Agripedia

डोमकळी अंड्यातून बाहेर पडलेली अळी, कळीमध्ये प्रवेश करते व आतील भाग पोखरते.

Updated on 01 September, 2022 8:56 PM IST

डोमकळी अंड्यातून बाहेर पडलेली अळी, कळीमध्ये प्रवेश करते व आतील भाग पोखरते. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भावामुळे कळीचे नुकसान झाल्यामुळे फूले आवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात यालाच डोमकली म्हणतात.डोमकळी कशी ओळखावी पहिल्या अवस्थेतली गुलाबी बोंडअळी फुलांमध्ये शिरते.पाकळ्यांना लाळेद्वारे एकमेकांना जोडुन स्वताला स्वरक्षणासाठी बंद करून घेते.

प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात.Infested flowers resemble half-bloomed rosebuds.अश्या कळ्या म्हणजेच डोमकळया डोमकळ्या तोडून पाकळ्यांना वेगळे केल्यास,पाकळ्या एकमेकांना लाळेद्वारे जोडल्यासारख्या दिसतात.बारकाईने निरीक्षण केल्यास पांढरट रंगाची पहिल्या किंवा दुस-या अवस्थेतील गुलाबी बोंडअळी आतमध्ये असल्याचे दिसून येते.या फुलांमध्ये सर्वप्रथम गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव सुरू होतो.अंडयातून निघालेली अळी,ताबडतोब पाते. कळ्या,फुले यांना छिद्र करून आत मध्ये शिरते. प्रादुर्भावग्रस्त फुलांचे डोमकळीत रुपांतर करते. 

गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव १० दिवसापेक्षा कमी कलावधीच्या कळीमध्ये झाल्यास झाडावरून कळी गळून पडते. उशीरा झालेल्या प्रादुर्भावामधे नुकत्याच लागलेल्या बोंडावर किंवा उशीरा लागलेल्या फुलांवर गुलाबी बोंड अळीची मादी पतंग अळी घालते. • या फुलामधुन किंवा लहान बोंडाला छिद्र पाडून अळी बोंडात शिरते, असे छिद्र बोंडाची वाढ झाल्यामुळे बंद होते.एकदा का अळी बोडामध्ये शिरली की, बोंडावरील छिद्र बंद असल्याने बोंडाचे वरून निरीक्षण केल्यास अळीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. त्याठिकाणी फक्त काळा डाग दिसतो. 

अळी आतमध्ये राहून लहान हिरव्या बोंडामधील अपरीपक्व कापूस व सरकी खाऊन टाकते तर मोठया बोंडामध्ये या फक्त सरकीवर आक्रमण करते.एक अळी बोंडामधील तिन ते चार सरकीच्या दाण्यांचे नुकसान करते. एका बोंडामध्ये एक अथवा अनेक अळया आपला जीवनक्रम पूर्ण करू शकतात.प्रादुर्भावग्रस्त बोंडे परिपक्व न होताच उमलतात, त्यामुळे रुईची प्रत खालावते.सरकीतील तेलाचे प्रमाण घटते आणि बियाण्याची उगवणशक्ती कमी होते.कापूस पिकातील डोमकळया वेळीच नष्ट न केल्यास यातील गुलाबी बोंडअळीची दुसरी पिढी तयार होऊन, गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव प्रचंड वाढतो व

कापूस पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकरी बघुना कापूस पिकातील डोमकळीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.डोमकळीचे नियंत्रण:१.डोमकळया गोळा करून अळीसह नष्ट कराव्यात,जेणेकरून गुलाबी बोंडअळीची पुढची पिढी तयार होणार नाही व प्रादुर्भाव होण्याच्या मुळ कारणाला आळा घालता येईल.२.ट्रायकोग्रामाटॉयडीया बैंक्ट्री या परोपजीवी गांधील माशीचे कार्ड (१.५ लाख अंडी/हे) शेतामध्ये लावावेत.

३.कामगंध सापळे १० प्रति हेक्टरी लावावेत. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणाकरिता गरजेनुसार खालील रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा.प्रोफेनोफॉस ५० ईसी किंवा ३० मिली / १० लिटर थायोडीकार्ब[७५ डब्ल्यू पी २० ग्रॅम /१० लिटर) इमामेक्टीन बेन्झोएट ५ एस जी ४ ग्रॅम / १० लिटर

 

विकास पाटील

कृषि संचालक, (विस्तार व प्रशिक्षण) कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

संकलन :- टीम कृषि शास्त्र

English Summary: Identification and management of boll weevil in cotton crop
Published on: 01 September 2022, 08:56 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)