड कांडी आणि आमचं नातं आता तुटलं आहे.
प्रत्येक प्लॉट मध्ये दोन पेर्यातील अंतर हे एक वितीचा आसपास मिळते.ह्या जाणिवेला विज्ञानाचा आधार असावा असे वाटत होते.त्याच वेळी एक वैज्ञानिक शोधपत्र हाती लागला आणि वरील जीवणूनमार्फत जिब्रेलीन ह्या अन्नद्रव्यांची निर्मिती झाली आहे ह्याची पुष्टी झाली.आज संप्रेरकांचा वापर शेती मध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. कित्येक एकर क्षेत्रासाठी काही ग्राम संप्रेरकाची गरज असते. त्याचा थोडा जरी अतिरेक झाला की झाडांमध्ये व्यंग दिसून येतो.जसे संप्रेरकाची मात्रेमध्ये बिघाड झाल्यास द्राक्षाचे मणी रबरासारखे लवचिक होतात त्याची साल जाड होते,उसामध्ये ही त्याचा अतिरेकी वापर झाल्यास झाडांमध्ये व्यंग दिसून येतात. ह्या संप्रेरकांचा वापर डोळ्यात तेल घालून करणे आवश्यक आहे. ह्यामध्ये झाडांना खरोखर ह्याची गरज आहे का? ह्याचाही विचार करावा. उसाला फुटवे चांगले असतील,दोन पेर्यातील अंतर चांगले असेल,पानाची रुंदी चांगली असेल तर ह्या संप्रेरकाची आवश्यकता नाही. कारण ही संप्रेरक झाडं स्वतः तयार करत असतात त्याचा योग्य त्या प्रमाणात वापर झाल्यास पुरेसं आहे.
विवेक पाटील,सांगली©️
०९३२५८९३३१९
Published on: 13 July 2022, 03:21 IST